Join us

Mrutyupatra : मृत्युपत्र म्हणजे काय? ते का व कसे करावे? जाणून घ्या कायदेशीर प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 09:54 IST

Mrutyupatra आपली मालमत्ता तुम्ही आपल्या इच्छेप्रमाणे कोणालाही देऊ शकता. मृत्युपत्र जर केलेले नसेल तर मात्र मृत्यूनंतर ही मालमत्ता वारसांना वारसाहक्कानं मिळते.

स्वकमाईची आणि स्वतःच्या मालकीची, स्वतः खरेदी केलेली मालमत्ता आपल्या हयातीनंतर योग्य व्यक्तीच्या हाती पडावी अशी आपली इच्छा असेल तर त्यासाठी मृत्युपत्र करणं हा सर्वात सुरक्षित आणि चांगला मार्ग आहे.

ही मालमत्ता तुम्ही आपल्या इच्छेप्रमाणे कोणालाही देऊ शकता. मृत्युपत्र जर केलेले नसेल तर मात्र मृत्यूनंतर ही मालमत्ता वारसांना वारसाहक्कानं मिळते.

आपल्या मृत्यूनंतर आपली मालमत्ता, संपत्ती किंवा हक्क कोणाला आणि कशा प्रकारे द्यायचे यासंदर्भात मृत्युपत्र तयार केलं तर ते अधिक श्रेयस्कर असतं.

महाराष्ट्रात मृत्युपत्राची नोंदणी करणं कायद्यानं बंधनकारक नाही, पण नोंदणी केलेली असली तर भविष्यात वाद निर्माण झाल्यास मृत्युपत्र हा अधिक विश्वसनीय पुरावा ठरतो.

मृत्युपत्र तयार करणाऱ्यानं आपलं पूर्ण नाव, पत्ता, जन्मतारीख आणि मालमत्तेचं स्पष्ट वर्णन लिहावं. कोणत्या व्यक्तीला कोणती मालमत्ता द्यायची हे त्यात स्पष्टपणे नमूद करावं.

मृत्युपत्र लिहिल्यानंतर दोन प्रौढ साक्षीदारांनी त्यावर सही करणं आवश्यक असतं. लक्षात ठेवा, ज्यांना तुम्ही आपली मालमत्ता देणार आहात, म्हणजे मालमत्तेचा लाभ घेणारेच साक्षीदार नसावेत.

सोबत डॉक्टरांचे प्रमाणपत्र असल्यास उत्तम. संबंधित उपनोंदणी कार्यालयात (सब रजिस्ट्रार ऑफिस) मूळ मृत्युपत्र, ओळखपत्र, दोन साक्षीदारांच्या सह्या आणि काही प्रमाणात नोंदणी शुल्क भरल्यानंतर मृत्युपत्र नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होते.

मृत्युपत्र तयार करणाऱ्या व्यक्तीला आपल्या हयातीत ते कधीही, कितीही वेळा बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार असतो. शेवटचे मृत्युपत्र ग्राह्य धरले जाते. अट एकच, ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या सक्षम असली पाहिजे.

अधिक वाचा: तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत? घरबसल्या चेक करा आता तुमच्या मोबाईलवर

English
हिंदी सारांश
Web Title : Will: Secure your assets, understand the legal process of making one.

Web Summary : A will ensures your assets are distributed as desired. Registration isn't mandatory in Maharashtra but strengthens its validity. Include details like name, address, asset descriptions, and beneficiaries. Two adult witnesses are needed, excluding beneficiaries. You can alter or revoke your will anytime while mentally sound.
टॅग्स :मृत्यूमहाराष्ट्रन्यायालयकुलसचिवडॉक्टर