Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > Vangi Shned Ali : वांग्यातील शेंडे पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी करा हे सोपे उपाय

Vangi Shned Ali : वांग्यातील शेंडे पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी करा हे सोपे उपाय

Vangi Shned Ali : Take these simple measures to control the stem borer into the brinjal crop | Vangi Shned Ali : वांग्यातील शेंडे पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी करा हे सोपे उपाय

Vangi Shned Ali : वांग्यातील शेंडे पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी करा हे सोपे उपाय

भाजीपाल्यामध्ये प्रामुख्याने वांग्याची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. परंतू त्यावर मोठ्या प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. यात शेंडे आणि फळे पोखरणारी अळी मोठ्या प्रमाणात नुकसान करते.

भाजीपाल्यामध्ये प्रामुख्याने वांग्याची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. परंतू त्यावर मोठ्या प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. यात शेंडे आणि फळे पोखरणारी अळी मोठ्या प्रमाणात नुकसान करते.

भाजीपाल्यामध्ये प्रामुख्याने वांग्याची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. परंतू त्यावर मोठ्या प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. त्याकरीता वांगी पिकावरील किडींचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

शेंडे आणि फळे पोखरणारी अळी
किडीची ओळख
-
ही अळी फिकट गुलाबी रंगाची असून प्रामुख्याने वांगी पिकावर आढळते.
- पतंगाचा आकार मध्यम असून पहिल्या दोन पंखावर विटकरी काळसर चट्टे असतात.
- मादी पतंग कोवळ्या शेंड्यावर, फुलांवर आणि फळांवर २०० २५० अंडी घालते.
- अंड्यातून पांढरट अळी बाहेर पडते.
- पूर्ण वाढ झालेली अळी फिकट गुलाबी रंगाची दिसते.
- नंतर ती ७-१० दिवसांसाठी कोष अवस्थेत जाते.

नुकसानीचा प्रकार
-
या अळीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास ५० टक्के शेंड्यांचे नुकसान होऊ शकते.
- या अळ्या फळातील गर खातात, अशी फळे निरूपयोगी ठरतात.
- या किडींचा प्रादुर्भाव जानेवारीपासून वाढू लागतो आणि ऑक्टोबर महिन्यांपर्यंत चालतो.
- म्हणजे साधारणता १० महिने या अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो.
- या अळीमुळे फळांचे ३०-४० टक्के नुकसान होते.

किडीचे व्यवस्थापन कसे कराल?
१) वांग्यावरील किडीचे नियंत्रण करण्यासाठी पीक लागवडीपूर्वी शेताची खोलवर नांगरणी करून घ्यावी.
२) तसेच त्या शेतात अगोदर जर टोमॅटो, भेंडी, पालेभाज्या, कडधान्य लावली असतील तर तिथे वांगी पिकाची लागवड करू नये. त्यामुळे किडीची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता असते. 
३) शेंडे पोखरणाऱ्या अळीमुळे शेंडे किडलेले आढळल्यास, असे शेंडे हाताने खुडून काढावेत व खोल खड्ड्यात पुरून नष्ट करावेत. 
४) पूर्ण लागवड झाल्यानंतर दोन महिन्यांनी व त्यानंतर झाडांना फळे व फुले येऊ लागतात. त्यात जर किडीचा प्रादुर्भाव दिसला तर ते वेळीच तोडून बाजूला करावी. 
५) रोपांची पूर्ण लागवड करतांना पूर्ण लागवडीपूर्वी रोपांचा पानाकडील भाग १ लिटर पाण्यात ३० मि.लि. निंबोळी तेल व मुळाकडील भाग ट्रायकोडर्मा विरिडी ४ मि.लि. प्रति १ लिटर पाण्यात बुडवून एक तास ठेवावेत. नंतर त्याचा वापर लागवडीसाठी करावा.

अधिक वाचा: Amba Falgal : आंबा पिकातील फळगळ रोखण्यासाठी करा हे सोपे उपाय

Web Title: Vangi Shned Ali : Take these simple measures to control the stem borer into the brinjal crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.