Join us
Daily Top 2Weekly Top 5

आंबा पिकातील फळमाशीचे व्यवस्थापन करण्यासाठी सोपे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 13:19 IST

सद्यस्थितीत आंबा फळांची काढणी सुरु झाली आहे तर काही ठिकाणी अजून बाकी आहे तसेच मागून आलेला मोहोर त्यामुळे अजून पूर्ण फळ तयार झाली नाहीत अशावेळी आंबा पिकात फळमाशीचा प्रादुर्भाव होताना दिसतो आहे.

सद्यस्थितीत आंबा फळांची काढणी सुरु झाली आहे तर काही ठिकाणी अजून बाकी आहे तसेच मागून आलेला मोहोर त्यामुळे अजून पूर्ण फळ तयार झाली नाहीत अशावेळी आंबा पिकात फळमाशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो यासाठी काही उपाययोजना खालीलप्रमाणे.

  • आंबा फळांचे फळमाशी पासून संरक्षण करण्यासाठी तसेच फळांचा आकार व वजन वाढून डाग विरहीत फळे मिळविण्यासाठी, गोटी ते अंडाकृती आकाराच्या फळांना डॉ.बा.सा.कॉ.कृ. वि‌द्यापीठाने दिलेल्या शिफारशी नुसार २५ x २० सें.मी. आकाराची कागदी/वर्तमानपत्रापासून बनविलेल्या पिशव्यांचे आवरण घालावे.
  • आवरण घालताना फळाच्या देठाकडे इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • फळमाशीच्या व्यवस्थापनासाठी बागेमधील गळलेली फळे गोळा करून नष्ट करावीत आणि विद्यापीठाने शिफारस केलेले "रक्षक फळमाशी सापळा" प्रती एकरी २ या प्रमाणात बागेमध्ये झाडांच्या उंचीप्रमाणे साधारण जमिनीपासून २ ते ३ मीटर उंचीवर राहील अशा प्रकारे टांगावा.
  • उष्णतेमुळे फळांचे तापमान वाढून साक्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने फळांची काढणी सकाळी १० वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी ४ वाजल्यानंतर उन्हाची तीवता कमी झाल्यावर करावी.
  • फळे काढल्यानंतर लगेचच सावलीमध्ये ठेवावीत तसेच आंबा फळांची वाहतूक रात्रीच्या वेळेस करावी.

अधिक वाचा: काजू पिकातील कीड नियंत्रण कसे कराल?

टॅग्स :आंबाकीड व रोग नियंत्रणशेतकरीपीकफळेकोकण