सचिन गायकवाडतरडगाव : राज्यात सामान्यतः गहूपेरणीसाठी बियाण्याच्या अनेक जाती आहेत. त्याचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो. मात्र, खपली गव्हाचे उत्पादन घेणारे शेतकरी क्वचितच आढळतात.
त्यापैकी फलटण तालुक्यातील तरडगाव येथील जनार्दन संतराम अडसूळ हे शेतकरी मागील १० वर्षांपासून खपली गव्हाचे उत्पादन घेत आहेत. उत्पादित केलेल्या या गव्हाचा वापर पुढे विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे देण्यासाठी केला जातो.
कृषिभूषण पुरस्कार प्राप्त जनार्दन अडसूळ हे दिल्ली येथील आखिल भारतीय गहू संशोधन केंद्र आगरकर यामार्फत खपली गव्हाचे ब्रीडर बियाणे हे दरवर्षी आणतात.
यंदा त्यांनी दीड एकरासाठी ६० किलो बियाणे वापरले आहे. दरवर्षी ते दीड ते दोन एकर शेतात अशा प्रकारची गहू पेरणी करतात यामध्ये त्यांना साधारण २५ क्विंटलचे उत्पादन होते.
यातून त्यांना अडीच ते तीन लाख रुपये मोबदला मिळतो. यासाठी ३० हजार रुपये इतका खर्च येतो. या खपली गव्हाला आवरण असते.
घरगुती वापरासाठी तो घ्यावयाचा झाल्यास त्याची मळणी वेगळ्या यंत्रांद्वारे करावी लागते. हा गहू मधुमेह, हृदयरोग अशा विविध आजारांसाठी आरोग्यदायी मानला जातो. तसेच पचनासाठी उत्तम असतो.
या खपली गव्हाची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. तुलनेने साध्या अनेक जातीची गहू पेरणी मोठ्या प्रमाणात होताना दिसते, त्याचे उत्पादन कमी होऊन त्यास खपली गव्हापेक्षा दर कमी मिळतो.
यंदा अडसूळ यांनी दीड एकरासाठी ६० किलो बियाणे वापरले आहे. दरवर्षी ते दीड ते दोन एकर शेतात गहू पेरणी करतात. यामध्ये त्यांना साधारण २५ क्विंटलचे उत्पादन होते
खपली गहू पौष्टिक...◼️ खपली गहू हा प्राचीन प्रकार आहे. तो वैशिष्ट्यपूर्ण आहे.◼️ त्याचे दाणे सामान्य गव्हापेक्षा लांब व टोकाला निमुळते असतात.◼️ तो लालसर, तपकिरी रंगाचा असतो.◼️ रोगप्रतिकारकशक्ती चांगली असते.◼️ परिपक्व होण्यास वेळ लागतो.◼️ यामुळे त्याची चव चांगली व ते पौष्टिक असते.◼️ त्यापासून बनविलेल्या पोळ्या व अन्य पदार्थ स्वादिष्ट लागतात.
खपली गहू पेरणी केल्यावर खुरपणी व तणनाशक फवारणी करावी लागत नाही. दरवर्षी शेतात शेणखत व गांडूळ खत टाकले जाते. उत्पादित केलेले हे गहू बियाणे १०० रुपये किलो दराने येथील प्रेरणा कृषी शेतकरी गटामार्फत विविध जिल्ह्यातील शेतकरी विकत घेतात. - जनार्दन अडसूळ, शेतकरी, तरडगाव
अधिक वाचा: लाल मिरचीच्या दरात दुपटीने वाढ, मसालेही खाता आहेत भाव; वाचा किलोला किती रुपये दर?
Web Summary : Janardan Adsul, a farmer from Taradgaon, cultivates emmer wheat for a decade. He uses breeder seeds from Delhi. Emmer wheat is healthy for diabetes and heart patients and fetches him ₹2.5-3 lakhs annually. It is nutritious and requires less weeding.
Web Summary : जनार्दन अडसूल, तरडगाँव के एक किसान, एक दशक से खपली गेहूं की खेती कर रहे हैं। वह दिल्ली से प्रजनक बीज का उपयोग करते हैं। खपली गेहूं मधुमेह और हृदय रोगियों के लिए स्वस्थ है और उन्हें सालाना ₹2.5-3 लाख मिलते हैं। यह पौष्टिक होता है और इसमें कम खरपतवार की आवश्यकता होती है।