भारताव्यतिरिक्त मेक्सिको, ब्राझिल, चीन, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इस्त्राईल अशा अनेक देशांमध्ये आंबा उत्पादन होते. एकूण लागवड क्षेत्रामध्ये भारत आघाडीवर असला तरी भारताची हेक्टरी उत्पादकता ही अत्यंत कमी आहे.
भारतात (हे. ८ टन), तुलनेत दक्षिण आफ्रिका (हे. ४० टन), इस्त्राईल (हे. ३५ टन) असून उत्पादनाच्या बाबतीत आघाडीवर आहेत. त्यातही महाराष्ट्राची उत्पादकता सव्वा चार टन इतकीच आहे.
उत्पादकतेमध्ये मागे असण्यामागे आजही कोणत्याही नवीन तंत्रज्ञानाच्या वापराविना पारंपरिक पद्धतीनेच लागवड केली जाते हे प्रमुख कारण दिसत आहे.
भारतातील हेक्टरी झाडांची संख्या व अंतर (मीटर)
अंतर | हेक्टरी झाडांची संख्या |
१३ x १३ | ५९ |
१० x १० | १०० |
५ x ५ | ४०० |
६ x २ | ८३३ |
६ x ३ | ५५५ |
५ x ४ | ५०० |
५ x ३ | ६६६ |
१.५ x ४ | १,६६६ |
१.५ x ३ | २,२२२ |
अतिघन लागवडीचे फायदे◼️ उपलब्ध जमीन आणि संसाधने यांचा उत्तम वापर.◼️ आंबा बाग आंतर मशागतीस अतिशय सोयीस्कर.◼️ बागेत फळधारणा लवकर येवून, नियोजन करता येते.◼️ सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त उपयोग करता येतो.◼️ कार्बन डायऑक्साइड जड असल्यामुळे वातावरणात खालच्या थरात जास्त आढळतो, त्यामुळे खालच्या फांद्यातील पानांमध्ये प्रकाश संश्लेषण जास्त चांगले होण्यास मदत होते.◼️ गुणवत्तापूर्ण उत्तम प्रतिची फळे आणि एकरी जास्त उत्पन्न घेणे शक्य आहे.◼️ आधुनिक तंत्रज्ञानाचा सहज वापर करता येतो.◼️ लवकर आर्थिक उत्पादन मिळते व फवारणी, खते देणे, आंतरमशागत तसेच फळांची अंतर्गत वाहतूक इत्यादी कामे ट्रॅक्टरने सहज करता येतात.◼️ फळांची काढणी सहज करता येते.◼️ निर्यात योग्य फळांची गुणवत्ता मिळवण्यासाठी फळांची विरळणी करणे अतिशय सोपे होते.◼️ फळांना पिशव्या लावणे देखील सोपे जाते.◼️ प्रति हेक्टरी उत्पन्नात वाढ होवून आर्थिक विकास वाढू शकतो.
अधिक वाचा: सामायिक शेतजमिनीची वाटणी करता येते का? काय आहे नियम? जाणून घ्या सविस्तर