Lokmat Agro >स्मार्ट शेती > Zucchini: झुकीनी पिकाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहेत का?

Zucchini: झुकीनी पिकाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहेत का?

Zucchini crop farmer agriculture more yield exotic vegetables | Zucchini: झुकीनी पिकाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहेत का?

Zucchini: झुकीनी पिकाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहेत का?

झुकीनी हे पीक काकडीसारखे दिसणारे आणि भोपळ्यासारखी चव असणारे पीक आहे. पिवळ्या रंगाची आणि हिरव्या रंगाची झुकीनी असे दोन प्रकार यामध्ये असतात.

झुकीनी हे पीक काकडीसारखे दिसणारे आणि भोपळ्यासारखी चव असणारे पीक आहे. पिवळ्या रंगाची आणि हिरव्या रंगाची झुकीनी असे दोन प्रकार यामध्ये असतात.

शेअर :

Join us
Join usNext

दिवसेंदिवस आता भारतातही मोठ्या प्रमाणावर परदेशी भाजीपाला पिकांची लागवड केली जाऊ लागली आहे. ज्यामध्ये लेट्यूस, झुकीनी, मायक्रोग्रीन, रोमन, रॉकेट, ब्रोकोली, आईसबर्ग, थाईम, लीक या पिकांचा सामावेश होतो. तर यातील अनेक भाज्या आपण जेवनासोबत सलॅड म्हणून वापरतो. यातीलच झुकीनी पीक हे शेतकऱ्यांना फायद्याचे ठरत आहे. 

झुकीनी हे पीक काकडीसारखे दिसणारे आणि भोपळ्यासारखी चव असणारे पीक आहे. पिवळ्या रंगाची आणि हिरव्या रंगाची झुकीनी असे दोन प्रकार यामध्ये असतात. हे पीक लागवडीनंतर केवळ ४५ दिवसांत काढणीला येते. काकडीपेक्षा मोठे आणि दुधी भोपळ्यापेक्षा लहान आकाराचे हे फळ असते. 

झुकीनीच्या एका फळाचे वजन हे २०० ते ३०० ग्रॅमपर्यंत असते. तर एका झाडाला १० ते १२ फळे लागत असून एका झाडापासून २ ते ३ किलो फळे आपल्याला मिळू शकतात. याप्रकारे या पिकातून एका हेक्टरमध्ये ४० टनापर्यंत उत्पन्न मिळते. या फळभाजीची विक्री ही मॉलमध्ये आणि सुपर मार्केटमध्ये केली जाते.

दरम्यान, झुकीनीला मार्केटनुसार दर मिळतो. सर्वसाधारणपणे ४० ते ५० रूपये किलोप्रमाणे झुकीनीची विक्री केली जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना दोन ते अडीच महिन्याच्या काळात लाखोंचा नफा देणारे हे पीक आहे.  झुकीनी ही लो कॅलरी असलेलं पीक आहे. त्यासोबतच लो-शुगर असलेलं हे पीक असून हे शरिरासाठी फायद्याचे असलेले पीक आहे. 

Web Title: Zucchini crop farmer agriculture more yield exotic vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.