Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >लै भारी > डोणगावात फुलली ड्रॅगन फ्रुटची शेती, उत्पन्नात मोठी वाढ!

डोणगावात फुलली ड्रॅगन फ्रुटची शेती, उत्पन्नात मोठी वाढ!

Dragon fruit farming flourished in Dongaon, big increase in income! | डोणगावात फुलली ड्रॅगन फ्रुटची शेती, उत्पन्नात मोठी वाढ!

डोणगावात फुलली ड्रॅगन फ्रुटची शेती, उत्पन्नात मोठी वाढ!

ड्रॅगन फ्रुटद्वारे २५ वर्षे शाश्वत उत्पादन मिळणार असल्याचा विश्वास प्रवीण यांनी व्यक्त केला आहे. लागवडीपासून ड्रॅगन फ्रुटच्या संगोपनासाठी त्याला एकरी पाच लाख रुपयांचा खर्च आला आहे.

ड्रॅगन फ्रुटद्वारे २५ वर्षे शाश्वत उत्पादन मिळणार असल्याचा विश्वास प्रवीण यांनी व्यक्त केला आहे. लागवडीपासून ड्रॅगन फ्रुटच्या संगोपनासाठी त्याला एकरी पाच लाख रुपयांचा खर्च आला आहे.

सचिन गाभणे
परिसरातील शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत वेगवेगळे प्रयोग करीत आहेत प्रवीण धोंगडे या तरुणाने औषधी गुणधर्म असणाऱ्या ड्रॅगन फ्रुटची लागवड स्थानिक जवळा रोडवरील शेतात केली आहे. रासायनिक खते टाळून जैविक खतांच्या जोरावर बहरलेल्या शेतीतून या हंगामात सुमारे सहा टन एकरी उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. ड्रॅगन फ्रुटद्वारे २५ वर्षे शाश्वत उत्पादन मिळणार असल्याचा विश्वास प्रवीण यांनी व्यक्त केला आहे. लागवडीपासून ड्रॅगन फ्रुटच्या संगोपनासाठी त्याला एकरी पाच लाख रुपयांचा खर्च आला आहे.

ॲग्रीचे शिक्षण घेतलेल्या प्रवीणने ड्रॅगन फ्रुटची केलेली प्रयोगशील शेती तरुण शेतकन्यांसाठी वस्तुपाठ ठरली आहे. दरम्यान, पहिल्याच तोड्यात २ टन किलोचे उत्पादन मिळाले आहे. त्यास व्यापाऱ्याने बांधावरच प्रतिकिलोस १० ते १५० रुपये भाव दिला. कोरोना काळात ड्रॅगन फ्रुटच्या शेतीचा अभ्यास करून बाजारभावाचा वेध घेऊन नवीन प्रयोग करण्याचे ठरविल्याचे प्रवीण याने 'लोकमत'शी बोलताना सांगितले

ड्रॅगन फ्रुटसाठी हे आवश्यक
- सात बाय अकरा फुटांच्या अंतरावर बेडची निर्मिती
- बेडवर शेणखत टाकून मल्चिंग पेपर
- सात फुटांवर सिमेंटच्या पोलची उभारणी
- सिमेंटचीच चौकोनी रिंग बसविली
- रेड जम्बो ड्रॅगन फ्रुट या जातीची ४,४०० रोपांची लागवड

या आजारांसाठी उपयुक्त
हृदयविकार
त्वचारोग
निरोगी हाडे
डोळ्यांचे आजार
मधुमेह
कर्करोग
पचनक्रिया

जमिनीवर तसेच दुष्काळी कमी पाणी असलेल्या परिसरात हे पीक चांगले आकार घेतले. औषधी समजले जाणाऱ्या या फळाचे भारतात केरळ, अंदमान- निकोबार बेट, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, गुजरात या राज्यांमध्ये उत्पादन होते. यातून चांगले आर्थिक उत्पादन मिळते, म्हणून ड्रॅगन फ्रूड शेतीचा प्रयोग केला आहे. यातून भविष्यात शाश्वत उत्पादन मिळेल - प्रवीण धोंगडे.प्रयोगशील शेतकरी, डोणगाव

Web Title: Dragon fruit farming flourished in Dongaon, big increase in income!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.