जमिनीची खोटी कागदपत्रे (Fake land documents) तयार करून तुमची फसवणूक होऊ शकते. अशा प्रकारच्या फसवणुकीत बोगस कागदपत्रे, खोटे खरेदी खत दाखवून जमिनीची परस्पर विक्री केली जाऊ शकते. अशा वेळी जमिनीची खोटी कागदपत्रे कशी ओळखायची, हे समजून घ्या...
७/१२ उतारा आणि फेरफार दस्तऐवज तपासा
7/12 उतारा (Satbara Utara) हे गाव नमुना क्रमांक ७ आणि १२ मधील संपूर्ण माहिती दर्शवते. महसूल खात्याच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन मूळ उतारा मिळवा. मालकाचे नाव, जमीन क्षेत्रफळ, फेरफार क्रमांक, शेवटचा फेरफार कधी झाला आहे, हे तपासून घ्या. यासाठी https://mahabhulekh.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन मूळ सातबारा तपासता येईल.
ई-चावडी (E-Chawadi) वर नोंद तपासा
चावडी नोंदीत कोणत्याही प्रकारचा बदल किंवा खोटी नोंद आहे का ते तपासा.
मालकी हक्कामध्ये अचानक बदल झाला आहे का हे तपासा.
फेरफार नोंदणी क्रमांक आणि तारीख बरोबर आहे का ते तपासा.
बोगस स्वाक्षरी आणि शिक्के ओळखा.
स्वाक्षरी आणि शिक्क्यांमध्ये पुढील गोष्टी तपासा :
स्वाक्षरीमध्ये सातत्य आहे का?
जिल्हाधिकारी/तहसीलदार यांचा अधिकृत शिक्का स्पष्ट आणि खरी नोंद आहे का ?
कागदपत्रांमधील फॉन्ट आणि मजकूर तपासा.
खऱ्या दस्तऐवजात समान प्रकारचा फॉन्ट आणि मजकूर असतो.
बनावट दस्तऐवजामध्ये :
अक्षरांमध्ये असमानता असते.
मजकूरात स्पेलिंगमध्ये चुका असतात.
मजकूर एकसंध दिसत नाही.
बोगस स्टॅम्प पेपर ओळखा.
संबंधित स्टॅम्प नंबर सरकारी वेबसाइटवर तपासा.
स्टॅम्प पेपरवरील मुद्रांक स्पष्ट आहे का हे तपासा.
खऱ्या स्टॅम्प पेपरवर नक्षी ठळक आणि स्पष्ट असते.
किंवा https://www.shcilestamp.com या वेबसाईटचा आधार घ्या.
एनए (NA) आणि ले-आउट मंजुरी तपासा
जमिनीचे NA प्रमाणपत्र (Non-Agricultural) आहे का हे तपासा.
ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका मंजुरीशिवाय जमीन विक्री शक्य नाही.
अनुभवी वकीलाकडून कागदपत्रांची तपासणी करून घ्या.
शिवाय खरेदीपूर्वी 'इन्कंब्रेन्स सर्टिफिकेट' (Encumbrance Certificate) घ्या.
इन्कंब्रेन्स सर्टिफिकेट (EC) मध्ये खालील गोष्टी असतात.
मालकाचे नाव
कोणतेही कर्ज आहे का?
जमीन कोणत्याही वादात अडकली आहे का?
EC महसूल विभागाकडून मिळते.
हेही लक्षात घ्या.
जमीन खरेदीच्या वेळी सर्व कागदपत्रे रजिस्ट्रार ऑफिसमध्ये प्रत्यक्ष चेक करा.
जर विक्रेता घाई करत असेल किंवा कमी किमतीत विक्री करत असेल, तर सावध व्हा.
जर कागदपत्रे डिजिटल स्वरूपात उपलब्ध नसतील, तर ते खोटे असण्याची शक्यता असते.
हेही वाचा : जमिनीची वाटणी म्हणजे खातेवाटप कसे करायचे, हरकत असल्यास काय करावे? वाचा सविस्तर
