Join us

Farmer Success Story : सोमेश्वर साखर कारखाना कार्यक्षेत्रात या दोन शेतकरी भावांचे रेकॉर्ड ब्रेक ऊस उत्पादन; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 16:21 IST

एकरी उसाचे शंभर टन उत्पादन काढण्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा करताना आढळून येतात. या स्पर्धेत शिरपेचात तुरा लावणारी कामगिरी सावंत बंधूंनी केली आहे. काळ्या मातीतले महानायक म्हणून सावंत बंधू यांची नव्याने ओळख निर्माण झाल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

महावीर भुजबळएकरी उसाचे शंभर टन उत्पादन काढण्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा करताना आढळून येतात. या स्पर्धेत शिरपेचात तुरा लावणारी कामगिरी सावंत बंधूंनी केली आहे. काळ्या मातीतले महानायक म्हणून सावंत बंधू यांची नव्याने ओळख निर्माण झाल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात अनेक प्रयोगशील ऊस उत्पादक शेतकरी एकरी उसाचे शंभर टन उत्पादन काढण्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा करतात. यंदाही सुरू झालेल्या ऊस गाळप हंगामातही ही ऊस उत्पादकांची स्पर्धा सुरू आहे.

सोमेश्वर साखर कारखान्याचे सभासद मांडकी (ता. पुरंदर) गावचे प्रयोगशील शेतकरी दीपक अनिल सावंत व जयंत अनिल सावंत यांनी चालू हंगामामध्ये एकरी १०२ टनाचे उत्पन्न घेतले आहे, अशी माहिती सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक विश्वास जगताप यांनी दिली.

काळ्या मातीतले महानायक म्हणून सावंत बंधू यांची नव्याने ओळख निर्माण झाल्याने त्यांचे कौतुक होत आहे. अनेक प्रयोगशील शेतकरी यंदाही एकरी उसाचे शंभर टन उत्पादन काढण्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा करताना आढळून येतात.

या स्पर्धेत शिरपेचात तुरा लावणारी कामगिरी सावंत बंधूंनी केली आहे. त्यांनी उसाचे एकरी १०२ टन उत्पादन घेतले. २२ नोव्हेंबर ते २६ या कालावधीत शिवारातील उसाची तोड गाळपासाठी करण्यात आली.

त्यामध्ये सावंत यांनी ऊस उत्पादन वाढीचा केलेला विक्रम ऊस विकास विभागाने सर्वांच्या समोर आणला आहे. तो इतर ऊस उत्पादकांसाठी दिशादर्शक ठरणारा असल्याचे कृषी सहायक नंदकुमार विधाते यांनी सांगितले.

दीपक सावंत व जयंत सावंत यांनी को-८६०३२ या जातीच्या उसाचे उत्तम नियोजन जैविक, सेंद्रिय व रासायनिक खतांचा योग्य वापर करून एकरी १०२ टन विक्रमी उत्पादन काढले.

दरम्यान, सावंत यांना मोलाचे सहकार्य शेतकरी कृषी सेवा केंद्र मांडकीचे माधव जगताप, शेतकरी मित्र शिवाजी मोरे, सोमेश्वर कारखान्याचे अॅग्री ओव्हरशियर चंद्रकांत गायकवाड, कृषी पर्यवेक्षक माधवी नाळे, कृषी सहायक नंदकुमार विधाते, महेंद्र साळुंखे, धनंजय निगडे यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

यामुळे झाली उसाची जोमदार वाढ• ३० दिवसांनंतर १२/६१ ह्युमिकची आळवणी.• ४० दिवसांनी पहिला रासायनिक खतांचा डोस दिला.• ९० दिवासांनी मोठी भरणी केली.• लागवडीसाठी हे साडेचार बाय दोन फुटाचे अंतर.• आडसाली ८६०३२ जातीच्या उसाची रोप लागण• वेळोवेळी शेणखत, कोंबडखत व रासायनिक खते दिली.• ऊस पिकांचे एकरी १०२ टन ऊस उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने योग्य नियोजन, एकात्मिक खत व्यवस्थापन, पाण्याचे काटेकोर नियोजन केले.• फुटव्यांची संख्या एकरी ४० ते ४५ हजार ठेवली.

संशोधनात्मक झालेले काम शिवारात राबविल्यास एकरी शंभर नव्हे त्याही पेक्षा अधिक टनापर्यंत ऊस उत्पादन घेता येईल. यंदा १०२ टन ऊस उत्पादन घेतल्याने एक प्रकारची संजीवनी मिळाली आहे. त्यामुळे या यशस्वी प्रयोगाविषयी शेतकरी बांधवांना सांगणार आहे. आधुनिक पद्धतीने शेती केल्यानंतर उत्पन्न वाढते व शेती फायद्यामध्ये राहते हे यावरून सिद्ध झाले आहे. - दीपक सावंत, जयंत सावंत, ऊस उत्पादक शेतकरी

अधिक वाचा: दोन पॉलिहाऊस अन् ६५ शेडनेट, इंदापूर तालुक्यातील ह्या गावाला शेडनेटचं गाव म्हणून ओळख

टॅग्स :ऊसशेतकरीशेतीसाखर कारखानेसेंद्रिय खतपीक व्यवस्थापनसेंद्रिय शेतीखते