lokmat Supervote 2024
Lokmat Agro >स्मार्ट शेती > Onion Storage; कांदा चाळीत साठवायचाय मग घ्या ह्या योजनेचा लाभ

Onion Storage; कांदा चाळीत साठवायचाय मग घ्या ह्या योजनेचा लाभ

Onion Chaal Funding Scheme under National Horticulture Mission | Onion Storage; कांदा चाळीत साठवायचाय मग घ्या ह्या योजनेचा लाभ

Onion Storage; कांदा चाळीत साठवायचाय मग घ्या ह्या योजनेचा लाभ

शास्त्रीयदृष्ट्या कांदाचाळ उभारणीमुळे कांद्याची योग्य गुणवत्ता राखली जाऊन कांदा नुकसान होण्याचे प्रमाण कमी होऊन शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळते.

शास्त्रीयदृष्ट्या कांदाचाळ उभारणीमुळे कांद्याची योग्य गुणवत्ता राखली जाऊन कांदा नुकसान होण्याचे प्रमाण कमी होऊन शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळते.

शेअर :

Join us
Join usNext

सर्वसाधारणपणे कांदा जमिनीवर पसरवून ठेवून किंवा पारंपारिक पद्धतीने तयार केलेल्या चाळीमध्ये कांद्याची साठवणूक करतात. त्यामुळे कांदा सडतो व मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. तसेच कांद्याची प्रत व टिकाऊपणा यावर विपरीत परिणाम होतो.

शास्त्रीयदृष्ट्या कांदाचाळ उभारणीमुळे कांद्याची योग्य गुणवत्ता राखली जाऊन कांदा नुकसान होण्याचे प्रमाण कमी होऊन शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळते.  

अर्थसहाय्यचे  स्वरूप
५, १०, १५, २० व २५ मे. टन क्षमतेच्या कांदा चाळ उभारणीसाठी येणाऱ्या खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल रुपये ३,५००/- प्रति मे. टन याप्रमाणे क्षमतेनुसार अर्थसहाय्य देय राहील. एका लाभार्थ्याला २५ मे टन क्षमतेच्या कमाल मर्यादा पर्यंतच अनुदान देय राहील. 

लाभार्थी निवडीचे निकष
१) शेतकऱ्याने योजने अंतर्गत अर्ज करतांना त्यांच्या स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे. ७/१२ वर कांदा  पिकाची नोंद असणे आवश्यक आहे.
२) शेतकऱ्याकडे कांदा पिक असणे बंधनकारक आहे. 
३) सादर योजनेचा लाभ वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी, शेतकऱ्यांचा गट, स्वयंसहायता गट, शेतकरी महिला गट, शेतकऱ्यांचे उत्पादक संघ, नोंदणीकृत शेतीसंबंधी संस्था, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था, सहकारी पणन संघ यांना घेता येईल. 

ऑनलाईन नोंदणी करताना आवश्यक असणारे कागदपत्रे 
अ) ७/१२
ब) ८ अ 
क) आधार कार्डाची छायांकित प्रत 
ड) आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत
इ) जातीचा प्रमाणपत्र (अनु.जाती/अनुजमाती शेतकऱ्यांसाठी)
ई) यापूर्वी कोणत्याही योजनेतून कांदाचाळीचा लाभ घेतला नसल्याबाबतचे हमीपत्र

अर्ज कसा करावा
- सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी हॉर्टनेटया ऑनलाईन संकेतस्थळावर नोंदणी करावी.
- शेतकऱ्यांनी हॉर्टनेट प्रणालीवर अर्ज नोंदणी केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे वरिल कागदपत्रांसह अर्ज सादर करावा. 
- तालुका कृषी अधिकारी यांचेकडून पूर्व संमती मिळाल्यानंतर काम कांदाचाळ उभारणीचे काम सुरु करावे.
पूर्वसंमती दिल्यापासून दोन महिन्याच्या आत कांदाचाळ उभारणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

अधिक वाचा: जमिनीचे तुकडे पडतायत; शेती आली गुंठ्यात शेतकरी झाला अत्यल्पभूधारक

Web Title: Onion Chaal Funding Scheme under National Horticulture Mission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.