Dalimb Crop Management : डाळिंबावरील बुरशीजन्य स्कॅब (Scab), काळे ठिपके (Anthracnose/Alternaria) आणि फळ कुजवा हे रोग प्रामुख्याने दमट हवामान आणि पावसाळ्यात उद्भवतात. या रोगांची लक्षणे काय आहेत, त्यावर उपाय काय करावा, हे समजून घेऊयात...
- डाळिंब पिकावर बुरशीजन्य स्कॅब, ठिपके आणि कुजवा यांसाठी काही आशादायक बुरशीनाशके जसे मॅण्डीप्रोपामीड, मेटीराम, प्रोपिकोनॅझोल, अॅझोक्सिस्ट्रॉबीन, ॲझोक्सिस्ट्रॉबिन + डायफेनोकोनॅझोल, क्लोरथैलोनिल मेटॅलॅक्झिल एम, बोर्डो मिश्रण ०.५ टक्के, कासुगामायसीन कॉपर ऑक्सिक्लोराइड, झायनेब हेक्झाकोनॅझोल, ट्रायसायक्लॅझोल + मॅन्कोझेब, क्लोरोथैलोनिल, फ्लूओपायरम + टेब्यूकोनॅझोल, टेब्यूकोनॅझोल ट्रायफ्लॉक्सीस्ट्रोबीन वरीलपैकी कोणत्याही बुरशीनाशकाच्या दोन ते तीन फवारण्या १० ते १४ दिवसांच्या अंतराने केल्यास चांगले परिणाम दिसून येतात. त्यामुळे पुढील अनेक फवारण्या टाळता येतात.
- बोर्डो मिश्रणाव्यतिरिक्त प्रत्येक फवारणीत स्टीकर स्प्रेडर वापरावा.
- एका हंगामात कॉपरयुक्त बुरशीनाशकाव्यतिरिक्त कोणतेही बुरशीनाशक दोनपेक्षा जास्त वेळा फवारू नये.
(वरील बुरशीनाशकाची फवारणी आपल्या जवळील संशोधन केंद्र / कृषी विज्ञान केंद्रातील तज्ञ यांचा सल्ला घेऊनच करावे.)
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी
नोकरी सोडली तरी पीएफ काढू नका; होऊ शकते आर्थिक नुकसान, कधी काढायचे पैसे?
