Join us

तण नियंत्रण आच्छादन, फळ पिकांकरिता कव्हर व हायड्रोपोनिक्ससाठी मिळतंय अनुदान; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 12:07 IST

वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर पिकास पोषक वातावरण निर्मिती करुन उच्च दर्जाचा भाजीपाला व फुलपिके घेण्यासाठी संरक्षित शेती तंत्रज्ञानाचा उत्तम पर्याय उपलब्ध आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत हरीतगृह, शेडनेटगृह, प्लास्टिक मल्चींग या घटकांचे मापदंड तसेच क्षेत्र मर्यादा उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये सुधारित करण्यात आलेल्या आहेत.

तसेच सन २०२५-२६ मध्ये फळ पिकांकरिता फळांना किंवा फळांच्या घडांना कव्हर (Fruit Cover & Crop Cover), तण नियंत्रक आच्छादन (Weed Mat), हायड्रोपोनिक्स व एरोपोनिक्स हे घटक नव्याने अंतर्भुत करण्यात आलेले आहेत.

तसेच सन २०२५-२६ या वर्षात संरक्षित शेती घटकांतर्गत वरील घटकांची महाडीबीटी प्रणालीवर अनुदान तत्वावर अंमलबजावणी करण्यात येत आहे.

जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या घटकाचा लाभ होण्यासाठी महाडीबीटी या संगणकीय प्रणालीवर संरक्षित शेती घटकांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध घटकांचे अर्ज घेणेबाबत आवाहन करणेकरीता सोबत सहपत्रित केलेल्या प्रेस नोटची आपले स्तरावरून विनामुल्य प्रसिद्धी सर्व जिल्ह्यांमध्ये करावी. 

वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर पिकास पोषक वातावरण निर्मिती करुन उच्च दर्जाचा भाजीपाला व फुलपिके घेण्यासाठी संरक्षित शेती तंत्रज्ञानाचा उत्तम पर्याय उपलब्ध आहे.

हरितगृह व शेडनेटगृहाच्या वापरामुळे फुले व भाजीपाला पिकांचे निर्यात योग्य गुणवत्तेच्या मालाचे उत्पादन होत असून त्यापासून शेतकऱ्यांना कमी क्षेत्रामध्ये खुल्या वातावरणाच्या तुलनेत ३ ते ४ पटीने उत्पादन घेता येते.

त्यामुळे हरितगृह व शेडनेटगृह उभारणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असून संरक्षित शेतीस मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.लाभाच्या योजना- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान.- राष्ट्रीय कृषि विकास योजना.

खर्चाचा मापदंड, अनुदान मर्यादा व क्षेत्र मर्यादा

बाबप्रती चौ.मी. खर्चाचा मापदंडअपेक्षित खर्च५०% देय अनुदान क्षेत्र मर्यादा
हरितगृह (OVPH)रु. १००० ते १२००५ गुंठे - ६.० लाख१० गुंठे - १०.५८ लाख२० गुंठे - २०.८० लाख२५ गुंठे - २५.०० लाख५ गुंठे - ३.० लाख१० गुंठे - ५.३८ लाख२० गुंठे - १०.४० लाख२५ गुंठे - १२.५० लाख५०० चौ.मी. ते २५०० चौ.मी
हरितगृह (CCPH)रु. १५०० ते १८००५ गुंठे - ९.० लाख१० गुंठे - १६.१२ लाख२० गुंठे - ३१.२० लाख२५ गुंठे - ३७.५० लाख५ गुंठे - ४.५० लाख१० गुंठे - ८.०६ लाख२०गुंठे - १५.६० लाख२५ गुंठे - १८.७५ लाख५०० चौ.मी. ते २५०० चौ.मी
शेडनेटगृहरु. ७१०५ गुंठे - ३.५५ लाख१० गुंठे - ७.१८ लाख२०गुंठे - १४.७६ लाख२५ गुंठे - १७.७५ लाख५ गुंठे - १.७७ लाख१० गुंठे - ३.५९ लाख२०गुंठे - ७.३८ लाख२५ गुंठे - ८.८७ लाख५०० चौ.मी. ते २५०० चौ.मी
प्लास्टिक मल्चिंगरु. ४.०४०,००० प्रति हे.२०,००० प्रति हे.जास्तीत जास्त २ हे.

नव्याने समाविष्ट घटक 

बाबप्रती चौ.मी. खर्चाचा मापदंडअपेक्षित खर्च५०% देय अनुदानक्षेत्र मर्यादा
फळ पिकांकरिता फळांना/फळांच्या घडांना कव्हर (Fruit Cover & Crop Cover)रु. ५.०रु. ५०,०००/हेरु. २५,०००/हेजास्तीत जास्त २ हे.
तण नियंत्रक अच्छादन (Weed Mat)रु. ५०.००रु. २०,००००/एकर रु. १०,००००/एकर जास्तीत जास्त ४००० चौ.मी
हायड्रोपोनिक्स एरोपोनिक्सरु. ३५०रु. ३५,००००/१० गुंठेरु. १७,५०००/१० गुंठेजास्तीत जास्त १००० चौ.मी

* अनुसुचित क्षेत्रासाठी १५ टक्के अतिरिक्त खर्चाचा मापदंड देय आहे.योजनेत सहभागी होण्यासाठीशेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत.

आवश्यक कागदपत्रेअॅग्रीस्टॅक फार्मर आयडी, ७/१२ उतारा, ८-अ, आधार कार्डाची छायांकीत प्रत, आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत, जात प्रमाणपत्र (अनु. जाती/अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी), विहीत नमुन्यातील हमीपत्र, बंधपत्र, चतुःसीमा नकाशा इत्यादी.

संपर्कअधिक माहितीसाठी नजीकच्या कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

अधिक वाचा: अचानक पडणाऱ्या विजांपासून कसे कराल जनावरांचे संरक्षण; जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेतीफुलशेतीफलोत्पादनशेतकरीकृषी योजनासरकारऑनलाइन