Join us
Daily Top 2Weekly Top 5

कडबा परवडत नाही, कमी जागेत, कमी वेळेत, कमी खर्चात करा ॲझोलाची निर्मिती, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 19:35 IST

Azolla for Animals :तसेच महागड्या खाद्यावरील खर्च कमी होतो. कमी जागेत आणि कमी खर्चात याची निर्मिती घरीच करता येते. 

Azolla for Animals :   ॲझोला ही एक अत्यंत पौष्टिक, प्रथिने (२५-३५%) आणि खनिजे समृद्ध तरंगती नेचे (Fern) वर्गीय वनस्पती आहे, जी दुधाळ जनावरांसाठी (गायी-म्हशी) अत्यंत फायदेशीर पूरक हिरवा चारा आहे, याच्या वापराने दुधाची गुणवत्ता आणि उत्पादन वाढते. तसेच महागड्या खाद्यावरील खर्च कमी होतो. कमी जागेत आणि कमी खर्चात याची निर्मिती घरीच करता येते. 

ॲझोला लागवडीसाठीजागा : सावलीत, ओलसर आणि कमी तापमानात (२५-३०°C) ॲझोला उत्तम वाढतो. साहित्य : प्लास्टिक कागद, पाणी, माती आणि शेणखत यांचा वापर करून १०-१५ दिवसात ॲझोला तयार होतो 

जनावरांसाठी ॲझोला  

  • टंचाईच्या काळात फक्त चारा पिकेच नाही तर पशुखाद्याचेही दर वाढतात, त्यामुळे जनावरांना योग्य प्रमाणात पशुखाद्य देणे परवडत नाही. 
  • त्याचबरोबर सकस चारा उपलब्ध नसेल तर प्रथिने, क्षार, खनिजे तसेच जीवनसत्वांची कमतरता होते. 
  • यावर पर्याय म्हणून उच्च प्रथिने आणि क्षार खनिजे असलेले ॲझोलाचा वापर दुधाळ जनावरांच्या आहारात करता येईल. 
  • दुधाळ जनावरांना एक ते दीड किलोपर्यंत ॲझोला रोज खाऊ घालता येतो.

 

ॲझोलाचे फायदे आणि वापर

  • पौष्टिकता : यामध्ये प्रथिने (Protein), अमीनो ऍसिड, जीवनसत्त्वे (उदा. अ जीवनसत्व) आणि खनिजद्रव्ये मुबलक प्रमाणात असतात. 
  • दुग्धोत्पादन वाढ : ॲझोलामुळे दुधाळ जनावरांच्या दुधात १५-२० टक्के वाढ होऊ शकते आणि दुधाचा दर्जा सुधारतो. 
  • वापर पद्धत : जनावरांना सुरुवातीला ॲझोलाची चव अंगवळणी पडण्यासाठी काही दिवस लागतात, त्यामुळे सुरुवातीला ते इतर पेंडीसोबत (Concentrate Feed) मिश्रित करून द्यावे. 
  • प्रमाण : दररोजच्या पेंडीच्या वजनापैकी सुमारे १-२ किलो ॲझोला जनावरांना देता येतो. 
  • उत्पादन क्षमता : घरच्या घरी एका लहान हौदात तयार केलेला ॲझोला दररोज सुमारे १-२ किलो उत्पादन देतो. 

 

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय कृषी सेवा केंद्र, इगतपुरी 

 

चार एकरांवर मका, सहा हजारांचा खर्च, एका धांड्याला पाच-सहा कणसे, शेतकऱ्यानं नेमकं काय केलं?

 

English
हिंदी सारांश
Web Title : Grow Azolla Easily: Nutritious, Cost-Effective Feed for Livestock Production.

Web Summary : Azolla, a nutritious aquatic fern, boosts milk production and reduces feed costs. It's protein-rich and easy to grow at home in shaded, moist areas using plastic, water, soil, and manure. Feed 1-1.5 kg daily for improved livestock health and output.
टॅग्स :शेती क्षेत्रपीक व्यवस्थापनदुग्धव्यवसायशेतकरी