Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > पॉलीहाऊसमध्ये 'ही' पिके सर्वात जास्त नफा मिळवून देतील? जाणून घ्या सविस्तर 

पॉलीहाऊसमध्ये 'ही' पिके सर्वात जास्त नफा मिळवून देतील? जाणून घ्या सविस्तर 

Latest news Will 'these' crops yield highest profits in polyhouses Know in detail | पॉलीहाऊसमध्ये 'ही' पिके सर्वात जास्त नफा मिळवून देतील? जाणून घ्या सविस्तर 

पॉलीहाऊसमध्ये 'ही' पिके सर्वात जास्त नफा मिळवून देतील? जाणून घ्या सविस्तर 

Polyhouse Farming : अलीकडे पॉलीहाऊस शेतीला प्राधान्य मिळू लागले आहे. पॉलीहाऊस शेतीच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळवता येते.

Polyhouse Farming : अलीकडे पॉलीहाऊस शेतीला प्राधान्य मिळू लागले आहे. पॉलीहाऊस शेतीच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळवता येते.

शेअर :

Join us
Join usNext

Polyhouse Farming : आपल्या देशातील बहुतेक शेतकरीशेतीला फायदेशीर व्यवसाय म्हणून पाहू लागले आहेत. अलीकडे पॉलीहाऊस मधील शेतीला प्राधान्य मिळू लागले आहे. पॉलीहाऊस शेतीच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळवता येते. पॉलीहाउसमध्ये कोणकोणती पिके घेता येतील, ज्याद्वारे चांगले उत्पन्न मिळू शकेल, जाणून घेऊयात... 

पॉलीहाऊस ही शेतीची एक आधुनिक पद्धत आहे. लोखंड, जीआय पाईप किंवा बांबूपासून एक रचना तयार केली जाते आणि त्यावर एक पारदर्शक प्लास्टिक शीट ठेवली जाते. पारदर्शक प्लास्टिक सूर्यप्रकाश मुक्तपणे आत प्रवेश करू देते. पॉलीहाऊस तंत्रज्ञान सुरक्षित शेती मानले जाते. पॉलीहाऊसमध्ये पिके घेतल्याने कीटक, रोग, अवकाळी पाऊस, जास्त सूर्यप्रकाश, थंड वारे आणि जास्त पाण्यापासून संरक्षण होते.

पॉलीहाऊसमध्ये कोणती पिके घ्यावीत?
पॉलीहाऊसमध्ये शेती करणाऱ्या लोकांना हे माहित असले पाहिजे की भात, गहू, ज्वारी आणि बाजरी ही पिके आत घेतली जात नाहीत. पॉलीहाऊसचा वापर नगदी पिके आणि बागायती पिकांसाठी केला जातो. 

कमी कालावधीची पिके घेता येतात. ज्यामध्ये प्रामुख्याने गुलाब, जरबेरा, कार्नेशन आणि ग्लॅडिओलस सारखी फुले घेतली जातात. शिवाय वाटाणे, काकडी, सिमला मिरची आणि वांगी यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, फळे, मसाले आणि औषधी वनस्पतींची लागवड केल्याने मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते.

या गोष्टी लक्षात ठेवा

  • पॉलीहाऊस ही एक आधुनिक शेती तंत्र आहे, म्हणून पहिल्यांदाच त्यांचा अवलंब करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण घेतले पाहिजे. 
  • ज्या ठिकाणी पॉलिहाऊस उभे करायचे आहे, अशा ठिकाणी पाण्याची सोय असायला हवी. 
  • पॉलीहाऊस अशा ठिकाणी बांधा जिथे सूर्यप्रकाश मिळेल.
  • पुरेसा वायुवीजन सुनिश्चित करा; वायुवीजन नसल्यामुळे तापमान वाढेल.
  • शेती करण्यापूर्वी ठिबक सिंचन लावणे देखील आवश्यक आहे.
     

Web Title : पॉलीहाउस में अधिकतम लाभ: सर्वोत्तम फसलें

Web Summary : पॉलीहाउस खेती बेहतर उपज और सुरक्षा प्रदान करती है। गुलाब जैसे फूल और शिमला मिर्च जैसी सब्जियां आदर्श हैं। उचित वेंटिलेशन, पानी और प्रशिक्षण सफलता के लिए आवश्यक हैं।

Web Title : Maximize Profit: Best Crops for Polyhouse Farming Revealed

Web Summary : Polyhouse farming offers protection and higher yields. Ideal crops include flowers like roses and vegetables like capsicum. Proper ventilation, water access, and training are essential for success.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.