Lokmat Agro >स्मार्ट शेती > शेणखताला दर्जेदार कुजविण्यासाठी गांडूळ निवडायचे आहेत? मग 'या' गोष्टी विसरू नका बरं

शेणखताला दर्जेदार कुजविण्यासाठी गांडूळ निवडायचे आहेत? मग 'या' गोष्टी विसरू नका बरं

Want to choose earthworms for high-quality composting of cow dung? Then don't forget these things. | शेणखताला दर्जेदार कुजविण्यासाठी गांडूळ निवडायचे आहेत? मग 'या' गोष्टी विसरू नका बरं

शेणखताला दर्जेदार कुजविण्यासाठी गांडूळ निवडायचे आहेत? मग 'या' गोष्टी विसरू नका बरं

Vermi Compost Fertilizer : गांडूळ निवडतांना काय-काय लक्षात घ्यावे? गांडूळखत व्यवस्थापनातील मुख्य घटक तसेच पद्धती अशी विविध माहिती आपण या भागात घेणार आहोत. 

Vermi Compost Fertilizer : गांडूळ निवडतांना काय-काय लक्षात घ्यावे? गांडूळखत व्यवस्थापनातील मुख्य घटक तसेच पद्धती अशी विविध माहिती आपण या भागात घेणार आहोत. 

शेअर :

Join us
Join usNext

'भाग : ०१' मध्ये आपण गांडूळ खताचे फायदे, गांडूळ खत म्हणजे काय, आणि गांडूळ खत तयार करण्यासाठी महत्वाच्या बाबी याबद्दल माहिती घेतली होती.

या भागात आपण गांडूळ निवडताना कोणती गोष्टी लक्षात घ्यावीत, गांडूळ खत व्यवस्थापनातील मुख्य घटक, तसेच विविध पद्धती याबद्दल सखोल माहिती घेणार आहोत.

गांडूळ खतासाठी गांडूळ निवडतांना 

• गांडूळ खताची जात कुठल्याही रोगाला सहजासहजी बळी न पडणारी असावी.
• अंडी अवस्था, बाल्यवस्था व प्रौधावस्था कमीत कमी कालावधीत पूर्ण करणारी व लवकरात लवकर वयात येणारी असावी, जेणेकरून कमी कालावधीत त्यांची संख्या वाढण्यास मदत होईल.
• एकाच वेळी जास्तीत जास्त अंडी देणारी व प्रत्येक अंडी कोषातून जास्त पिलांची संख्या असणारी असावी. 
• विविध प्रकारच्या वातावरणात तग धरून राहणारी गांडूळ खताची जात असावी. 
• गांडूळ खताची जात विविध प्रकारचा सेंद्रिय काडीकचरा कार्यक्षमरीत्या पचवणारी असावी.
• गांडूळखत तयार होण्याचा कालावधी कमीतकमी असावा. 
• मोठ्या प्रमाणात व कमीतकमी कालावधीत गांडूळबीज तयार करण्याचे द्रूष्टीकोनातून गांडूळ खताची जात योग्य असावी.
• वरील सर्व गुणधर्म एसेनिया फेटाडाया जातीच्या गांडूळामध्ये आढळून येतात. म्हणून हि जात इतर जातीच्या तुलनेने कम्पोस्ट निर्मितीच्या द्रूष्टीकोनातून अधिक अनुकूल आहे.
• गांडूळ व जमिनीचे आरोग्य यांचा खूप जवळचा संबंध आहे. गांडूळ या प्राण्याविषयी व त्याच्या उपयोगिते विषयी सांगत असतांना जमिनीचे आतडी असा उल्लेख केला जातो. कारण गांडूळ हा प्राणी जमिनीत वास्तव करून राहणारा व सतत कार्यमग्न राहून त्यांच्या सेंद्रिय पदार्थ व माती खाऊन विष्ठेच्या रूपाने उपयुक्त खात तयार करतो.  
• गांडूळ जमिनीत खोलवर जाऊन जमिनीची उलाथापालट करतात व जमिनीचा पोट सुधारतात त्यामुळे पाणी जमिनीत खोलवर मुरून जमिनीची जलग्रहण क्षमता वाढते.
• जमिनीतील क्षारांचे प्रमाण कमी करून क्षारयुक्त चोपणयुक्त जमिनीस आळा घालतात म्हणून गांडूळास भूसुधारक म्हणतात. 
• जमिनीत पिकांचे अवशेष व इतर सेंद्रिय पदार्थांचे विघटन करून जमिनीची सुपीकता वाढविण्यास मदत होते. 
• जमिनीचा सामू सुधारण्यास मदत होते तसेच गांडूळामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्यामुळे नत्र, स्फुरद, पालाश व इतर सूक्ष्मद्रव्ये झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात. 
• मातीतील उपयुक्त जीवाणूच्या संख्येत भरमसाठ वाढ करतात. 
• जमिनीचा कस टिकून ठेवण्यास मदत करतात. 
• पडीक व मुरमाड जमीन सुधारण्याकरिता गांडूळखत व गांडूळाचा उपयोग होतो.
• जमिनीतील रासायनिक, जैविक व भौतिक गुणधर्म सुधारण्यास मदत करतात.
• गांडूळाच्या हालचालीमुळे जमिनीतील हवा व पाणी खेळती राहते. 
• जमिनीतल घातकद्रव्ये, किटकनाशके व इतर विषारी घटक गांडूळाच्या चयापाचन क्रियेमुळे लवकरात लवकर विघटन होऊन जमीन प्रदूषणास आळा बसतो.
• जमिनीच्या पृष्ठभागातील माती समृद्ध बनवण्यास निसर्गास कधी कधी १०० वर्षाहून अधिक कालावधी लागतो परंतु गांडूळ व गांडूळखताच्या वापरामुळे जमिनीचा वरचा मातीचा थर अत्यंत उपजाऊ बनतो.

