Tomato Crop Management : सध्या ठिकाणी उन्हाळी हंगामातील टोमॅटो लागवड (Tomato Cultivation) सुरु आहे. तर दुसरीकडे काही रब्बी हंगामातील टोमॅटोची काढणी शेवटच्या टप्प्यात आहे. दरम्यान कांदा काढणीदरम्यान काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. यात टोमॅटो काढणी (Tomato Crop) केल्यानंतर अनेकदा खराब टोमॅटो बांधावर इतरत्र पडलेले असतात. अशावेळी यांचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असते. ते का? जाणून घेऊयात या लेखातून..
रोप लावल्यापासून जातीनुसार साधारणतः ६५ ते ७० दिवसांनी फळांची तोडणी सुरू होते. त्यानंतर दररोज अथवा दिवसाआड तोडणी करावी लागते. प्रक्रियेसाठी पूर्ण पिकलेली व लाल रंगाची फळे तोडावीत. परंतु, बाजारासाठी फळे निम्मी लाल व निम्मी हिरवी असताना तोडावीत.
फळे जर लांबच्या बाजारपेठेसाठी पाठवायची असतील, तर पिवळा ठिपका पडलेली फळे तोडावीत. अशी फळे वाहतुकीत चांगली पिकतात. गुलाबी लालसर झालेली फळे मध्यम पत्त्याच्या बाजारपेठेसाठी, तर पूर्ण लाल झालेली फळे स्थानिक बाजारपेठेसाठी किंवा प्रक्रिया उद्योगासाठी पाठवावीत.
फळांची काढणी
- फळांची काढणी शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी तापमान कमी असताना करावी.
- तोडणी अगोदर तीन ते चार दिवस कीडनाशकांची फवारणी करू नयेय, अन्यथा फळांवर कीडनाशकांचे डाग व फळांमध्ये विषारीपणा राहतो.
- फळांची काढणी झाल्यावर फळे सावलीत आणावीत व त्यांची आकारानुसार वर्गवारी करावी.
- नासकी, तडा गेलेली, रोगट फळे बाजूला काढावीत.
- चांगली फळे लाकडी खोक्यांत किंवा प्लॅस्टिक क्रेटमध्ये व्यवस्थित भरून विक्रीसाठी पाठवावीत.
अवशेष व्यवस्थापन
- बरेचसे शेतकरी फळ तोडणी आणि पॅकिंगचे काम शेताच्या बांध्यावर करतात.
- फळ पोखरणाऱ्या अळी, पिनवर्मनेः खराब केलेली, तसेच रोगग्रस्त टोमॅटोचा ढीग बांधावरच ठेवतात.
- तेच पुढे कीड व रोगांचे आगार बनते.
- त्यातूनच किडीची पूर्ण वाढ झाल्यानंतर पतंग बाहेर पडतात आणि तेथे जवळच अंडी घालतात.
- रोगकारक सूक्ष्मजीव तर लगेच आपले प्रसारण सुरू करतात.
- म्हणून रोगग्रस्त, किडग्रस्त टोमॅटो बांधावर न टाकता खड्डा करून पुरून टाकावेत.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी