Join us

हळदीचे बेणे अधिक काळ टिकण्यासाठी साठवणूकीत करा हे सोपे उपाय; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 10:48 IST

Halad Bene Sathavnuk सध्या हळद पिकाच्या काढणीचा हंगाम सुरू आहे. जे की खांदणी करून काढलेले कंद २ ते ३ दिवस सूर्यप्रकाशात चांगले तापून द्यावेत. कंद तापले की त्यास पाणी सुटते आणि चिकटलेली माती निघून जाते.

सध्या हळद पिकाच्या काढणीचा हंगाम सुरू आहे. जे की खांदणी करून काढलेले कंद २ ते ३ दिवस सूर्यप्रकाशात चांगले तापून द्यावेत. कंद तापले की त्यास पाणी सुटते आणि चिकटलेली माती निघून जाते. २ दिवसांनी कंदाची मोडणी करावी.

हळद बेण्याची साठवणूक करताना घ्यावयाची काळजी◼️ हळद काढल्यानंतर जे बियाणे पुढील हंगामासाठी वापरायचे आहे ते बियाणे निवडून बाजूला काढावे.◼️ बियाणेची निवड करताना किडग्रस्त, रोगयुक्त अथवा अर्धवट कुजलेले गड्डे साठवणीमध्ये येणार नाहीत याची दक्षता घ्यावी.◼️ साठवणुकीची जागा सावलीत वारा खेळेल अशा ठिकाणी असावी.◼️ साठवणीकरता निवडलेले बेणे थोड्या उंचवट्यावर कोणाकार ढीग करून रचून ठेवावे.◼️ त्यावर हळदीच्या पानांचा १० ते १५ सेंटीमीटर थर द्यावा. या पाल्यावरती किटकनाशक व बुरशीनाशक फवारणी करावी.◼️ पाला उन्हामध्ये सुकवून त्याचा वापर करावा, पाल्यावर गोणपाट टाकून ते भिजेल एवढे पाणी मारावे.◼️ बेणे साठवणीचा कालावधी ७५ ते ९० दिवसांपर्यंत ठेवाल्यास सर्व बेण्यांचे डोळे फुगलेले दिसतात.◼️ या साठवणीच्या कालावधीमध्ये सुरुवातीस ४५ ते ६० दिवस कोणतीही प्रक्रिया करू नये.◼️ साधारणपणे लागवडीच्या ३० दिवस अगोदर ६ ते ८ दिवसांच्या अंतराने ढिगावरती पाणी मारावे.◼️ या पद्धतीने बियाणे साठवणूक केल्यास गड्ड्यावर असणाऱ्या मूळ्या लवकर कुजतात आणि त्या गड्ड्यापासून त्वरित अलग करता येतात. असे मुळ्याविरहीत गड्डे बेणे लागवडीसाठी उत्तम समजले जाते.

जमिनीत खड्डा करून बियाणे साठवणे◼️ ज्या ठिकाणी तापमान ४० अंश सें.च्या वरती जाते अशा ठिकाणी बियाणे खड्डा करून साठवावे.◼️ ज्या ठिकाणी जमिनीतील पाण्याची पातळी एक मीटर पेक्षा खोल आहे व जी जागा उंच ठिकाणी आहे अशा सावलीच्या ठिकाणी १ मीटर खोलीचा व जरुरीप्रमाणे लांबी रुंदीचा खड्डा खोदावा. खड्डयाच्या तळाला ढाळ/उतार द्यावा.◼️ खड्डयाच्या तळाशी ३ ते ४ इंच जाडीच्या विटांच्या तुकड्यांचा थर द्यावा, त्यावर बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची धुरळणी करावी, त्यावर निर्जंतुक केलेल्या पाल्याचा ६ ते ८ इंच इतक्या जाडीचा थर द्यावा.◼️ खड्डयाच्या बाजूनेही तेवढ्याच जाडीच्या पाल्याचा थर द्यावा. ◼️ बेण्याचा एक फूट उंचीचा थर झाला की पुन्हा थरावर किटकनाशक, बुरशीनाशक धुरळावे.◼️ खड्डा ३ फूट इतक्या उंचीचा भरून घ्यावा त्यावर निर्जंतुक केलेल्या पाल्याचा थर टाकावा. ◼️ खड्डयामध्ये एक मीटर अंतरावर छिद्र पाडलेले अडीच ते तीन इंच व्यासाचे पीव्हीसी पाईप टाकावेत.◼️ त्यानंतर खड्डा गोणपाटाने झाकून घ्यावा पाऊस आल्यावर तेवढ्यावेळेपूरता प्लास्टिक कागदाने झाकून घ्यावा.

अधिक वाचा: उसाचे पाचट शेतात लवकर कुजण्यासाठी करा हे सोपे उपाय; वाचा सविस्तर

टॅग्स :काढणी पश्चात तंत्रज्ञानशेतीपीककीड व रोग नियंत्रणलागवड, मशागतशेतकरी