Lokmat Agro >स्मार्ट शेती > टोमॅटो पिकाचे 70 टक्के नुकसान करणाऱ्या किडीवर नियंत्रण कसे मिळवाल?

टोमॅटो पिकाचे 70 टक्के नुकसान करणाऱ्या किडीवर नियंत्रण कसे मिळवाल?

Latest News Tomato Crop Management How do you control a pest that damages 70 percent of tomato crops? | टोमॅटो पिकाचे 70 टक्के नुकसान करणाऱ्या किडीवर नियंत्रण कसे मिळवाल?

टोमॅटो पिकाचे 70 टक्के नुकसान करणाऱ्या किडीवर नियंत्रण कसे मिळवाल?

Tomato Farming : जवळपास ही कीड टोमॅटो पिकाचे ७० ते ८० टक्के नुकसान करू शकते.

Tomato Farming : जवळपास ही कीड टोमॅटो पिकाचे ७० ते ८० टक्के नुकसान करू शकते.

शेअर :

Join us
Join usNext

Tomato Farming :    अनेक भागात खरिपातील टोमॅटो लागवड  (Tomato Lagvad) झाली असून काही भागात लागवडीची तयारी सुरु आहे. तर काही भागात फळधारणा स्थितीत टोमॅटो पिकावर फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत आहे. आजच्या भागातून या अळीचे व्यवस्थापन कसे करावे, हे पाहुयात.... 

नुकसानीचा प्रकार
अळी सुरवातीला कोवळी पाने खाते तसेच कोवळया वाढणाऱ्या फांद्या कुतुंडून खाते. फळे लागल्यानंतर अळी फळांना छिद्र पाडून आत डोके खुपसुन आतील भाग खाते. एक अळी ही २ ते ८ फळांचे नुकसान करू शकते. जवळपास ही कीड पिकाचे ७० ते ८० टक्के नुकसान करू शकते.

शेतकऱ्यांनो उपाशीपोटी फवारणी केल्यास विषबाधा होऊ शकते, जाणून घ्या कारण

एकात्मिक व्यवस्थापन

  • कोळपणी व निंदणी करून शेत तणविरहित ठेवावे.
  • प्रादुर्भावग्रस्त फळे तोडून नष्ट करावीत. मोठया अळया हातानी वेचून नष्ट कराव्यात.
  • भक्षक पक्षांना बसण्यासाठी शेतात ८ ते १० प्रति एकरी पक्षी बांचे उभारावेत.
  • सर्वेक्षणासाठी शेतात हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावेत.
  • लागवडीनंतर ४०-४५ दिवसांनी शेतात ट्रायकोग्रामा चिलोनिस हे मित्रकीटक १.५ लाख अंडी प्रति हेक्टर या प्रमाणात ७ दिवसांच्या अंतराने ५ ते ६ वेळा सोडावेत.
  • फळे पोखरणारी अळी लहान अवस्थेत असताना एच.ए.एन. पी.व्ही. ५०० एल.ई. विषाणूची प्रति हे. फवारणी करावी. म्हणजेच ५०० एल.ई. विषाणू (५०० मि.ली.) ५०० लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये ५०० मि.ली. चिकट द्रव (स्टिकर) आणि राणीपाल (नीळ) २०० ग्रॅम टाकावा.
  • ५ टक्के निंबोळी अर्क किंवा कडूनिंब आधारित झाडिरेक्टीन (३००० पीपीएम) २ मि.लि प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी.
  • विव्हेरिया बंसियाना १ टक्के विद्राव्य पावडर ६ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी.
  • बी. टी. जिवाणूजन्य किटकनाशक २ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणात करावी.
  • किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास, खालील रासायनिक कीटकनाशकाची फवारणी.

कीटकनाशक : प्रति लिटर पाणी

  • किनालफॉस २५ ईसी किंवा २ मिली
  • क्लोरेंन्ट्रानिलीप्रोल १८.५ एससी किंवा ०.३ मिली
  • सायनाट्रानीलीप्रोल १०.२६ ओडी किंवा १.८ मिली
  • फ्लुबेडामाईड २० डब्लूजी किंवा ०.५ प्रेम
  • इंडोक्झाकार्ब १४.५ एससी ०.८ मिली

वरील कीटकनाशकाचे प्रमाण साध्या पंपासाठी आहे, पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण तीन पट वापरावे. 

- कृषि कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

Web Title: Latest News Tomato Crop Management How do you control a pest that damages 70 percent of tomato crops?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.