Join us
Daily Top 2Weekly Top 5

आंबा पिकातील मोहोर संरक्षणासाठी फवारणीचे वेळापत्रक; 'ह्या' आहेत अति महत्वाच्या सहा फवारण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 14:45 IST

amba mohor sanrakshan आंबा झाडांवर तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. जर तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास कोणत्या फवारण्या घ्याव्यात.

आंबा झाडांवर तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. जर तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास कोणत्या फवारण्या घ्याव्यात.

आंबा पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने शिफारस केलेल्या आंबा मोहोर संरक्षण वेळापत्रकाप्रमाणे किटकनाशकांची फवारणी करावी.

पहिली फवारणीमोहोर येण्यापूर्वी झाडावर पोपटी रंगाची पालवी असताना डेल्टामेथ्रीन २.८% ई.सी. @ ९ मि.ली. प्रति १० लिटर पाणी फवारावे.

दुसरी फवारणीबोंगे फुटण्याच्या अवस्थेत (मोहोर फुटण्याच्या अवस्थेत) लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५% ई.सी. @ ६ मि.ली. प्रति १० लिटर पाणी फवारावे.

तिसरी फवारणीदुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड १७.८% एस.एल. @ ३ मि.ली. प्रति १० लिटर पाणी किंवा बुप्रोफेझीन २५% ई.सी. @२० मि.ली. प्रति १० लिटर पाणी फवारावे.

चौथी फवारणीतिसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी थायमेथॉक्साम २५% डब्ल्यू.डी.जी. @ १ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी फवारावे.

पाचवी फवारणीचौथ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी डायमेथोएट ३०% ई.सी. @ १० मि.ली. प्रति १० लिटर पाणी किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५% ई.सी. @ ६ मि.ली. प्रति १० लिटर पाणी फवारावे.

सहावी फवारणीतुडतुडे किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी पेक्षा जास्त असल्यासच, पाचव्या फवारणीत वापरलेले नसलेले कीटकनाशक फवारावे.

महत्वाचेमोहोर सुरू झाल्यापासून फळधारणेपर्यंत कीटकनाशकांची फवारणी टाळावी. फवारणी अत्यावश्यक असल्यास परागीभवनाच्या कालावधीत फवारणी करू नये, जेणेकरून परागीभवन करणाऱ्या किडींना कोणतीही हानी होणार नाही.

- डॉ. बाळसाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली

अधिक वाचा: थंडीत 'ह्या' लक्षणांकडे दुर्लक्ष करणे पडेल महागात; होऊ शकतो हेमोरेजिक स्ट्रोक

English
हिंदी सारांश
Web Title : Mango Bloom Protection: Spray Schedule and Six Crucial Sprays

Web Summary : Protect mango blooms from hoppers with timely sprays, as recommended by Dr. Balasaheb Sawant Konkan Agricultural University. Avoid spraying during pollination to protect beneficial insects. Follow the schedule for optimal results.
टॅग्स :आंबाकीड व रोग नियंत्रणशेतीशेतकरीकोकणविद्यापीठपीक व्यवस्थापन