Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > Beekeeping Competition by NBB : मधमाशीपालन व्यवसायासाठी केंद्राची ही योजना देईल तुम्हाला पाठबळ

Beekeeping Competition by NBB : मधमाशीपालन व्यवसायासाठी केंद्राची ही योजना देईल तुम्हाला पाठबळ

This scheme of central government for beekeeping business will support for farmers and fpo | Beekeeping Competition by NBB : मधमाशीपालन व्यवसायासाठी केंद्राची ही योजना देईल तुम्हाला पाठबळ

Beekeeping Competition by NBB : मधमाशीपालन व्यवसायासाठी केंद्राची ही योजना देईल तुम्हाला पाठबळ

Beekeeping Competition by NBB : आत्मनिर्भर भारताचा भाग म्हणून २०२० मध्ये केंद्र सरकारने राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियानाची घोषणा केली. ही योजना राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळ (NBB) द्वारे संचालित केली जाते. ही १०० टक्के केंद्र पुरस्कृत योजना आहे.

Beekeeping Competition by NBB : आत्मनिर्भर भारताचा भाग म्हणून २०२० मध्ये केंद्र सरकारने राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियानाची घोषणा केली. ही योजना राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळ (NBB) द्वारे संचालित केली जाते. ही १०० टक्के केंद्र पुरस्कृत योजना आहे.

आत्मनिर्भर भारताचा भाग म्हणून २०२० मध्ये केंद्र सरकारने राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियानाची घोषणा केली. ही योजना राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळ (NBB) द्वारे संचालित केली जाते. ही १०० टक्के केंद्र पुरस्कृत योजना आहे.

महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांना राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियानाच्या अंमलबजावणी करिता सन २०२१ मध्ये अंमलबजावणी यंत्रणा म्हणून मान्यता देण्यात आली.

उद्देश
■ मधुमक्षिकांचे संरक्षण, मध उत्पादनास प्रोत्साहन आणि पर्यावरणीय शाश्वतता सुनिश्चित करणे व मधुक्रांतीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारतातील शास्त्रोक्त मधुमक्षिकापालनाचा सर्वांगीण विकास आणि प्रोत्साहन देणे.
शेती आणि बिगरशेती कुटुंबांसाठी उत्पन्न आणि रोजगार निर्मितीसाठी मधमाशीपालन उद्योगाच्या सर्वांगीण वाढीला चालना.
■ कृषी व फलोत्पादन पिकांची उत्पादन वाढ.
■ मधुमक्षिका पालनाद्वारे महिलांचे सक्षमीकरण.
■ मधुमक्षिका पालन व मध उत्पादनासाठी कृषी उद्योजक आणि कृषी स्टार्टअप्सना प्रोत्साहन देणे.
■ मध व इतर उच्च मूल्य मधमाशी उत्पादनांच्या उत्पादनासाठी मधुमक्षिकापालन उद्योगात नवीनतम आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्ये वापरण्यास, विकसित करण्यास प्रोत्साहन देणे.
■ सहकाराच्या माध्यमातून संस्थात्मक चौकट तयार करून म्हणजेच स्वयंसहाय्यता गट, शेतकरी उत्पादक संघ यांची स्थापना करून मधुमक्षिका पालकांचे सक्षमीकरण करणे.

समाविष्ट घटक
१) लघु अभियान I २) लघु अभियान II ३) लघु अभियान III

१) लघु अभियान I
या अभियानांतर्गत शास्त्रोक्त मधुमक्षिकापालनाचा अवलंब करून परागीकरण करून विविध पिकांचे उत्पादन आणि उत्पादकता यांच्यात सुधारणा घडवून आणण्यावर भर दिला जाईल.
समाविष्ट बाबी
• दर्जेदार न्युक्लियस स्टॉक केंद्रांचा विकास.
• मधुमक्षिका जननकांचा विकास.
• गरजेनुसार भाड्याने वस्तू/सेवा देणारी केंद्र.
• मधुमक्षिका स्नेही वनस्पती, फुलझाडे, मधुमक्षिका वाटिका लागवड
• मधुमक्षिका पालनाद्वारे महिलांचे सक्षमीकरण करणे.
• मध व इतर उत्पादने तपासणी प्रयोगशाळा.
• मधुमक्षिका पालनासाठी लागणाऱ्या उपकरणांचे उत्पादन करणाऱ्या युनिट्सची स्थापना करणे.
• मधुमक्षिका रोग निदान व उपचार प्रयोगशाळा/फिरती प्रयोगशाळा.
• मधुमक्षिकापालन परिसंवाद, प्रशिक्षण इ.

