Lokmat Agro >स्मार्ट शेती > आंबा बागेत वाढ नियंत्रकाचा वापर केव्हा आणि कसा करावा? जाणून घ्या सविस्तर 

आंबा बागेत वाढ नियंत्रकाचा वापर केव्हा आणि कसा करावा? जाणून घ्या सविस्तर 

Latest News When and how to use growth regulators in mango farm Learn in detail | आंबा बागेत वाढ नियंत्रकाचा वापर केव्हा आणि कसा करावा? जाणून घ्या सविस्तर 

आंबा बागेत वाढ नियंत्रकाचा वापर केव्हा आणि कसा करावा? जाणून घ्या सविस्तर 

Mango Farming : आंबा बागेत वाढ नियंत्रकांचा वापर फळांचा (Use of growth regulators in mango farm) आकार वाढवण्यासाठी, फळगळ थांबवण्यासाठी आणि झाडांची वाढ नियंत्रित करण्यासाठी केला जातो.

Mango Farming : आंबा बागेत वाढ नियंत्रकांचा वापर फळांचा (Use of growth regulators in mango farm) आकार वाढवण्यासाठी, फळगळ थांबवण्यासाठी आणि झाडांची वाढ नियंत्रित करण्यासाठी केला जातो.

शेअर :

Join us
Join usNext

Mango Farming :  आंबा बागेत वाढ नियंत्रकांचा वापर फळांचा (Use of growth regulators in mango farm) आकार वाढवण्यासाठी, फळगळ थांबवण्यासाठी आणि झाडांची वाढ नियंत्रित करण्यासाठी केला जातो.

विशेषतः पॅक्लोबुट्राझोल सारख्या वाढ नियंत्रकांचा वापर आंब्याच्या झाडांची उंची आणि वाढ नियंत्रित करण्यासाठी केला जातो. मात्र नियंत्रकाचा वापर करताना काय काळजी घ्यावी, हे समजून घेऊयात... 

  • पॅक्लोब्युट्राझॉल देण्यापूर्वी व दिल्यानंतर झाडाभोवती उगवलेल्या तणांचा, झुडुपांचा नाश करावा. 
  • कारण गवत व झुडुपांच्या मुळांचा पॅक्लोब्युट्राझॉलशी संपर्क आल्यास त्यांच्या मुळांमार्फत पॅक्लोब्युट्राझॉल शोषले जाते. 
  • त्यामुळे आंब्याच्या झाडांना अपुरी मात्रा मिळते. यामुळे अपेक्षित परिणाम दिसून येत नाही.
  • पॅक्लोब्युट्राझॉल दिल्यानंतर तीन ते चार महिन्यांनी झाडाला मोहोर येण्यास सुरुवात होते. 
  • अशा मोहोराचे कीड व रोगांपासून संरक्षण करावे.
  • पॅक्लोब्युट्राझॉल दिलेल्या झाडापासून दरवर्षी अपेक्षित उत्पादनानुसार खतांच्या वाढीव मात्रा सेंद्रिय आणि रासायनिक खताच्या स्वरुपात सम प्रमाणात द्याव्यात.
  • अशक्त झाडांना पॅक्लोब्युट्राझॉल देऊ नये.
  • पावसाची तीव्रता अधिक असलेल्या दिवसांत पॅक्लोब्युटाझॉल देऊ नये.
  • आंबा लागवडीमध्ये सुरवातीच्या काळात उत्पादन मिळण्यासाठी नाचणी, वरई, तीळ, भुईमूग, भाजीपाला, कंदपिके इत्यादींची लागवड करता येते.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

Web Title: Latest News When and how to use growth regulators in mango farm Learn in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.