Lokmat Agro >लै भारी > काय सांगताय मधमाशांचे हॉटेल.. हो पुण्यात मधमाशी संवर्धनासाठी सुरु झालंय 'हनी बी हॉटेल'

काय सांगताय मधमाशांचे हॉटेल.. हो पुण्यात मधमाशी संवर्धनासाठी सुरु झालंय 'हनी बी हॉटेल'

A special 'Honey Bee Hotel' is now in Pune for the conservation of honeybees | काय सांगताय मधमाशांचे हॉटेल.. हो पुण्यात मधमाशी संवर्धनासाठी सुरु झालंय 'हनी बी हॉटेल'

काय सांगताय मधमाशांचे हॉटेल.. हो पुण्यात मधमाशी संवर्धनासाठी सुरु झालंय 'हनी बी हॉटेल'

आपल्याला वेगळ्या पदार्थांची चव चाखायची असेल, तर आपण हॉटेलमध्ये जातो. आता हीच चव मधमाश्यांना चाखता येणार आहे. कारण त्यांच्यासाठी खास पुण्यामध्ये 'हनी बी हॉटेल'ची सोय करण्यात आली आहे.

आपल्याला वेगळ्या पदार्थांची चव चाखायची असेल, तर आपण हॉटेलमध्ये जातो. आता हीच चव मधमाश्यांना चाखता येणार आहे. कारण त्यांच्यासाठी खास पुण्यामध्ये 'हनी बी हॉटेल'ची सोय करण्यात आली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

श्रीकिशन काळे
पुणे : आपल्याला वेगळ्या पदार्थांची चव चाखायची असेल, तर आपण हॉटेलमध्ये जातो. आता हीच चव मधमाश्यांना चाखता येणार आहे. कारण त्यांच्यासाठी खास पुण्यामध्ये 'हनी बी हॉटेल'ची सोय करण्यात आली आहे.

या हॉटेलमध्ये विविध प्रकारची चव मधमाशांना चाखायला मिळणार आहे. हा उपक्रम मधमाशांच्या संवर्धनासाठी 'हनी बी मॅन' म्हणून ओळखले जाणारे देवेंद्र जानी यांनी राबविला आहे. जैवविविधतेमध्ये सर्वाधिक वाटा याच मधमाशांचा आहे. त्यामुळे त्यांचे जतन करणे आवश्यक आहे.

पुणे शहरात देवेंद्र जानी यांनी खास 'हनी बी हॉटेल' सुरू केले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने २० मे हा जागतिक मधमाशी दिन म्हणून घोषित केला आहे. त्यानंतर २२ मे हा जागतिक जैवविविधता दिन असतो, त्यामुळे या दोन्ही दिनाच्या निमित्ताने 'लोकमत'ने खास देवेंद्र जानी यांच्याशी संवाद साधला.

यंदाची थीम 'बी एंगेज्ड विथ यूथ' अशी आहे. शहरातील मधमाशांचे संवर्धन करणारे देवेंद्र जानी यांनी स्थानिक मधमाश्यांचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनोखी कल्पना मांडली आहे. त्यांनी सर्वांत उंच बी हॉटेलची रचना केली आहे.

मधमाश्यांचे हॉटेल हे मधमाश्यांसाठी एक प्रकारचे कीटक असणारे हॉटेल आहे, जे मधमाश्यांना विश्रांती आणि निवारा देते. मधमाश्यांची घरे उंच झाडांवर, मृत लाकडाच्या ओंडक्यावर किंवा इतर नैसर्गिक ठिकाणांवर असतात. त्यांची घरे नाहीशी होत असल्याने खास कृत्रिम, पण नैसर्गिक असे हे हॉटेल त्यांच्यासाठी वरदान ठरणारे आहे.

मधमाशांवर उत्पादन अवलंबून
एकाकी मधमाशांमध्ये लीफकटर बी, कारपेंटर बी, मेसन बी, कोकीळ मधमाशी आणि ब्लू बँन्डेड बी यांचा समावेश होतो. जगाचा एक तृतीयांश अन्न पुरवठा मधमाशांवर अवलंबून आहे. कारण त्या परागीभवन करतात. मधमाशांशिवाय, अन्नाची कमतरता मोठ्या प्रमाणावर भासू शकते. म्हणून त्यांचे संवर्धन गरजेचे आहे, असे देवेंद्र जानी यांनी सांगितले.

शेती क्षेत्रात कीटकनाशके, बुरशीनाशकाचा सर्रास वापर होत आहे, त्यामुळे मधमाश्यांची संख्या कमी होत आहे. नागरिक घरच्या घरी बी हॉटेल' बनवू शकतात. बांबूच्या पेंढ्यांचा गुच्छ, कागदाच्या पेंढ्यांसह बांधा आणि त्यांना हिरव्यागार जागेत लटकवा जेणेकरून ते लीफकटर मधमाश्या तिथे येतील. - देवेंद्र जानी, 'हनी बी मॅन

अधिक वाचा: मधमाशीपालन व्यवसाय करताय? खादी व ग्रामोद्योग मंडळाची ही योजना देतेय अनुदान

Web Title: A special 'Honey Bee Hotel' is now in Pune for the conservation of honeybees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.