Join us

Maka Lagwad : मका पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी कोणते वाण निवडाल? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 13:34 IST

बागायतीखालील बरेचसे क्षेत्र मका लागवडीखाली येत असून शेतकरी उत्पादन वाढीसाठी नवनवीन संकरीत जातींचा वापर करीत आहे.

मक्याचा वापर अन्नधान्य, पशुखाद्य, पोल्ट्रीखाद्य तसेच त्यापासून तयार होणारे मूल्यवर्धित खाद्य पदार्थ यासाठी होतो. त्याचबरोबर बाजारातील मक्याची वाढती मागणी आणि उत्पादन यांतील तफावतीचा फायदा शेतकऱ्यांना होत असून मक्यास चांगला दर मिळत आहे.

बागायतीखालील बरेचसे क्षेत्र मका लागवडीखाली येत असून शेतकरी उत्पादन वाढीसाठी नवनवीन संकरीत जातींचा वापर करीत आहे. शेतकऱ्यांनी शास्रोक्त मका लागवड तंत्रज्ञान आत्मसात केल्यास त्यांच्या उत्पादनात नक्कीच वाढ होऊन त्यांना फायदा होईल.

संकरीत वाण१) ह्युनिससरासरी उत्पादन (किं/हे.) : ४५-५०वैशिष्ट्ये : दाण्यांचा रंग पिवळा, खोडकिड व तांबेरा रोगास मध्यम प्रतिकारक्षम, खरीप व रब्बी हंगामात आंतरपिक घेण्यास योग्य.

२) मांजरी (संयुक्त वाण)सरासरी उत्पादन (किं/हे.) : ४०-५०वैशिष्ट्ये : लालसर पिवळे दाणे.

३) आफ्रिकन टॉल (संयुक्त वाण)सरासरी उत्पादन (किं/हे.) : ६० ते ७० टन हिरवा चारावैशिष्ट्ये : उंच वाढ होणारा, लांगब पानांचा वाण, पर्ण करपा रोगास प्रतिकारक्षम, चाऱ्यासाठी उत्तम.

४) पंचगंगा (संयुक्त वाण)सरासरी उत्पादन (किं/हे.) : ४५-४८वैशिष्ट्ये : दाण्यांचा रंग पांढरा, कमी कालावधीत पक्व होणारा, पर्णकरपा रोगास प्रतिकारक्षम, आंतरपिक म्हणून घेण्यास योग्य.

५) करवीर (संयुक्त वाण)सरासरी उत्पादन (किं/हे.) : ५२-५५ (खरीप) ६५-६८ (रब्बी)वैशिष्ट्ये : दाण्यांचा रंग नारंगी, टपोरा दाणा, किड व रोगास प्रतिकारक्षम खरीप व रब्बी दोन्ही हंगामासाठी उत्तम.

६) राजर्षी (संकरीत वाण)सरासरी उत्पादन (किं/हे.) : ४५-४८वैशिष्ट्ये : दाण्यांचा रंग नारंगी, मध्यम चपटा दाणा, मध्यम कालावधीत पक्क्व होणारा, पर्णकरपा रोगास तसेच खोडकिड व सोंड्या भुंगा यांस प्रतिकारक्षम, खरीप व रब्बी हंगामात घेण्यासाठी उत्तम. स्टार्चचे प्रमाण अधिक (७२.२५%)

७) फुले महर्षी (संकरीत वाण)सरासरी उत्पादन (किं/हे.) : ७५-८० (खरीप) ८५-९० (रब्बी)वैशिष्ट्ये : दाण्यांचा रंग नारंगी, मध्यम चपटा दाणा, मध्यम कालावधीत पक्व होणारा, (९०-१०० दिवस), मेडीस पर्ण करपा (MLB), फ्युजारिअम खोड कुज, रोगांस व खोडकिडीस प्रतिकारक्षम टर्सिकम पर्ण करपा (TLB), पट्टेरी पर्ण व खोड कुज (BLSB) आणि काळी खोडकुज (C. Rot) रोगांस मध्यम प्रतिकारक्षम, पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता व शेतात न पडणारा वाण.

८) फुले मधूसरासरी उत्पादन (किं/हे.) : १२८.६४ (हिरवी कणसे) ११५.८३ (हिरवा चारा)वैशिष्ट्ये : दाण्यांचा रंग पिवळा, चपटा दाणा, वाळल्यानंतर नारंगी दाणा, गोड (ब्रिक्स) १४.८९% टर्सिकम पर्ण करपा, मेडिस पर्ण करपा, काळी खोडकुज आणि फ्युजारिअम खोड कुजरोगांस मध्यम प्रतिकारक्षम. खोड किडीस प्रतिकारक्षम.

अधिक वाचा: Rabi Sowing : पेरणीसाठी घरचे बियाणे वापरताय मग अशी करा उगवण क्षमता चाचणी

टॅग्स :मकापीकपीक व्यवस्थापनपेरणीलागवड, मशागत