Lokmat Agro >स्मार्ट शेती > शेतमाल ऑनलाईन विक्री करायचाय, यासाठी आवश्यक बाबी कोणत्या?

शेतमाल ऑनलाईन विक्री करायचाय, यासाठी आवश्यक बाबी कोणत्या?

What to do if you want to sell agricultural products online? | शेतमाल ऑनलाईन विक्री करायचाय, यासाठी आवश्यक बाबी कोणत्या?

शेतमाल ऑनलाईन विक्री करायचाय, यासाठी आवश्यक बाबी कोणत्या?

आज योग्य बाजारपेठे अभावी किंवा प्रक्रिया न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीमालाचे नुकसान होते. विशेषता भाजीपाला पिकाचे जास्त नुकसान होताना दिसते यावर प्रक्रिया त्यात भाजीपाला निर्जलीकरण हा एक उत्तम पर्याय आहे.

आज योग्य बाजारपेठे अभावी किंवा प्रक्रिया न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीमालाचे नुकसान होते. विशेषता भाजीपाला पिकाचे जास्त नुकसान होताना दिसते यावर प्रक्रिया त्यात भाजीपाला निर्जलीकरण हा एक उत्तम पर्याय आहे.

शेअर :

Join us
Join usNext

एकवीसव्या शतकातील इंटरनेटची झेप पाहता एका क्लिकवर सगळ काही उपलब्ध आणि त्याच वेगाने एकवीस व्या शतकातील माणुसही धावतो आहे त्याला सर्व काही तयार आणि कमी वेळेत हव आहे आणि त्यासाठी उत्तम पर्याय ऑनलाईन मार्केट याच जाळ सर्वदूर पसरलेलं आहे आणि ते तितकच मजबूतही आहे. यात विविध कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तु, खेळणी, कपडे व इतर गृहउपयोगी वस्तु आकर्षक पँकेजिंग मध्ये ग्राहकांना घरपोच मिळतात त्याचे पैसे चुकते करण्यासाठी आपण डेबिट/क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, मोबाईल वॉलेट किंवा वस्तु मिळाल्यावर पैसे (कॅश ऑन डिलीवरी) इत्यादी पद्धतींचा अगदी सुलभपणे वापर करू शकता.

या संकल्पनेवर आधारित शेतकरी आपला भाजीपाला व इतर शेती आधारित शेतमाल उत्पादन का विकू शकत नाही, विकू शकतो. गरज आहे भविष्यातील आव्हाने ओळखून शेतकर्‍यांनी वैयक्तिक किंवा गटपातळीवर या क्षेत्रात उतरण्याची व शेतमाल प्रक्रियेतून मूल्यवर्धन करण्याची यातून काहिश्या प्रमाणात अपेक्षित दर मिळवणे तसेच शेतीमालाचे नुकसान टाळणे शक्य होईल. आज योग्य बाजारपेठे अभावी किंवा प्रक्रिया न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीमालाचे नुकसान होते. विशेषता भाजीपाला पिकाचे जास्त नुकसान होताना दिसते यावर प्रक्रिया त्यात भाजीपाला निर्जलीकरण हा एक उत्तम पर्याय आहे त्याचबरोबर आपण आपली इतर उत्पादिते यात तृणधान्य, कडधान्य तसेच कृषीपूरक उद्योगातील उत्पादने (दुध, अंडी, प्रक्रियायुक्त फळ व भाजीपाला उत्पादिते इ.) विपणन करू शकता.

या संकल्पनेतुन शेतकरी आपला सर्व शेतमाल विकू शकतो. विशेषता आजची बाजाराची स्थिती पाहिली तर बाजार समिती आवारातील निलाव पद्धती मध्यस्थ त्यांचे कमीशन व उच्चांकी आवक यामुळे दर पडणे शेवटी शेतकरी कमी भावाने व ग्राहक चढ्या भावाने भरडला जातो. या समस्येवर थेट घरपोच भाजीपाला पुरवठा ही संकल्पना काहिश्या प्रमाणात नियंत्रण आणू शकते, या संकल्पनेसाठी शेतकर्‍यांनी खालील गोष्टीकडे लक्ष्य देणे जरुरीचे ठरेल.

