Lokmat Agro >स्मार्ट शेती > Godawari Tur : यंदाही गोदावरी तुरीचे भरघोस उत्पादन घ्यायचंय, 'या' गोष्टी समजून घ्या!

Godawari Tur : यंदाही गोदावरी तुरीचे भरघोस उत्पादन घ्यायचंय, 'या' गोष्टी समजून घ्या!

Latest News Understand cultivation technology of Godavari variety for tur farming | Godawari Tur : यंदाही गोदावरी तुरीचे भरघोस उत्पादन घ्यायचंय, 'या' गोष्टी समजून घ्या!

Godawari Tur : यंदाही गोदावरी तुरीचे भरघोस उत्पादन घ्यायचंय, 'या' गोष्टी समजून घ्या!

Godawari Tur : मागील खरीप हंगामात (Kharif Season) वर्ष 2024 मध्ये या वाणाचे अतिशय दर्जेदार असे उत्पादन निघाले. 

Godawari Tur : मागील खरीप हंगामात (Kharif Season) वर्ष 2024 मध्ये या वाणाचे अतिशय दर्जेदार असे उत्पादन निघाले. 

शेअर :

Join us
Join usNext

Godawari Tur : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ (Marathwada Krushi Vidyapith) अंतर्गत जालना जिल्ह्यातील बदनापूर कृषि संशोधन केंद्राने तूर, मूग, उडीद आणि हरभरा आदी पिकाचे अनेक चांगले वाण निर्मित केलेली आहेत. मागील खरीप हंगामात (Kharif Season) वर्ष 2024 मध्ये या वाणाचे अतिशय दर्जेदार असे उत्पादन निघाले. 

गोदावरी म्हणजेच बीडीएन (Godawari Tur) 2013 -41 आहे. या वाणाचे दाणे पांढऱ्या रंगाची आहे. या वाणाचा कालावधी हा साधारण 170 दिवसाचा आहे. त्यामुळे हमखास पाणी देण्याची व्यवस्था असेल तरच शेतकऱ्यांनी या वाणाची निवड करावी. कारण तूर पिकाची (Tur Crops) गुंडी अवस्था ते शेंगांत दाणे भरणे हा कालावधी महत्वाचा असतो. या कालावधीत पिक संरक्षण आणि पाणी व्यवस्थापन फार महत्वाचे असते. 

लागवडीसाठी अंतर किती असावे? 
दोन ओळीतील अंतर चार फूट आणि रोपातील अंतर दीड फूट असावे. पण अनेक शेतकरी यापेक्षा जास्त अंतरावर लागवड करतात. 
काही शेतकऱ्यांनी दोन ओळीतील अंतर आठ फूट ठेवतमध्ये मूग, उडीद आणि सोयाबीन या पैकी एक पिकाची निवड करत आंतरपीक घेतले. 
लागवडीचे अंतर निश्चित करताना शेतकरी बांधवांनी आपली जमिनीची प्रत, पाणी व्यवस्थापन या बाबी विचारात घ्याव्यात. 
  
गोदावरी तूर लागवड तंत्रज्ञान 

  • बियाणे टोकन पद्धतीने एकरी 2 किलो 
  • लागवड करण्यापूर्वी बीज प्रक्रिया महत्वाची
  • एफआयआर म्हणजे बीज प्रकिया करतेवेळी प्रथम बुरशीनाशक वापरावे. नंतर कीटकनाशक वापरावे आणि यानंतर अर्धा तासाने सावलील जैविक बुरशी नाशक वापरावे. 
  • यात बहुतेक बियाणांची रासायनिक बीज प्रकिया ही कृषि विद्यापीठातील बीज प्रकिया केंद्रात बियाणे प्रकिया करतेवेळी झालेली असते. 
  • आपण सर्वांनी जैविकमध्ये ट्रायकोड्रमा आणि रायझोबियम जिवाणू संवर्धन हे मात्र बियाणे पेरतेवेळी सावलीत प्रति किलो बियाण्यास 10 मिली या प्रमाणे प्रक्रिया करत पेरणी करावी. 
  • जैविक बुरशी नाशक ही कृषि विद्यापीठात उपलब्ध आहेत
  • खताची मात्रा : या पिकासाठी हेक्टरी 25 किलो नत्र आणि  50 किलो स्फुरद शिफारस आहे. थोडक्यात अडीच एकर क्षेत्रासाठी 100 किलो डायअमोनियम फॉस्फेट म्हणजेच dap हे खत पेरतेवेळी पेरून द्यावे. या पिकास गंधक खताची फार गरज असते. दाण्यावर चकाकी आणि आकार आणि गुणवत्ता वाढ करण्यास गंधक उपयुक्त ठरते. 

आंतरपिकाबाबत महत्वाचे.... 

  • आंतरपीक पद्धतीत एक काळजी अवश्य घेणे गरजेचे ठरते. 
  • बरेच शेतकरी हे तूर पिकाच्या ओळीला लगत एक फुटावर सोयाबीन सारखे आंतरपीक घेतात.  
  • यामुळे सोयाबीन पीक झपाट्याने वाढत मुख्य पीक तुरीला दाबून टाकते. 
  • त्यामुळे आंतरपीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी आपले मुख्य पिक तूर दोन सोयाबीन ओळीच्या कचाट्यात सापडणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे. 

 

या गोष्टीही लक्षात ठेवा.... 

  • काही शेतकरी बेड पद्धतीने तूर लागवड करतात. समजा पाऊस जास्त झाला तर पिकाचे नुकसान होत नाही. जास्तीचे पाणी शेताबाहेर जाण्यास मदत होते.  पाऊस कमी असेल तर पडलेला पाऊस सरीत जिरवला जातो. 
  • लागवड करतेवेळी पक्षी थांबा म्हणून मका अथवा ज्वारी पिकाची दाणे अल्प प्रमाणात असावी. 
  • ज्यामुळे नैसर्गिक पक्षी थांबे होऊन पक्षी पिकावरील अळ्या खातील, ही ताटे उभीच ठेवायची, काढायची नाही. 
  • गोदावरी वान हा मर व वांझ रोग प्रतिबंधक आहे. 
  • महत्वाचे म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात तूर पिकास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशी नाशकाची आळवणी  केली पाहिजे. 

 

पिकास पाणी कधी द्यावे?

  • पीक गुंडी अवस्थेत असेल आणि पाण्याची गरज असेल अशा वेळी पिकास पाणी द्यावे
  • आणि पीक संरक्षण देखील याच पीक अवस्थेत  करणे गरजेचे असते. 
  • पहिली फवारणी ही निंबोळी अर्क  करावी. 
  • यासाठी शेताच्या बांधावरील निंबोळी येत्या जून महिन्यात जमा करून ठेवावी. 
  • अशा प्रकारे तूर पिकाचे पेरणी नियोजन नक्कीच उपयुक्त ठरेल. 

 

- डॉ सूर्यकांत पवार, विस्तार कृषि विद्यावेता
- रामेश्वर ठोंबरे, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र, छत्रपती संभाजी नगर

Web Title: Latest News Understand cultivation technology of Godavari variety for tur farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.