Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > जगात पहिल्यांदाच जळगांवमध्ये कॉफी व मिरीच्या टिश्यूकल्चर रोपांची निर्मिती

जगात पहिल्यांदाच जळगांवमध्ये कॉफी व मिरीच्या टिश्यूकल्चर रोपांची निर्मिती

tissue culture coffee and pepper plants for the first time in the world in Jalgaon | जगात पहिल्यांदाच जळगांवमध्ये कॉफी व मिरीच्या टिश्यूकल्चर रोपांची निर्मिती

जगात पहिल्यांदाच जळगांवमध्ये कॉफी व मिरीच्या टिश्यूकल्चर रोपांची निर्मिती

डाळिंब, केळीसारखी टिश्युकल्चर रोपे शेतकरी लागवडीसाठी वापरत आहेत. आता कॉफी आणि काळ्या मिरीच्या शेतकऱ्यांनाही टिश्यू कल्चरची रोपे मिळणार असून जळगावमध्ये हे संशोधन झाले आहे.

डाळिंब, केळीसारखी टिश्युकल्चर रोपे शेतकरी लागवडीसाठी वापरत आहेत. आता कॉफी आणि काळ्या मिरीच्या शेतकऱ्यांनाही टिश्यू कल्चरची रोपे मिळणार असून जळगावमध्ये हे संशोधन झाले आहे.

केळी, डाळिंब, स्ट्रॉबेरी बटाटा पिकांच्या टिश्यूकल्चर रोपे उत्पादनानंतर प्रथमतःच कॉफी आणि काळी मिरी पिकांचे टिश्यूकल्चर पद्धतीने रोपे निर्मितीचे तंत्रज्ञान भारतात, तेही जळगावमध्ये विकसित झाले आहे. यामुळे कॉफी व काळी मिरी उत्पादकांना जनुकीयदृष्ट्या शुद्ध, एकसारखी व रोगमुक्त रोपांच्या उपलब्धतेमुळे उत्पन्न वाढीचा मार्ग गवसणार आहे.

कॉफी व काळी मिरी या दोघंही पिकांवर अनेक वर्षे संशोधन करून प्रयोगशाळेतील विविध प्रयोगाअंती या पिकांचे टिश्यूकल्चर रोप निर्मिती तंत्रज्ञान विकसित करण्यात येथील जैन इरिगेशनच्या शास्त्रज्ञांनी यश प्राप्त केले आहे. 

टिश्युकल्चर कॉफी रोप
टिश्युकल्चर कॉफी रोप

कॉफी व काळी मिरी पिकातील टिश्यूकल्चर पद्धतीने रोपे निर्मितीचे हे पहिलेच संशोधन आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्राचे नाव पुन्हा जागतिक नकाशावर अधोरेखित झाले आहे. नावीन्यपूर्ण संशोधनासाठी ओळखल्या जाणाऱ्या  जैन इरिगेशने आपली संशोधनाची ही परंपरा  इतर पिकांवरील संशोधनात सुरू ठेवली आहे. लवकरच शेतकऱ्यांसाठी आणखी काही पिकांचे तंत्रज्ञान विकसित करून शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. 

जळगाव येथील जैन हायटेक प्लांट फॅक्टरीमध्ये कॉफीच्या दोन प्रकारच्या प्रजाती विकसित करण्यात आल्या आहेत. त्यात चंद्रगिरी व सी x आर प्रजातींचा समावेश आहे. तर काळी मिरी या पिकात टिश्यूकल्चर पद्धतीने चार प्रजाती विकसित केल्या आहेत. यामध्ये पन्नीयुर-१, पन्नीयुर-७, पन्नीयुर-८ आणि करीमुंडा यांचा समावेश आहे. 

टिश्युकल्चर काळी मिरी रोप
टिश्युकल्चर काळी मिरी रोप

टिश्यूकल्चर पद्धतीने निर्मित कॉफीच्या दोन व काळी मिरीच्या चार प्रजाती बाजारात उपलब्ध करण्यासाठी  कॉफी व काळी मिरी उत्पादक व्यापारी संस्था, कॉफी व काळी मिरी उत्पादक शेतकरी संस्था आणि व्यक्तिगत कॉफी व काळी मिरी मालमत्ताधारकांसोबत कॉफी व काळी मिरी रोपे उत्पादन करुन त्यांना उपलब्ध करून देण्यासंबंधीत करार करण्यासाठी प्रस्ताव देखील जैन कंपनीने मागवले आहेत. 

 कॉफी व काळी मिरी टिश्यूकल्चर रोपांची वैशिष्ट्ये

  • कॉफी व काळी मिरीची टिश्यूकल्चर रोपे ही रोगमुक्त व जनुकीयदृष्ट्या सर्वोत्तम मातृवृक्षांपासून तयार केलेली जातात. 
  • ही रोपे माती विरहित माध्यमात हरितगृहात हार्डनिंग केली जातात. 
  • रोपांची मुळे दाट, मजबूत आणि पुर्ण विकसित झालेली असतात त्यामुळे ही रोपे शेतात लगेच  लागवडीसाठी तयार असतात. 
  • टिश्यू कल्चर निर्मित ही रोपे खास मूळसंरक्षक ट्रे मध्ये वाढवली जातात. यात दोन आकारातील ट्रे मध्ये रोपे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ह्या रोपांना लागवडीनंतर योग्य छाटणी केल्यावर झाडांचा उत्तम घेर तयार होतो.
  • लागवडीनंतर रोपे जमिनीत लगेच  स्थिरावतात व एकसारखी वाढतात. रोपे एकसारखी असल्यामुळे रोपांना एकाच वेळी फुले व फळे येतात. काटेकोर शेती व्यवस्थापन पद्धतीत (प्रिसिजन फार्मिंग) ही रोपे उत्तम प्रतिसाद देऊन भरघोस उत्पादन देतात.

 

‘स्मार्ट ॲग्रीकल्चरसाठी टिश्यूकल्चर’
कॉफी व काळी मिरी या टिश्यूकल्चर रोपांचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध झाल्यामळे वातावरणातील बदलांवर मात करून उत्पादन वाढीबरोबरच गुणवत्ता वाढ साध्य करून निर्यातक्षम उत्पादन घेणे शक्य होणार आहे. कॉफी व काळी मिरी उत्पादकांनी आता टिश्यूकल्चर तंत्रज्ञानाने निर्मित कॉफी व काळी मिरी रोपांच्या वापराबरोबरच स्मार्ट ॲग्रीकल्चर ही संकल्पना प्रत्यक्षात साकारावी.
-अजित जैन, सहव्यवस्थापकीय संचालक, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि., जळगाव

Web Title: tissue culture coffee and pepper plants for the first time in the world in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.