Lokmat Agro >स्मार्ट शेती > Swarnima Loan Scheme: महिलांसाठी केंद्र सरकारची 'ही' कर्ज योजना आहे फायदेशीर वाचा सविस्तर

Swarnima Loan Scheme: महिलांसाठी केंद्र सरकारची 'ही' कर्ज योजना आहे फायदेशीर वाचा सविस्तर

Swarnima Loan Scheme: latest news This loan scheme of the central government is beneficial for women, read in detail | Swarnima Loan Scheme: महिलांसाठी केंद्र सरकारची 'ही' कर्ज योजना आहे फायदेशीर वाचा सविस्तर

Swarnima Loan Scheme: महिलांसाठी केंद्र सरकारची 'ही' कर्ज योजना आहे फायदेशीर वाचा सविस्तर

Swarnima Loan Scheme: अनुसूचित जातीमधील महिलांना स्वावलंबी करण्यासाठी सरकारने एक योजना आणली आहे. यामध्ये महिलांना व्यवसायासाठी कर्ज दिले जाते. जाणून घेऊ या योजनेविषयी सविस्तर माहिती. (Swarnima Loan Scheme)

Swarnima Loan Scheme: अनुसूचित जातीमधील महिलांना स्वावलंबी करण्यासाठी सरकारने एक योजना आणली आहे. यामध्ये महिलांना व्यवसायासाठी कर्ज दिले जाते. जाणून घेऊ या योजनेविषयी सविस्तर माहिती. (Swarnima Loan Scheme)

शेअर :

Join us
Join usNext

Swarnima Loan Scheme : समाजातील विविध घटकांना स्वावलंबी बनविण्यासाठी केंद्र सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. अशी एक योजना महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी नवीन स्वर्णिम कर्ज योजना (Swarnima Loan Scheme) सुरू करण्यात आली आहे.

नॅशनल बॅकवर्ड क्लासेस फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (NBCFDC) या योजनेद्वारे, सरकार मागासवर्गीय महिलांना मुदत कर्ज देऊन स्वावलंबी बनविण्यास मदत करत आहे.

काय आहे पात्रता?

* नवीन स्वर्णिमा योजनेअंतर्गत, केंद्र/राज्य सरकारांनी वेळोवेळी अधिसूचित केल्यानुसार मागासवर्गीय महिला कर्जासाठी पात्र असतील. 

* अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा कमी असावे. योजनेअंतर्गत उपलब्ध कर्जाची रक्कम सामान्य कर्जाच्या व्याजदरापेक्षा कमी आहे. (Swarnima Loan Scheme)

कर्जाची रक्कम किती आहे?

योजनेत सहभागी महिला लाभार्थीला जास्तीत जास्त २ लाख रुपयांचे कर्ज मिळते. योजनेंतर्गत रक्कम वित्तपुरवठा करण्याची पद्धत वेगळी आहे.

NBCFDC कर्ज : ९५%
चॅनल भागीदार योगदान: ५%

किती व्याज दर असेल?

* या योजनेअंतर्गत महिलांना वार्षिक ५ टक्के इतका व्याजदर आहे. त्याच वेळी, कर्जाची परतफेड जास्तीत जास्त ८ वर्षांमध्ये करणे आवश्यक आहे.  

* कर्जाचा हप्त तिमाही आधारावर म्हणजेच ३ महिन्यांनी भरावा लागेल. या योजनेत, अटीसह सहा महिन्यांची स्थगिती देखील उपलब्ध होऊ शकते. योजनेशी संबंधित अधिक माहितीसाठी, टोल फ्री क्रमांक १८००-१०२-३३९९ व्यतिरिक्त, तुम्ही www.nbcfdc.gov.in या वेबसाइटला भेट देऊ शकता.

काय आहेत योजनेचे फायदे

* या योजनेच्या माध्यमातून कृषी, लघुव्यवसाय, पारंपरिक कारागीर, तांत्रिक व्यवसायिक वाहतूक आणि सेवा उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देणे.

* महिलांना वार्षिक ५ टक्के दराने स्वयंरोजगारासाठी २ लाख रुपयांचे कर्ज मिळते.

* महिलांना स्वतः चा व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वतः चे कोणतेही पैसे गुंतवण्याची गरज पडत नाही.

हे ही वाचा सविस्तर : Umed Abhiyan : स्वकर्तृत्वातून सव्वालाख महिलांनी साधली उन्नती; शेतीपूरक व्यवसायात भरारी

Web Title: Swarnima Loan Scheme: latest news This loan scheme of the central government is beneficial for women, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.