Join us
Daily Top 2Weekly Top 5

बीजप्रक्रियेचा क्रम कसा असावा? उत्पादनात वाढ करणारी जैविक बीजप्रक्रिया कशी करावी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 15:15 IST

bij prakriya kram पेरणी अगोदर शेतकऱ्यांमध्ये बीजप्रक्रिया करण्यासंदर्भात खूप शंका असतात की कोणती बीजप्रक्रिया अगोदर करावी? आणि कोणती नंतर करावी?

पेरणी अगोदर शेतकऱ्यांमध्ये बीजप्रक्रिया करण्यासंदर्भात खूप शंका असतात की कोणती बीजप्रक्रिया अगोदर करावी? आणि कोणती नंतर करावी? तर आपण याचा कर्म कसा असावा ते पाहूया.

बीजप्रक्रियेचा क्रम कसा असावा?१) सर्वप्रथम रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी.२) त्यानंतर रासायनिक कीटकनाशकाची प्रक्रिया करावी.३) त्यानंतर ३ ते ४ तासांनी जैविक बुरशीनाशक व जैविक कीटकनाशक घटक असलेली बीजप्रकिया करावी.४) त्यानंतर जैविक खत (रायझोबिअम/ॲझोटोबॅक्टर) बीजप्रक्रिया करावी.५) सर्वात शेवटी केएमबी/पीएसबी ची बीजप्रक्रिया करावी.

जैविक बीजप्रक्रिया कशी करावी?१) एक लिटर पाण्यात १५० ते २५० ग्रॅम गूळ टाकून द्रावण चांगल्या प्रकारे ढवळून व उकळून घ्यावे.२) वरील द्रावण थंड झाल्यावर त्या द्रावणात २५० ग्रॅम जीवाणू संवर्धन मिसळावे.३) १० किलो बियाणे स्वच्छ जागेवर प्लॅस्टिक किंवा ताडपत्रीवर पातळ थरात पसरवून त्यावर तयार केलेले संवर्धनाचे मिश्रण शिंपडावे.४) शिंपडलेले मिश्रण हलक्या हाताने बियाण्यास चोळावे.५) बियाण्यास प्रथम रासायनिक बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्यानंतर दोन ते तीन तासाला हलके बियाणे वेगळे करावे.नंतर जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा, नत्र उपलब्ध करुन देणारे रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर तसेच स्फुरद विरघळविणारे जीवाणू खत यांचे मिश्रण करुन लावावे.६) प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत चांगल्या प्रकारे वाळवावे व नंतर २४ तासाच्या आत पेरणी करावी.७) जैविक किंवा जीवाणू संवर्धन वापरताना कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ व कृषी विभाग यांचे मार्गदर्शन घ्यावे.

अधिक वाचा: जमिनीत क्षार नक्की कशामुळे वाढतात? क्षाराचे प्रमाण कमी करण्यासाठी काय उपाय करावेत?

English
हिंदी सारांश
Web Title : Seed Treatment Guide: Sequence and Organic Methods for Increased Yield

Web Summary : Follow this seed treatment order: chemical fungicide, insecticide, biological agents, biofertilizers, and KMB/PSB. Enhance yield with organic treatment using a jaggery solution and bio-cultures. Dry treated seeds in shade and sow within 24 hours. Consult experts for best results.
टॅग्स :शेतीशेतकरीपेरणीखतेलागवड, मशागतपीक व्यवस्थापन