उत्तम दर्जाचे कृषी माल उत्पादन:
शेतमालाची गुणवत्ता (आकार, वजन, पोषण द्रव्यांचे प्रमाण) उत्तम असेल तर तो ग्राहकांच्या पसंतीस खरा उतरेल.

अत्याधुनिकता (लागवड ते कृषीमाल विपणन):
पिकांची लागवड करताना सुधारित बियाण्यांचा वापर तसेच पिक लागवड व्यवस्थापनात शास्त्रिय पद्धतीचा अवलंब म्हणजे बाजारपेठेचा अभ्यास करून लागवड नियोजन यात लागवड पद्धती आणि लागवडीचे अंतर, पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन व त्या बरोबर पाण्यात विरघळणारी शक्यतो सेंद्रिय खते (फर्टीगेशन) चा वापर, पिकाच्या वाढीनुसार विशिष्ट कृषी पद्धतीचा अवलंब, काढणी पश्यात तंत्रज्ञानामध्ये काढणीनंतर साठवणूक, प्रतवारी इ. अभ्यास, शेतकर्‍यांनी यासाठी तज्ञांच्या सल्ला घ्यावा (आपल्या कार्यक्षेत्रातील कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र व कृषी संशोधन केंद्र) यांच्याशी संपर्क करून आधुनिक लागवड पद्धतीचा अभ्यास करावा.

ग्राहक वर्गाच्या पसंतीचा अभ्यास:
ग्राहकास कोणता शेतमाल कशा स्वरुपात हवा आहे यासाठी शेतकऱ्यांनी याचा अभ्यास करण्यासाठी शहरांच्या जवळील आठवडी बाजारात ग्राहकांची कृषी मालासाठी पसंती पाहणे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीत विशिष्ठ मालाची स्थिती (आवक आणि विक्री) याची पाहणी व अभ्यास.

रसायनांचा कमीत कमी वापर:
किटकनाशकांच्या अवाजवी वापरामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसते आहे त्यामुळे अनेक दुर्धर आजार निर्माण होत आहेत आणि हे सर्वांच्या निदर्शनास आली आहे. यासाठी जैविक किटकनाशके हा उत्तम पर्याय आहे याचा वापर करावा. नुकसानीची पातळी पाहून फवारणी करावी शक्यतो रासायनिक किटक नाशकांचा वापर टाळावा.

सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचा अवलंब:
रासायनिक खताच्या बेसुमार वापरामुळे मातीची उत्पादन क्षमता दिवसेंदिवस कमी होत आहे, म्हणूनच आज शास्त्रज्ञ सेंद्रिय शेतीचा अभ्यास करता आहेत आणि शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा प्रयत्न करता आहेत, दिवसेंदिवस उत्पादकता कमी होते आहे, मातीचे आरोग्य धोक्यात येत आहे यासाठी निसर्गाबरोबर राहून सर्वांचा समतोल राखत सेंद्रिय शेतीची कास धरणे जरुरीचे ठरेल आजची स्थिती पाहता हे अवघड आहे परंतु पर्यावरणाचे संतुलन ठेवायचे असेल तर सेंद्रिय तथा नैसर्गिक शेतीच करावी लागेल आणि यातून मिळणार्‍या उत्पादनासाठी चांगली मागणी आहे.

दर्जात्मक मालाची निवड:
मालची निवड करताना मालाचा (आकार, वजन, चव, डोळ्यांच्या चवीसाठी दिखाऊपणा इ.) निकष लक्ष्यात घ्यावे.

आकर्षक पँकेजिंग:
पर्यावरणाचा विचार करून पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी प्लास्टिकचा कमीत कमी वापर यासाठी इतर पेपर पॅकिंगचा अवलंब तसेच इतर पर्यावरणपूरक पॅकिंग साहित्य वापरावे.

