शैलेश काटेपुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामध्ये काळ्या रंगाच्या द्राक्षाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. हलक्या ते मध्यम प्रतीच्या जमिनीवर काळ्या द्राक्षांची लागवड केली आहे.
मागील पाच वर्षांपासून वातावरणातील बदल, अवेळी पाऊस, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय द्राक्ष उत्पादन स्थिती व बाजारभाव या कारणांमुळे हवालदिल झालेला पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामधील जिद्दी शेतकरी द्राक्ष बागायतीमधील अडचणींवर मात करत अपार मेहनतीच्या जोरावर उभारी घेताना दिसत आहे.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामध्ये काळ्या रंगाच्या द्राक्षाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. हलक्या ते मध्यम प्रतीच्या जमिनीवर काळ्या द्राक्षांची लागवड केली आहे. या भागातील द्राक्ष १०० ते १२० दिवसांत तयार होत असल्याने बऱ्याच बागायतदारांचा कल ऑगस्ट व सप्टेंबर फळ छाटणीकडे असतो.
महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्राचे संचालक राजेंद्र वाघमोडे यांनी सांगितले की, फळबागायतीमध्ये तरुण सुशिक्षित शेतकरी उतरल्याचे दिसत आहे. कृषी संशोधन केंद्राच्या शिफारशींचा ते तंतोतंत अवलंब करतात.
इंदापूर भागातील द्राक्ष बागायतदारांना द्राक्ष शेतीमधील सुधारणांसाठी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे माजी संचालक डॉ. संजय सावंत, डॉ. रामहरी सोमकुंवर, सध्याचे संचालक डॉ. कौशिक बॅनर्जी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे.
या भागातील शेतकऱ्यांनी द्राक्षवेलींच्या उत्परिवर्तनाचा आधार घेत स्वतःच काळ्या द्राक्षाच्या वाणांची निर्मिती केली आहे. सदर वाण लवकरच तयार होणारे असल्याने त्याला शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत आहे.
आजच्या स्थितीचा विचार केल्यास इंदापूर तालुक्यातील द्राक्ष जगात सर्वांत महागडी द्राक्ष गणली जात आहेत. याचे सर्व श्रेय द्राक्ष बागायतदारांना जात आहे. या भागातील द्राक्ष काढणी हंगामाला सुरुवात झाली आहे. द्राक्षाच्या प्रतिप्रमाणे किलोस १३५ ते १७० रुपये दर मिळत आहे.
उत्कृष्ट आकार, चवीची द्राक्षकृषी शास्त्रज्ञ व अनुभवी द्राक्ष बागायतदारांच्या मदतीने या भागातील शेतकऱ्यांनी उत्कृष्ट आकार व चवीची द्राक्ष बनविली आहेत. देशामध्ये गवगवा होत असलेल्या पेटंटेड व नॉन पेटंटेड वाणांपेक्षा या भागातील शेतकऱ्यांनी उत्परिवर्तन पद्धतीच्या आधाराने वाढविलेल्या काळ्या रंगाचे द्राक्ष वाण निश्चितच सरस ठरतील यात शंका नाही, असा विश्वास वाघमोडे यांनी व्यक्त केला.
अधिक वाचा: आले पिकाचे टप्प्यात नियोजन करून उत्पादनाचा करेक्ट कार्यक्रम करणारे शेतकरी भारत शिंदे यांची यशकथा