शेतकरी जमिनीवर जे कर्ज घेतात त्याला 'बोजा' असे म्हणतात. या कर्जाची ७/१२ नोंद होणे आवश्यक असते. ही नोंद ज्या फेरफाराने होते त्याला 'बोजा चढविणे' असे म्हणतात.
ज्यावेळी शेतकरी कर्ज फेडतात, त्यावेळी ७/१२ वरील 'बोजा'ची नोंद कमी होणे आवश्यक असते. हि नोंद ज्या फेरफाराने होते त्याला 'बोजा कमी करणे' असे म्हणतात .
'बोजा कमी करणे' नोंद नागरिक स्वतः करु शकतात, ग्राम महसूल अधिकारी करु शकतात अथवा ज्या बॅंकेकडून कर्ज घेतले आहे ती बॅंक देखील करु शकते.
बोजा कमी करण्यासाठी आवश्यक माहिती
१) ज्या जमिनीवर नाव लावायचे ते स्थान (जिल्हा, तालुका, गाव, गट नंबर/व्यक्तीचे नाव)
२) अर्जदाराचे नाव.
३) अर्जदाराचा मोबाईल नंबर.
४) अर्जदाराचा ई-मेल आय.डी. (असल्यास)
आवश्यक कागदपत्रे
१) बँकेच्या पत्राची प्रत.
२) ओळखपत्र.
अर्ज कुठे कराल?
याकरिता अर्ज करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी/तलाठी यांचेशी संपर्क साधून अर्ज करू शकता अथवा ई-हक्क प्रणालीवरून ऑनलाईनही अर्ज करता येतो.
अधिक वाचा: इकरार नोंद म्हणजे काय? सातबाऱ्यावर इकरारची नोंद कशासाठी केली जाते? वाचा सविस्तर