दैनंदिन व वेळेत भाजीपाला पुरवठा:
ग्राहकांना आपण घरपोच भाजीपाला देण्याच्या संकल्पनेसाठी दैनंदिन किंवा साप्ताहिक वारानुसार भाजी देत असाल तर तो वेळेतच मिळावा यासाठी उत्तम यंत्रणा असावी याची विशेष दखल घ्यावी.

साप्ताहिक अथवा मासिक ग्राहक अभिप्राय:
आपण शेतमाल (भाजीपाला, कडधान्य, तृणधान्य व कृषीपूरक उद्योगातून मिळणारी उत्पादने त्यात अंडी, दुध, प्रक्रियायुक्त पदार्थ इ.) ग्राहकांना पोहचवत असाल तर आपल्या व्यावसायाच्या नाविण्यासाठी आपल्या सेवेविषयी अभिप्राय घेणे जरुरीचे ठरेल, यातून भविष्यात काय बदल हवे आहेत हे समजण्यास मदत होईल व नाविन्याच्या दृष्टीने वाटचाल करणे सोपे जाईल.

मोबाईल व सोशल नेटवर्किंग साईटसचा प्रभावी वापर:
इंटरनेटच्या युगात मोबाईल, संगणकाच्या माध्यमातून सोशल साईटसचा (व्हॉटस अ‍ॅप, फेसबुक) अशी इंटरनेटवर अनेक साधने आहेत त्याचा उत्तम वापर आपण कृषीमाल विपणनासाठी करू शकतो.

काढणी पश्‍चात तंत्रज्ञानात महिला बचत गटांचा समावेश:
शेतीतील प्रमुख समस्या मजूर टंचाई, यासाठी महिला बचत गटाचे सहाय्य घेत काढणी पश्यात प्रक्रियेत निवड, प्रतवारी, पॅकिंग इ. साठी महिला उत्तम काम करतील, त्यात बचत गटास हमखास रोजगार मिळेल त्यातून त्यांची आर्थिक व सामाजिक पातळी उंचाविण्यास मदत होईल.

यासाठी पुणे, मुंबई व आपल्या जवळची छोटी-मोठी शहरे शेतकरी वर्गाला खुणावत आहेत. या शहरातील ग्राहक वर्ग शेत मालाची चव डोळ्याने चाखतो ही मोठी संधी ओळखून यात उतरले पाहिजे. तसेच तुम्ही नंबर फिरवा आणि भाजी मिळवा हा उपक्रम सुद्धा राबवु शकता. यात आपण भाजीपाला व्यतिरिक्त इतरही कृषीमाल उदा. धान्य, डाळी, फळे व इतर कृषीमाल विकु शकतो आणि चांगले अर्थार्जन करू शकतो.

आजची पिक उत्पादकतेची परिस्थिती पाहता अजूनही शेतकरी उच्चांकी उत्पादन घेता आहेत परंतु विपणनाची परिस्थिती समाधानकारक दिसत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी कुणाच्या कुबड्याची वाट न पाहता आपला पर्याय शोधावाच लागेल. काढणी पश्यात तंत्रज्ञानाच्या अभावामुळे सर्वच देशात कृषी मालाचे बर्‍याच प्रमाणात नुकसान होताना दिसते या समस्येवर कृषीमाल प्रक्रिया हा एक उत्तम पर्याय आहे. इस्राईल तथा स्वित्झर्लंडामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीमालावर प्रक्रिया केली जाते.

भारतात शेतीमालाची मुबलक उपलब्धता आहे, मात्र योग्य व्यवस्थापन व कौशल्याअभावी प्रक्रिया होत नाही. योग्य व्यवस्थापनाला ज्ञानाची जोड दिली तर भाजीपाला निर्जलीकरण, दुग्ध प्रक्रिया आदी उद्योग शेतकरी उभारू शकतात. शेतीवरील उत्पादनाला योग्य किंमत हवी असेल तर शेतकऱ्यांनी शेतीमाल प्रक्रियेकडे वळावे किमान गृह पातळीवर तरी असे लघु उद्योग उभारणे जरुरीचे ठरेल.

Web Title: What to do if you want to sell agricultural products online?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.