रूपेश उत्तरवार
यवतमाळ : विकासाची कास आणि नवं(New) तंत्रज्ञानाचा ध्यास मनाशी बाळगून असलेल्या महिला भविष्यात एक पाऊल पुढे टाकत पुढे सरसावल्या आहेत. त्यांनी शेत शिवारातील फवारणीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी ड्रोन यंत्र चालविण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. या महिलांच्या(Women) हाती ड्रोन(Drone) फवारणी यंत्र सोपविण्यात आले आहे. याच तंत्राच्या माध्यमातून त्यांनी १ हजार २०० एकरवर फवारणी केली आहे.
नव्या वर्षात जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनाच या तंत्रज्ञानाचा फायदा मिळावा म्हणून 'ॲप'वर नोंद करता येणार आहे. त्या ठिकाणी महिला तंत्रज्ञ शेत शिवारातील पिकांची फवारणी करून देणार आहेत.
महिला बचतगटाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या महिलांनी विविध क्षेत्रांत कामकाज सुरू केले आहे. बचतीसह महिला नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी सज्ज झाल्या आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाने अशा तंत्रस्नेही महिलांना पुढे जाण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. यातून नवा बदल पाहायला मिळत आहे. या कामाला येणाऱ्या वर्षात अधिक गती मिळणार आहे.
जिल्ह्यातील १६ तालुक्यांत १६ ड्रोन फवारणी यंत्र महिला पायलटच्या हाती सुपुर्द करण्यात आले आहे. महिला बचतगटाच्या फेडरेशनकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. यासाठी स्थानिक पातळीवरील उच्चशिक्षित महिलांची निवड करण्यात आली आहे. त्यांना पुण्यातील नागरिक विमान वाहतूक महासंचालनालयात प्रशिक्षित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाच्या यशस्वितेनंतर त्यांना ड्रोन पायलट लायसन बहाल करण्यात आले आहे.
ईफको करणार पायलटला आर्थिक मदत
* ड्रोनच्या मदतीने फवारणी करताना शेतकऱ्यांना वाजवी दराच्या निम्मे दरातच फवारणी करून मिळणार आहे.
* यासोबतच ईफको कंपनी ड्रोनने नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी फवारणी केली तर १०० रुपये एकर प्रमाणे त्यांना अर्थसहाय्य देणार आहे.
ड्रोन यंत्राचे प्रशिक्षण महिलांना मिळाले आहे. त्या उत्तम पद्धतीने या यंत्राला हाताळत आहे. या कामात २०२५ मध्ये अधिक गती मिळणार आहे. यातून ड्रोनच्या मदतीने ऊस, कापूस, तूर, यासह विविध पिकांवर फवारणी करता येणार आहे. - डॉ. रंजन वानखडे, माविमं
असे आहे ड्रोन तंत्रज्ञान
* १० लाख रुपये किमतीचे हे ड्रोन यंत्र हायटेक आहे. यावर शेत नकाशा फिड केल्यानंतर तेथूनच फवारणी करता येते.
* यासाठी दोन बॅटरी सेट देण्यात आले आहेत. त्यामुळे एका दिवसात यंत्राच्या मदतीने १० ते २० एकर फवारणी करता येणार आहे.
* पातळीवर ड्रोनच्या मदतीने फवारणी सुरू केली आहे. आतापर्यंत या महिलांनी १२०० एकरवर फवारणी केली आहे. येणाऱ्या वर्षात चार हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन आहे.
हे ही वाचा सविस्तर : Women Farmer Story : शिरोडी खुर्द येथे शंभर एकरक्षेत्रात महिलांनी फुलवली फुलांची शेती