Join us

Soybean Crop Management : सोयाबीन शेतकऱ्यांसाठी अलर्ट; पावसात पिकाचे रक्षण करण्याचे तज्ज्ञांचे खास मार्गदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 13:08 IST

Soybean Crop Management : राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून शेतात पाणी साचल्याने सोयाबीन पिकावर कीड व रोगांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. यावर मात करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी दिलेला मार्गदर्शक सल्ला शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. (Soybean Crop Management)

Soybean Crop Management : राज्यात मुसळधार पावसामुळे सोयाबीन पिकावर कीड व रोगांचा मोठा धोका निर्माण झाला आहे. शेतात साचलेलं पाणी, दमट वातावरण आणि सततच्या पावसामुळे पानखाणाऱ्या अळ्या, शेंगा पोखरणारी अळी, तसेच बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो.(Soybean Crop Management)

यावर मात करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सोयाबीन संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. सुनिल उमाटे आणि कीटकशास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र जाधव यांनी शेतकऱ्यांसाठी महत्वाचा मार्गदर्शक सल्ला दिला आहे.(Soybean Crop Management)

सामान्य सल्ला

* शेतात साचलेले अतिरिक्त पाणी तातडीने काढून टाकावे.

* पाऊस थांबल्यानंतर कीड व रोगांचे प्रमाण वाढू शकते, त्यामुळे नियमित पाहणी करावी.

* केवळ शिफारस केलेली कीटकनाशके/बुरशीनाशके वापरावीत.

* फवारणी करताना योग्य प्रमाणात पाणी वापरावे

* नॅपसॅक पंप/ट्रॅक्टर स्प्रे – ४५० लि./हे.

* पॉवर स्प्रे – १२० लि./हे.

* एका वेळी फक्त एकच कीटकनाशक फवारावे, मिश्रण करू नये.

* मजूर काम करु शकत नसल्यास ड्रोन फवारणीचा वापर करावा.

* केंद्रीय किटकनाशक मंडळाने नोंद न केलेली (लेबल क्लेम नसलेली) औषधे वापरू नयेत.

कीड नियंत्रण

* पाने खाणाऱ्या अळ्या (हिरवी उंटअळी, तंबाखूवरील पानेखाणारी अळी, घाटे अळी)

स्पिनेटोरम ११.७०% SC – ४५० मिली/हे.

क्लोरँट्रानिलीप्रोल १८.५०% SC – १५० मिली/हे.

क्लोरँट्रानिलीप्रोल ९.३०% + लँबडा सायहॅलोथ्रीन ४.६०% ZC – २०० मिली/हे.

शिफारस केलेली औषधे (यापैकी एक)

* शेंगा पोखरणारी अळी (घाटे अळी)

इंडोक्झाकार्ब १५.८०% EC – ३३३ मिली/हे.

फ्लुबेंडियामाईड २०% WG – २५०-३०० ग्रॅम/हे.

फ्लुबेंडियामाईड ३९.३५% SC – १५० मिली/हे.

क्लोरँट्रानिलीप्रोल १८.५०% SC – १५० मिली/हे.

इमामेक्टिन बेंझोएट १.९०% EC – ४२५ मिली/हे.

शिफारस औषधे (एक निवडावे)

* तंबाखूवरील पानेखाणारी अळी (स्पोडोप्टेरा लिटुरा)

वापरायची औषधे

क्लोरँट्रानिलीप्रोल १८.५०% SC – १५० मिली/हे.

स्पिनेटोरम ११.७०% SC – ४५० मिली/हे.

इमामेक्टिन बेंझोएट १.९०% EC – ४२५ मिली/हे.

फ्लुबेंडियामाईड २०% WG – २५०-३०० ग्रॅम/हे.

फ्लुबेंडियामाईड ३९.३५% SC – १५० मिली/हे.

इंडोक्झाकार्ब १५.८०% EC – ३३३ मिली/हे.

क्लोरफ्लुआजुरोन ५.४०% EC – १५०० मिली/हे.

नोव्हाल्युरॉन ५.२५% + इंडोक्झाकार्ब ४.५०% SC – ८२५ मिली/हे.

ब्रोफ्लानिलीड ३०० ग्रॅम/ली. SC – ४२-६२ ग्रॅम/हे.

उपाय

फेरोमोन सापळे (५ प्रति हेक्टर) बसवावेत.

NPV (२५०/हे.) वापरावा.

इतर कीड नियंत्रण

उंटअळी : क्लोरँट्रानिलीप्रोल, इमामेक्टिन, ब्रोफ्लानिलीड, फ्लुबेंडियामाईड, लँबडा सायहॅलोथ्रीन, प्रोफेनोफॉस इ. (योग्य प्रमाणात).

बिहारी केसाळ अळी : प्रभावित झाडे काढून टाकावीत, प्रादुर्भाव वाढल्यास फ्लुबेंडियामाईड/लँबडा/इंडोक्झाकार्ब वापरावा.

खोडमाशी : थायमिथोक्झाम + लँबडा, बिटासायफ्लुथ्रीन + इमिडाक्लोप्रीड, आयसोसायक्लोसेरम, बायफेंथ्रीन + क्लोरँट्रानिलीप्रोल.

चक्रीभुंगा : प्रभावित झाडे नष्ट करावीत, थायक्लोप्रीड, टेट्रानिलीप्रोल, क्लोरँट्रानिलीप्रोल, इमामेक्टिन, प्रोफेनोफॉस वापरावे.

रोग नियंत्रण

रायझोक्टोनिया एरीयल ब्लाईट

फ्लुक्झोपायरोक्झाड + पायराक्लोस्ट्रोबिन SC – ३०० ग्रॅम/हे.

पायराक्लोस्ट्रोबिन + एपॉक्झीकोनाझोल SE – ७५० मिली/हे.

पायराक्लोस्ट्रोबिन २० WG – ३७५-५०० ग्रॅम/हे.

अँथ्रॅक्नोज

टेबुकोनॉझोल २५.९% EC – ६२५ मिली/हे.

टेबुकोनॉझोल ३८.३९% SC – ६२५ मिली/हे.

टेबुकोनॉझोल १०% + सल्फर ६५% WG – १.२५ कि./हे.

कार्बेंडाझिम १२% + मेन्कोझेब ६३% WP – १.२५ कि./हे.

पिवळा मोझॅक / सोयाबीन मोझॅक

प्रभावित झाडे उपटून नष्ट करावीत.

थायमिथोक्झाम + लँबडा, बेटासायफ्लुथ्रीन + इमिडाक्लोप्रीड, अॅसेटॅमीप्रीड + बायफेंथ्रीन यापैकी एक औषध वापरावे.

पांढरी माशी नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे (१५-२० प्रति एकर) लावावेत.

सध्या चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन पिकावर अनेक प्रकारच्या कीड व रोगांचा धोका आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी शास्त्रज्ञांच्या शिफारसीनुसार औषधांची निवड करावी, शेतात योग्य जलनिस्सारण करावे आणि वेळोवेळी फेरोमोन/चिकट सापळे वापरून कीड नियंत्रण करावे. यामुळे पिकाचे उत्पादन आणि बीजोत्पादन दोन्ही सुरक्षित राहील.

(सौजन्य : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

हे ही वाचा सविस्तर : Krushi Salla : सद्यस्थितीतील पीक व्यवस्थापन कसे कराल; शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनपीकपीक व्यवस्थापनमहाराष्ट्रपाऊस