Seed Treatment : रब्बी हंगामाची लगबग सुरू झाली असून, शेतकरी बांधवांनी आता पिकांची पेरणी करण्यापूर्वी बीजप्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे.(Seed Treatment)
यंदा पावसाचे प्रमाण जास्त असल्याने मातीतील आर्द्रता वाढली असून बुरशीजन्य रोगांचा धोका अधिक वाढला आहे.(Seed Treatment)
कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना 'बीजप्रक्रिया करा, नुकसान टाळा' असा सल्ला दिला आहे. हरभरा, गहू, ज्वारी, मका या पिकांसाठी बीजप्रक्रिया ही रोगप्रतिकारक कवचासारखी उपाययोजना ठरते.(Seed Treatment)
आगामी रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी करण्यापूर्वी बीजप्रक्रिया (Seed Treatment) करूनच पेरणी करावी, असा महत्त्वपूर्ण सल्ला कीटकशास्त्रज्ञांकडून देण्यात आला आहे.
यंदा राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे जमिनीत ओलावा जास्त राहिला असून बुरशीजन्य रोगांचा धोका वाढला आहे. विशेषतः हरभरा, गहू आणि ज्वारी या रब्बी पिकांसाठी ही परिस्थिती चिंताजनक ठरू शकते.
बीजप्रक्रियेचे महत्त्व
बीजप्रक्रिया ही केवळ कीड व रोगांपासून संरक्षण देणारी नव्हे तर अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवणारी प्रक्रिया आहे. पिकांच्या निरोगी वाढीसाठी ती अत्यावश्यक आहे.
कृषी तज्ज्ञांच्या मते, बीजप्रक्रिया केल्याने उत्पादनात १० ते १५ टक्क्यांपर्यंत वाढ होते, तसेच रासायनिक खतांचा खर्चही घटतो.
बीजप्रक्रियेचे फायदे
हरभरा, भुईमूग, उडीद, मूग यांसारख्या द्विदल पिकांसाठी रायझोबियम आणि पीएसबी जिवाणू खत वापरल्यास हवेतील नत्र स्थिरीकरण होऊन जमिनीतील सुपीकता वाढते.
गहू, ज्वारी, मका, बार्ली या पिकांसाठी अॅझोटोबॅक्टर व पीएसबी यांच्या वापराने स्फुरदाचे शोषण अधिक होते.
शिफारशीनुसार रासायनिक + जैविक बुरशीनाशकांच्या प्रक्रियेमुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो, उत्पादन खर्च घटतो आणि पर्यावरणपूरक शेती साध्य होते.
बीजप्रक्रियेसाठी महत्त्वाच्या सूचना
* प्रथम रासायनिक बुरशीनाशक / कीटकनाशकाची प्रक्रिया करावी.
* अर्ध्या तासानंतर जैविक खताची प्रक्रिया करावी दोन्ही एकत्र करू नयेत.
* प्रक्रिया करताना हातमोजे वापरावेत.
* गुळाच्या पाण्याचा हलका शिडकावा करून निविष्ठा बियाण्याला चांगली चिकटेल याची काळजी घ्यावी.
* भुईमूगसारख्या नाजूक बियाण्यांवर चोळणे टाळावे.
यंदा पावसाचे प्रमाण अधिक असल्याने मातीतील आर्द्रता वाढली आहे. त्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनमान्य कृषी विक्रेत्यांकडूनच बीजप्रक्रियेसाठी जैविक व रासायनिक निविष्ठा खरेदी कराव्यात, असे आवाहन कृषी तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.
रब्बी हंगामात बीजप्रक्रिया करणे ही शेतकऱ्यांसाठी सुरक्षा कवचासारखी आहे. ती केवळ पिकांचे आरोग्य टिकवतेच, शिवाय खर्च कमी करून उत्पादन वाढवते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने बीजप्रक्रिया करूनच पेरणी या सल्ल्याचे पालन करणे गरजेचे आहे.
हे ही वाचा सविस्तर : Pashudhan Bajar : पशुधन बाजारात शांतता का? काय आहे कारण वाचा सविस्तर
