Join us

बियाणे घरचे असो अथवा विकतचे, पेरणी अगोदर ही सोपी तपासणी कराच? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 10:29 IST

खरीप हंगाम जवळ आला की शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू होते. उत्पादनात भरघोस वाढ व्हावी, यासाठी बियाण्याची निवड हा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा ठरतो.

खरीप हंगाम जवळ आला की शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू होते. उत्पादनात भरघोस वाढ व्हावी, यासाठी बियाण्याची निवड हा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा ठरतो.

अनेकदा शेतकरी बांधव दरवर्षी बाजारातून नवे बियाणे खरेदी करतात. परंतु, हे बियाणे महाग असतानाही त्याची उगवणक्षमता कितपत योग्य आहे, हे निश्चित नसते.

अशा वेळी वेळ, श्रम आणि पैसा वाया जाण्याचा धोका असतो. त्यामुळेच उगवणक्षम बियाणे वापरणे हा खरीप यशस्वी करण्याचा मूलमंत्र ठरतो.

गोणपाट वापरून बियाणे उगवण क्षमता चाचणी कशी करावी?

  • बियाण्याच्या प्रत्येक पोत्यातुन खोलवर हात घालुन मुठभर धान्य बाहेर काढा, सर्व पोत्यातुन काढलेले धान्य एकत्र करून घ्या.
  • गोणपाटाचे सहा चौकनी तुकडे घेऊन स्वच्छ धुवून घ्या. एक तुकडा जमीनीवर पसरवा.
  • पोत्यातुन काढलेल्या धान्यातुन सरसकट १०० दाणे मोजून दडी-दोन से.मी. अंतरावर (बोटाचं एक कांड अंतरावर) १०-१० च्या रांगेत गोणपाटाच्या एक तुड्यावर ओळीत ठेवावे अशा प्रकारे १०० दाण्याचे ३ नमुने तयार करावे.
  • गोणपाटावर चांगले पाणी शिंपडून ओले करावे व बियाण्यांवर दुसरा गोणपाटाचा तुकडा अंथरून पुन्हा चांगले पाणी मारावे.
  • गोणपाटाच्या तुकड्याची बियाण्यांसकट गुंडाळी करून थंड ठिकाणी सावलीत ठेवा त्यावर अधून-मधून पाणी शिंपडून ओले ठेवा.
  • ६-७ दिवसानंतर ही गुंडाळी जमीनीवर पसरून उघडा चांगले कोंब आलेले दाणे वेगळे करा व मोजा तिनही गुंडाळ्याची सरासरी काढुन १०० दाण्यांपैकी ७० किंवा त्यापेक्षा जास्त दाणे जर चांगले कोंब आलेले असतील तर बियाणे बाजारातील बियाण्यासारखेच गुणवत्तेचे आहे असे समजा आणि शिफारशी प्रमाणे मात्रेत पेरणीसाठी वापरा.
  • जर उगवण झालेल्या बियाण्याची सरासरी संख्या ७० पेक्षा कमी असेल तर एकरी बियाण्यांचे प्रमाण थोडे वाढवून पेरणी करा.
  • पेरणी करताना बियाण्यास बुरशीनाशकांची व जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करण्यास विसरू नका.

अधिक वाचा: राज्यातील या प्रमुख सहा धरणांचा पाणीसाठा आता वाढणार, शासन आखतंय हे नवे धोरण

टॅग्स :शेतीखरीपशेतकरीपीकपेरणीलागवड, मशागतपीक व्यवस्थापन