Join us

Farmer Success Story : एका झाडाला २० किलो डाळिंब शिराळच्या या शेतकऱ्याचे तीन एकरातून मिळविले ५२ लाखांचे उत्पन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 15:04 IST

Dalimb Farmer Success Story शिराळ (मा), ता. माढा येथील बंडू हरिदास शिंदे या शेतकऱ्याने ३ एकर क्षेत्रावर लागवड केलेल्या डाळिंब पिकाच्या उत्पादनातून चांगले उत्पन्न मिळवले.

कुईवाडी : शिराळ (मा), ता. माढा येथील बंडू हरिदास शिंदे या शेतकऱ्याने ३ एकर क्षेत्रावर लागवड केलेल्या डाळिंब पिकाच्या उत्पादनातून चांगले उत्पन्न मिळवले.

रासायनिक व जैविक खतांचा अचूक वापर करत निर्यातक्षम व उच्च क्वालिटीचे डाळिंब बनवून ते दुबईच्या मार्केटमध्ये विक्री केले. प्रतिकिलो १८० रुपये असा उच्चांकी दर व्यापाऱ्यांकडून मिळाला असून, त्यांना तब्बल ५२ लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.

निमगाव (टें) येथील मूळचे रहिवासी असलेले नागनाथ शिंदे व बंडू शिंदे यांनी काही वर्षांपूर्वी शिराळ (मा) येथे माळरान जमीन खरेदी केली होती. कालांतराने त्याला बागायती क्षेत्र केले. 

माळरान जमीन असल्याने त्यांनी चार वर्षांपूर्वी ३ एकरात भगवा जातीची १२ बाय ७ वर एकूण १ हजार ३०० रोपांची लागवड केली होती.

चालू वर्षी फेब्रुवारी महिन्यातील छाटणीवेळी बंडू शिंदे यांनी एकरी ४ ट्रेलर शेण खत, सुरुवातीस प्रतिझाड १ किलो व रेस्टनंतर दर दीड महिन्याला १ किलो रासायनिक भेसळ खत व या भेसळ खतामध्येच जैविक खत वापरले.

त्याचबरोबर वाळवी, हुमणी, किडी, गोगलगाय होऊ नये म्हणून भूअस्त्र प्रतिएकर ६ किलो वापरले. यामुळे जमीनीची सुपिकता वाढून गांडूळ संख्या वाढण्यास मदत झाली. यावेळी बागेवर मर व तेल्या रोग येऊ नये यासाठी देखील विशेष खबरदारी घेण्यात आली.

एका झाडाला २० किलो डाळिंब- रासायनिक व जैविक खतांचा योग्य मेळ घालत योग्य पद्धतीने खताचा वापर केल्याने झाडांची जोमात वाढ होऊन फळांची वाढ, वजन, गोडी व चकाकी वाढली.त्यांना प्रतिझाड सरासरी २० किलो डाळिंब निघाले असून, २०० ते ४०० ग्रॅमपर्यंत वजन मिळाले.हे सर्व डाळिंब व्यापाऱ्यांनी स्वतः शेतकऱ्याच्या बांधावर येऊन बिगरखर्ची प्रतिकिलो १८० रुपये उच्चांकी दर देऊन दुबईला निर्यात केले.त्यांचा ३ एकरातून एकूण ३० टन डाळिंब निर्यात झाले आहेत.यासाठी त्यांना सरासरी एकरी २.५ लाख रुपये म्हणजे तीन एकरासाठी एकूण ७.५ लाख रुपये खर्च झाला आहे.- यासाठी त्यांना औदुंबर कुबेर, नितीन कापसे, सुशीलकुमार टोणपे, दादा शिंदे, अभिजित फाटे, अमोल फाटे व सोमनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

अधिक वाचा: Farmer Success Story : बोरगावच्या इंजिनीअरने केली रताळाची शेती साठ गुंठ्यात काढले साडेसहा लाखांचे उत्पन्न

टॅग्स :डाळिंबशेतकरीशेतीफलोत्पादनदुबईपीकफळेमाढा