Lokmat Agro >स्मार्ट शेती > Tractor EMI Loan : हफ्त्यावर ट्रॅक्टर खरेदी करताय, 'या' पाच गोष्टी लक्षात ठेवा, वाचा सविस्तर 

Tractor EMI Loan : हफ्त्यावर ट्रॅक्टर खरेदी करताय, 'या' पाच गोष्टी लक्षात ठेवा, वाचा सविस्तर 

Latest News Tractor EMI Loan While buying tractor on installments, remember five things, read in detail  | Tractor EMI Loan : हफ्त्यावर ट्रॅक्टर खरेदी करताय, 'या' पाच गोष्टी लक्षात ठेवा, वाचा सविस्तर 

Tractor EMI Loan : हफ्त्यावर ट्रॅक्टर खरेदी करताय, 'या' पाच गोष्टी लक्षात ठेवा, वाचा सविस्तर 

Tractor EMI Loan : अशावेळी ट्रॅक्टर हफ्त्यावर (Tractor EMI Loan) घेत असताना काही गोष्टीची काळजी घेणे आवश्यक ठरते. 

Tractor EMI Loan : अशावेळी ट्रॅक्टर हफ्त्यावर (Tractor EMI Loan) घेत असताना काही गोष्टीची काळजी घेणे आवश्यक ठरते. 

शेअर :

Join us
Join usNext

Tractor EMI Loan :  शेतात यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात वाढू लागला असून यात ट्रॅक्टरचा समावेश आहे. ट्रॅक्टरद्वारे अनेक शेतीकाम चुटकीसरशी केली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर (Tractor Farming) घेण्याकडे कल असतो. काहीवेळा नवा ट्रॅक्टरचे गणित जुळत नसले तरीही जुना ट्रॅक्टर खरेदी करण्यावर शेतकऱ्यांचा भर असतो. अशावेळी ट्रॅक्टर हफ्त्यावर (Tractor EMI Loan) घेत असताना काही गोष्टीची काळजी घेणे आवश्यक ठरते. 

शेतकरी आपल्या शेतीसाठी ट्रॅक्टर खरेदी करतात, पण हफ्ता देण्यासाठी अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. बहुतांश वेळा शेतीत पैसा गुंतवलेला असतो. काहीवेळा शेतीचे नुकसान होते. बाजारभाव मिळत नसल्याने उत्पन्न मिळत नसते. अशा गोष्टीमुळे शेतकर्याजवळ पैसा शिल्लक राहत नाही. परिणामी हफ्ते थकले जातात. व्याजही वाढते. या सगळ्यांपासून लांब राहण्यासाठी ठोस नियोजन असणे आवश्यक ठरते. 

हफ्ते मोठे असू द्या.. 
अनेकदा शेतकरी कमी कालावधीचे हफ्ते करून अधिकची रक्कम भरण्याकडे कल असतो. मात्र असे न करता मोठ्या रक्कमेचे कमी हफ्ते असू द्यावेत. कमी कर्ज कालावधीमुळे, हप्ते कमी होतील आणि तुम्हाला कमी व्याज देखील द्यावे लागेल. यासोबतच, तुम्ही मोठ्या हप्त्यासाठी इतर ठिकाणाहून पैशांची व्यवस्था देखील करू शकाल आणि कर्जाची लवकर परतफेड करून व्याज वाचवाल.

छोटे हप्ते करून व्याज वाढेल
आणि जर तुम्ही ट्रॅक्टर कर्जाचे हप्ते कमी केले तर कर्जाचा कालावधी देखील वाढेल आणि व्याज देखील जास्त असेल. छोटे हप्ते जमा करताना शेतकऱ्याला फारशी काळजी करण्याची गरज नसली तरी, छोट्या रकमेची व्यवस्था सहज करता येते. मात्र कालावधी वाढत जातो. 

जास्तीत जास्त डाउन पेमेंट करा
जर तुम्ही मोठे हप्ते भरू शकत नसाल, तर ट्रॅक्टर खरेदी करताना डाउन पेमेंटमध्ये जास्तीत जास्त पैसे देण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे, कर्जाची रक्कम जितकी कमी असेल तितके कमी हप्ते आणि व्याज तुम्हाला भरावे लागेल. डाउन पेमेंटसाठी तुमच्या बचतीत जास्त पैसे नसल्यास ते जमवण्याचा प्रयत्न करा, कारण त्या पैशावर व्याज आकारले जाणार नाही, परंतु बँकांच्या कर्जावर जास्त व्याज आकारले जाते.

पैसे बचत झाल्यास संपूर्ण कर्ज भरा
ट्रॅक्टरचे लोन चालू असल्याच्या काळात जर उत्पन्न चांगले मिळाले. किंवा इतर मार्गातून पैसे आले. तर तात्काळ कर्जाचा हफ्ते भरा. किंवा एकाच वेळी फेडून ट्रॅक्टरचे कर्ज पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. यामुळे हप्त्यांची चिंता कमी होईल आणि अधिक व्याज भरण्याची गरज राहणार नाही. म्हणून, तुमच्याकडे पैसे आल्यास लोन क्लोज होण्याआधी तुम्ही स्वतः पैसे भरून बंद करा. 

सरकारी अनुदाने शोधा
अनेकदा शेतकऱ्यांना शासकीय योजना आणि सुविधांची माहिती नसते. त्यामुळे ट्रॅक्टर खरेदी करण्यापूर्वी तुमच्या जवळच्या सीएससी केंद्राला भेट द्या आणि ट्रॅक्टरशी संबंधित सरकारी योजनांची माहिती घ्या. याद्वारे तुम्हाला ट्रॅक्टरवर चांगली सबसिडीही मिळू शकते.

Web Title: Latest News Tractor EMI Loan While buying tractor on installments, remember five things, read in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.