केवडा हा रोग विषाणूजन्य आहे आणि तो पांढरी माशी या रस शोषण करणाऱ्या किडींमार्फत पसरतो तसेच या रोगाला वेळीच ओळखून उपाययोजना नाही केल्यास हा रोग मोठ्या प्रमाणात पसरून पूर्ण शेत प्रादुर्भावग्रस्त करतो.
त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त झाडांना फुले, शेंगा कमी लागतात आणि पर्यायाने उत्पन्नात मोठी घट येण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या रोगाचे वेळेस नियोजन करणे गरजेचे आहे असे शास्त्रज्ञांनी सांगितले.
व्यवस्थापनाकरिता पिवळा मोझॅक (केवडा) झालेली प्रादुर्भावग्रस्त पाने, झाडे दिसून येताच ती वेळोवेळी तात्काळ समूळ काढून बांधावर न फेकता जाळून अथवा जमिनीत पुरून नष्ट करावीत जेणेकरून निरोगी झाडांवर होणारा किडीचा व रोगांचा प्रसार कमी करणे शक्य होईल.
रोगाच्या प्रसारास कारणीभूत असलेल्या पांढरी माशीच्या व्यवस्थापन
◼️ फ्लोनिकॅमीड ५०% डब्ल्युजी ८० ग्रॅम (४ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात साध्या पंपाने) किंवा
थायमिथोक्झाम १२.६% + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन ९.६% झेडसी ५० मिली (२.५ मिली प्रती १० लिटर पाण्यात साध्या पंपाने) किंवा
असिटामिप्रीड २५% + बाइफेन्थ्रीन २५% डब्ल्यूजी १०० ग्रॅम (५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात साध्या पंपाने) किंवा
बीटा साइफ्लुथ्रीन ८.४९% + इमिडाक्लोप्रीड १९.८१% ओडी १४० मिली (७ मिली प्रती १० लिटर पाण्यात साध्या पंपाने)
वरीलपैकी एका किटकनाशकाची फवारणी प्रति एकर याप्रमाणात करावी.
◼️ पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकामध्ये प्रति एकरी १० पिवळे चिकट सापळे लावावेत.
◼️ तसेच फवारणीसाठी कीटकनाशकाची व पाण्याची शिफारस केलेली मात्राच वापरावी असे आवाहन तज्ञांमार्फत करण्यात आले.
- वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
अधिक वाचा: तुरीच्या खोडावर चट्टे पडतायत असू शकतोय 'हा' रोग; कसे कराल नियंत्रण? वाचा सविस्तर