Lokmat Agro >स्मार्ट शेती > Unhali Bhuimug : उन्हाळी भुईमुंगासाठी तुषार सिंचन करा, 20 टक्के उत्पादन वाढवा!

Unhali Bhuimug : उन्हाळी भुईमुंगासाठी तुषार सिंचन करा, 20 टक्के उत्पादन वाढवा!

Latest news Unhali Bhuimug Use frost irrigation for summer peanuts, increase production by 20 percent! | Unhali Bhuimug : उन्हाळी भुईमुंगासाठी तुषार सिंचन करा, 20 टक्के उत्पादन वाढवा!

Unhali Bhuimug : उन्हाळी भुईमुंगासाठी तुषार सिंचन करा, 20 टक्के उत्पादन वाढवा!

Unhali Bhuimug : उन्हाळी भुईमुंगासाठी तुषार सिंचन कसं फायद्याचे आहे, हे जाणून घेऊयात.... 

Unhali Bhuimug : उन्हाळी भुईमुंगासाठी तुषार सिंचन कसं फायद्याचे आहे, हे जाणून घेऊयात.... 

शेअर :

Join us
Join usNext

Unhali Bhuimug : उन्हाळी भुईमुंगासाठी (Summer Groundnut) तुषार सिंचन पद्धत (Drip Irrigation) फायदेशीर ठरते. तुषार सिंचनामुळे पाण्याची बचत होते आणि पिकांची वाढ चांगली होते, तसेच सिंचनाचे व्यवस्थापन सोपे होते. उन्हाळी भुईमुंगासाठी तुषार सिंचन कसं फायद्याचे आहे, हे जाणून घेऊयात.... 


उन्हाळी भुईमुंगासाठी तुषार सिंचन 

  • तुषार सिंचन पद्धतीची सिंचन कार्यक्षमता ८०-८२ टक्के इतकी आहे. 
  • तसेच ३०-३५ टक्के पाणी बचत आणि १५ ते २० टक्के उत्पादनात वाढ होते. 
  • तुषार सिंचनाने पिकाभोवती सूक्ष्म वातावरण निर्मिती होऊन पीक जोमदार वाढते. 
  • जमीन भुसभुशीत व वाफसा स्थितीत राहिल्याने आऱ्या लागण्याचे व पोसण्याचे प्रमाण वाढते. पिकाची वाढ निरोगी होते.
  • रोग-किडींचा प्रादुर्भाव कमी होतो, त्यामुळे पाल्याची प्रत सुधारल्याने उत्तम प्रतीचा चारा मिळतो. 
  • या पद्धतीत दोन नोझलमध्ये साधारणपणे १२ x १२ मीटर अंतर ठेवावे. यासाठी २ ते ३.५ कि. ग्रॅम/चौ.मी. इतका दाब
  • आवश्यक आहे. तर पाणीफवारणीचा वेग साधारण ताशी १.५ ते २ सें.मी. इतका असतो.
  • तुषार सिंचन पद्धतीने पाणी देताना तुषार संचाचा पाणी देण्याचा, मुरण्याचा वेग साधारणपणे १.५-२.० सें.मी. तास इतका असतो. 
  • हे विचारात घेऊन साधारणपणे ५० मिमी (५ सें.मी) बाष्पीभवन झाल्यानंतर ५ सें.मी खोलीचे पाणी देण्यासाठी संच दोन ते तीन तास चालवावा.
  • गादीवाफ्यावर भुईमूग लागवड किंवा प्लॅस्टिक आच्छादनावर भुईमूग लागवड असेल, तर तुषार सिंचन पद्धत अधिक फायदेशीर ठरते.

 

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

Web Title: Latest news Unhali Bhuimug Use frost irrigation for summer peanuts, increase production by 20 percent!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.