Smart Farming Tips : शेती हा व्यवसाय तोट्याचा आहे, अशी धारणा अनेक शेतकऱ्यांच्या मनात घर करून बसली आहे.(Smart Farming Tips)
मात्र, योग्य नियोजन, ज्ञान आणि बदलत्या परिस्थितीनुसार निर्णय घेतल्यास शेती नक्कीच फायदेशीर ठरू शकते. (Smart Farming Tips)
कृषी अभ्यासक अश्विन पतंगे यांच्या मते, शेतकऱ्यांनी शेतीतील काही मूलभूत चुका ओळखून त्यावर उपाययोजना केल्यास उत्पन्नात वाढ शक्य आहे. (Smart Farming Tips)
विशेषतः अज्ञान, परावलंबन, कर्जबाजारीपणा आणि बाजार व्यवस्थापनाचा अभाव हे चार मोठे शत्रू ओळखणे अत्यावश्यक आहे.(Smart Farming Tips)
अज्ञान : शेतीत माहितीच सर्वात मोठं शस्त्र
कोणताही व्यवसाय यशस्वी होण्यासाठी त्याचं सखोल ज्ञान असणं गरजेचं आहे. शेतीत अनेकदा पारंपरिक पद्धतीवर अवलंबून राहिल्याने किंवा नवीन तंत्रज्ञानाची माहिती नसल्याने नुकसान होतं.
उपाय :
आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास
कृषी विषयक प्रशिक्षण व मार्गदर्शन
वाचन आणि डिजिटल माहितीचा वापर
निसर्गाशी सुसंगत शेती पद्धती स्वीकारणे
परावलंबन : बियाणे व इनपुटवर अवलंबित्व कमी करा
हायब्रीड बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशकांवर जास्त अवलंबून राहिल्याने खर्च वाढतो आणि मातीची सुपीकता घटते.
उपाय :
घरगुती बियाणे जतन करणे
सेंद्रिय शेती पद्धतींचा अवलंब
नैसर्गिक खतांचा वापर
इनपुट खर्च कमी करण्यावर भर
कर्जबाजारीपणा : नियोजनाशिवाय घेतलेलं कर्ज धोकादायक
सुलभ कर्जामुळे अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात; मात्र योग्य परतावा न मिळाल्यास कर्जाचा बोजा वाढतो.
उपाय :
गरजेनुसार आणि नियोजनपूर्वक कर्ज घेणे
खर्चावर नियंत्रण ठेवणे
विविध उत्पन्न स्रोत तयार करणे
जोखीम व्यवस्थापनावर भर
बाजार व्यवस्थापन : विक्रीतच नफा-तोटा ठरतो
शेतमाल तयार झाल्यावर तातडीने विक्री करण्याची घाई शेतकऱ्यांना कमी भावात विक्री करायला भाग पाडते. साठवणूक आणि बाजारपेठेचा अभ्यास नसल्याने नुकसान होते.
उपाय :
बाजारभावाचा अभ्यास करून योग्य वेळी विक्री
साठवणूक सुविधा विकसित करणे
थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे पर्याय
शेतकरी गट/एफपीओमध्ये सहभागी होणे
शेती फायदेशीर बनवायची असेल, तर फक्त उत्पादन वाढवणे पुरेसे नाही, तर योग्य ज्ञान, स्वावलंबन, आर्थिक शिस्त आणि बाजारपेठेची समज आवश्यक आहे.
हे चार 'शत्रू' ओळखून त्यावर योग्य वेळी उपाय केले, तर शेती हा व्यवसाय नक्कीच नफ्यात येऊ शकतो.
शेतकऱ्यांनी बदल स्वीकारला, तर शेतीचे चित्र नक्की बदलेल.
(लेखक अश्विन पतंगे हे कृषी अभ्यासक आहेत.)
अधिक वाचा :Chia Seed Market : हळद विकावी की थांबावी? चियाच्या तेजीने बदलली गणितं
