Lokmat Agro >स्मार्ट शेती > Tomato Tibak Sinchan : टोमॅटोसाठी ठिबक सिंचनाच्या वापर करा, 45 टक्के पाणी बचत करा 

Tomato Tibak Sinchan : टोमॅटोसाठी ठिबक सिंचनाच्या वापर करा, 45 टक्के पाणी बचत करा 

Latest News Tomato Tibak Sinchan Use drip irrigation for tomatoes, save 45 percent water | Tomato Tibak Sinchan : टोमॅटोसाठी ठिबक सिंचनाच्या वापर करा, 45 टक्के पाणी बचत करा 

Tomato Tibak Sinchan : टोमॅटोसाठी ठिबक सिंचनाच्या वापर करा, 45 टक्के पाणी बचत करा 

Tomato Tibak Sinchan : ठिबक सिंचनाचा (Tomato Farming) वापर केला असता ४५ टक्क्यांपर्यंत पाणी बचत व १५ ते २५ टक्के उत्पादनात वाढ मिळते.

Tomato Tibak Sinchan : ठिबक सिंचनाचा (Tomato Farming) वापर केला असता ४५ टक्क्यांपर्यंत पाणी बचत व १५ ते २५ टक्के उत्पादनात वाढ मिळते.

शेअर :

Join us
Join usNext

Tomato Tibak Sinchan : उन्हाळी टोमॅटो पिकासाठीठिबक सिंचनाचा (Tomato Farming) वापर केला असता ४५ टक्क्यांपर्यंत पाणी बचत व १५ ते २५ टक्के उत्पादनात वाढ मिळते. टोमॅटो पिकासाठी (Drip Irrigation) ठिबक सिंचन संच वापरावयाचा असल्यास, पिकाच्या लागवड पद्धतीमध्ये थोडासा बदल करणे आवश्यक आहे. 

उन्हाळ टोमॅटो ठिबक सिंचन 

  • सर्वसाधारणपणे सलग लागवड करण्यापेक्षा जोड ओळ पद्धतीचा वापर केला असता आंतरमशागत, तोडणी, फवारणी इत्यादी कामे सुलभतेने करता येतात. महत्त्वाचे म्हणजे ठिबक सिंचन संचाच्या खर्चात ३० टक्के बचत होते. 
  • हंगामानुसार जमिनीची पूर्वमशागत झाल्यानंतर टोमॅटोसाठी ठिबक सिंचनासाठी शेताचे सर्वेक्षण करून आराखडा तयार करावा. 
  • त्यानंतर आराखड्यानुसार ठिबक सिंचन संचाची मांडणी करावी. उच्चतम गुणवत्तेच्या संचाची निवड करावी. 
  • संकरित टोमॅटोसारख्या जवळच्या अंतराच्या पिकासाठी इनलाईन ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. 
  • इनलाईन उपनळ्या (लॅटरल) १२ मिमी, १६ मिमी. व्यासामध्ये उपलब्ध आहेत. 
  • टोमॅटोसाठी दोन इनलाईन नळ्यांमधील अंतर १८० ते २२५ सें.मी. ठेवावे. 
  • त्यासाठी शक्यतो जमिनीच्या प्रकारानुसार ६०-१०० सें.मी. किंवा ७५-१५० सें.मी. जोड ओळ (टोमॅटोच्या दोन ओळींमध्ये ६० सें.मी./ ७५ सें.मी. अंतर व दोन जोड ओळींमध्ये १२०/ १५० सें.मी. चा पट्टा) पद्धतीने लागवड करावी. 
  • ड्रीपरचा प्रवाह ४ लिटर प्रति तास व ड्रीपर्समध्ये अंतर जमिनीच्या प्रकारानुसार ३० ते ६० सें.मी. असलेल्या इनलाईन नळीची निवड करावी.


- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

Web Title: Latest News Tomato Tibak Sinchan Use drip irrigation for tomatoes, save 45 percent water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.