Join us

Mango Rejuvenation जुन्या आंबा बागेचं उत्पादन कसं वाढवाल, असे करा व्यवस्थापन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 10:17 AM

आंब्याची झाड जसजशी मोठी होतात, त्याचा विस्तार वाढतो. सूर्यप्रकाश, हवासुध्दा खेळती राहत नाही, त्यामुळे डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापिठाने आंबा बागांचं पुनरूज्जीवन करण्याची शिफारस केली आहे.

आंब्याची झाड जसजशी मोठी होतात, त्याचा विस्तार वाढतो. सूर्यप्रकाश, हवासुध्दा खेळती राहत नाही, त्यामुळे डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापिठाने आंबा बागांचं पुनरूज्जीवन करण्याची शिफारस केली आहे.

असे करा व्यवस्थापन

  • झाडाच्या मध्ये फांदीची छाटणी करावी. तसेच मोठ्या झाडाच्या एक तृतीयांश फांद्यांची छाटणी करावी.
  • छाटणी केलेल्या फांद्यावर येणाऱ्या पालवीचे काटेकोरपणे नियोजन करावे.
  • खोडकिडा व इतर रोगांपासून संरक्षण करावे.
  • झाडांना लागणाऱ्या अन्नद्रव्यांचे योग्य व्यवस्थापन करावे. संजीवकांचा योग्य प्रकारे वापर करावा. गरजेनुसार पाणी द्यावे.
  • फळगळतीचे योग्यप्रकारे व्यवस्थापन करावे. झाडांची छाटणी शक्यतो ऑक्टोबर किंवा मार्च महिन्यात करावी.
  • शक्यतो ज्या झाडांपासून कमी उत्पादन मिळते, ज्या बागेतील झाडे खूप उंच वाढली आहेत, त्या बागांमध्ये फवारणी, फळांची काढणी इत्यादी काम निटपणे करणे अवघड झाले आहे, तसेच शास्त्रीय वाढ अत्यंत घट्ट झाल्यामुळे सूर्यप्रकाश झाडातील आंतील भागापर्यंत पोहोचत नाही, अशा बागा निवडाव्यात.
  • डोंगरउतारावर वसलेल्या बागांमध्ये रोग आणि किडीचा प्रादूर्भाव दरवर्षी मोठ्या प्रमाणावर होतो. फवारणी करूनही तो आटोक्यात येत नाही. अशा बागा पुनरूज्जीवनासाठी योग्य असतात.
  • शिवाय ज्या बागांमधील झाडे अशक्त आहेत, झाडांच्या फांद्या वाळण्याचे प्रमाण वाढले आहे, आणि उत्पादकता कमी झाली आहे, अशा बागांचे पुनरूज्जीवन करणे आवश्यक आहे.
  • तसेच ज्या बागांमध्ये योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन झालेले नाही आणि पीक संरक्षण उपाययोजना केलेल्या नाहीत, अशा उत्पादकता अत्यंत कमी झालेल्या बागा पुनरूज्जीवनासाठी योग्य असतात.
  • निकषानुसार छाटणीसाठी योग्य झाडांची निवड करावी लागते. सर्वसाधारणपणे तिसऱ्या वाढीव फांद्यांची छाटणी करावी.
  • ज्यांची छाटणी करायची आहे त्या फांद्यावर योग्य उंचीची खूण करावी. जुन्या आणि उंच झाडांची छाटणी बुंध्यापासून दोन तृतीयांश उंचीवर करावी.
  • कमी वयाच्या आणि कमी उंचीच्या झाडांची छाटणी १२ ते १५ फूट उंचीवर करावी. कमी उंचीवरील फांद्यांची छाटणी चेन सॉ किंवा करवतीने करावी. उंच फांद्याची छाटणी करण्यासाठी पोल प्रूनरचा वापर करावा.
  • छाटणी करताना काप तिरका असावा, जेणेकरून त्यावर पावसाचं पाणी थांबणार नाही.

छाटणीनंतरची काळजी

  • छाटणी केलेल्या बागेतल्या फांद्या गोळा करून बाग स्वच्छ करावी.
  • छाटणी केलेल्या झाडांवर क्लोरोपायरीफॉस हे कीटकनाशक ५ मि.ली. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारून संपूर्ण झाड भिजवून घ्यावे.
  • झाडे भिजवून झालेनंतर एक लिटर ब्लॅक जपान डांबरामध्ये कार्बेन्डेझिम २.५ ग्रॅम भुकटी मिसळून ते कापलेल्या फांद्यांच्या टोकाशी लावावे.
  • तसेच क्लोरोपायरीफॉसचे द्रावण छाटणी केलेल्या झाडांना सुरुवातीला पाणी द्यावे.
  • प्रत्येक झाडाला १० ते १५ दिवसांच्या अंतराने १५० ते २०० लिटर पाणी द्यावे.
  • छाटणी केलेल्या खोडाच्या भागावर ३/५ फुटवे ठेवून बाकीचे फुटवे काढून टाकावेत.

अधिक वाचा: उन्हाळ्यात केळी बागेला कशी सांभाळाल, वाचा हे सोपे उपाय

टॅग्स :आंबापीकफलोत्पादनफळेपीक व्यवस्थापनकोकणशेतकरीकीड व रोग नियंत्रण