Tur Kid Rog Niyantran : गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामान व अधूनमधून पाऊस होत आहे, अशा परिस्थितीत तूर पिकामध्ये कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यावर त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे!
कोणत्या किडी व रोगांचा धोका?
सध्याच्या वातावरणात कळी व फुलांच्या अवस्थेत हिरवी व शेंगा पोखरणारी अळी, पिसाळी पतंग (Pod Fly) आणि हेलिकोव्हर्पा अळी मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकतात.
उपाययोजना :
किडींचे नियंत्रण
शेतकऱ्यांनी पिकांचे नियमित निरीक्षण करावे.
किडींचा प्रादुर्भाव दिसताच पहिली फवारणी करावी.
निंबोळी अर्क (५%) किंवा अझाडिरॅक्टीन (३०० PPM) ५० मिली/प्रति १० लिटर पाणी किंवा अझाडिरॅक्टीन (१५०० PPM) २५ मिली/प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
किडींच्या नियंत्रणासाठी शेतात पक्षी थांबे (Bird Perches) उभे करावेत.
रोगांचे नियंत्रण
तूर पिकामध्ये मर रोग (Wilting) आढळल्यास, रोगग्रस्त सुकलेली झाडे त्वरित नष्ट करावीत.
पावसाचे पाणी जास्त प्रमाणात साचल्यास, शेतात चर खोदून पाण्याचा निचरा करावा.
रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा (८ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात) मिसळून आळवणी करावी.
- अधिक माहिती आणि मदतीसाठी कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली यांच्याशी संपर्क साधा.