गांडूळखत व्यवस्थापनाबद्दल मुख्य घटक तसेच पद्धती

उपलब्ध साधन सामुग्री व शेतकऱ्यांची आर्थिक कुवत आणि गांडूळ खताची गरज यानुसार गांडूळखत तयार करण्याच्या विविध पद्धतींचा अवलंबन केला जाऊ शकतो.

या सर्व पद्धतींमध्ये एक मध्यवर्ती सूत्र लक्षात ठेवले जाते ते म्हणजे गांडूळाच्या आवडीनुसार खाद्याच मिश्रण तयार करून गांडूळाच्या संख्येत वाढ होण्यासाठी खत निर्मितीच्या जागी अनुकूल वातावरण तयार करणे इत्यादी सावली, ओलावा व खेळती हवा हे होय.

यामध्ये शेतकऱ्याच्या स्थानिक परिस्थितीनुसार व गरजेनुसार थोडेफार बदल केले जाऊ शकतात. या अनुषंगाने गांडूळखत निर्मितीच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. 

• खड्डा पद्धत (३ मी. लांब, २ मी. रुंद, ०.६ मी. खोल) 
• सिमेंट हौद पद्धत (३ मी. लांब, २ मी. रुंद, ०.६ मी. खोल) 
• बिछाना पद्धत (३ मी. लांब, २ मी. रुंद, ०.६ मी. खोल)

गांडूळखत तयार करण्यासाठी वरील पद्धतीपैकी आपल्या सोयीप्रमाणे एक पद्धत निवडावी. 
क्रमश:

डॉ. श्रीकांत मोहन खुपसे
सहाय्यक प्राध्यापक
एमजीएम, नानासाहेब कदम, कृषी महाविद्यालय, गांधेली, छ संभाजीनगर.

डॉ. व्ही. जी. अतकरे 
सहयोगी अधिष्ठाता,
कृषी महाविद्यालय, नागपुर.

हेही वाचा : गांडूळ खताची शेतीला द्या साथ; जमिनीची सुपीकता टिकून उत्पादनात मिळेल वाढ

Web Title: Want to choose earthworms for high-quality composting of cow dung? Then don't forget these things.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.