२) लघु अभियान II
या अभियानांतर्गत पीक काढणीनंतरच्या मधुमक्षिकापालन/पोळे यांच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केले जाईल. यामध्ये संकलन, साठवणुक, पणन, मूल्यवर्धन इ. बाबी समाविष्ट आहेत आणि या प्रक्रियांसाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात येत आहे.

समाविष्ट बाबी
• मध व इतर पोळे उत्पादनांचे संकलन, विक्री, बॅन्ड विकसित करणे, पणन सुविधा इ. साठी केंद्र.
• मध व इतर पोळे उत्पादनांचे पॅकिंग व साठवणूक, शीतगृहे.
• मध व इतर पोळे उत्पादनांवरील प्रक्रियांसाठी प्रकल्प.
• मध व इतर पोळे उत्पादनांवर प्रक्रिया करणाऱ्या युनिट्स/कारखान्यांचे नुतनीकरण/विस्तार.
• मध व इतर पोळे उत्पादनांवर प्रक्रिया करणाऱ्या युनिट्सकरिता अंतर्गत चाचणी प्रयोगशाळा इ.

३) लघु अभियान III
या अभियानात विविध प्रदेश/राज्ये/कृषी विषयक हवामान आणि सामजिक आर्थिक स्थितीसाठी योग्य अशा संशोधन व तंत्रज्ञानाचा विकास करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. शास्त्रोक्त मधुमक्षिकापालनास चालना देणारे संशोधन आणि तंत्रज्ञान विकसित करणे इ.

अर्ज कोणाला करता येतो?
शेतकरी/मधुमक्षिकापालक/संघ/संस्था/कंपन्या/स्वयं सहाय्यता गट/शेतकरी उत्पादक संघ/शेतकरी उत्पादक कंपनी/राज्य कृषी विद्यापीठे/केंद्रीय कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र इ.

अर्थसहाय्याचे स्वरूप
महाराष्ट्र राज्यासाठी अर्थसहाय्य खालीलप्रमाणे असेल
१) वैयक्तिक लाभधारक/शेतकरी/मधुमक्षिकापालक/संघ/संस्था/कंपन्या - ५०%
२) स्वयं सहाय्यता गट (SHG), संयुक्त दायित्व गट (JLG)/शेतकरी/मधुमक्षिका पालनकर्ते हितसंबंधी गट (FIG)/सहकारी संघ (Co- operatives)/शेतकरी उत्पादक संघ (FPO)/शेतकरी उत्पादक कंपन्या (FPC), राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळाकडे नोंदणी असलेले मधुमक्षिका पालनकर्ते महासंघ-७५%
३) राष्ट्रीय/राज्य स्तरावरील शासकीय संस्था राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळ, भारतीय कृषी संशोधन परिषद, राज्यातील कृषी विद्यापीठे/केंद्रीय कृषी विद्यापीठे - १००%
४) क्षमता बांधणी उपक्रमांसाठी (For capacity building programmes) शेतकरी, मधुमक्षिकापालक, अधिकारी यांचे प्रशिक्षण, परिसंवाद, कौशल्य विकास कार्यक्रमाकरिता - १००%

संपर्क
योजनेच्या अधिक माहितीसाठी व प्रस्ताव सादर करण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय किंवा राज्यस्तरीय अंमलबजावणी यंत्रणा महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे-०५ ई- मेल: info@mahanhm.in, दूरध्वनी: (०२०)-२९७०३२२८. या ठिकाणी संपर्क करावा.

योजनेच्या मार्गदर्शक सूचनांसाठी संकेतस्थळ: https://nbb.gov.in/

Web Title: This scheme of central government for beekeeping business will support for farmers and fpo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.