Lokmat Agro >स्मार्ट शेती > डाळिंब बागेवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झालाय, असे करा नियंत्रण? 

डाळिंब बागेवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झालाय, असे करा नियंत्रण? 

Latest news Pomegranate orchard is infested with sap-sucking insects, how to control them? | डाळिंब बागेवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झालाय, असे करा नियंत्रण? 

डाळिंब बागेवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झालाय, असे करा नियंत्रण? 

Agriculture News : डाळिंब फळपिकावर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असतो. या किडींचे नियंत्रण कसे करावे? 

Agriculture News : डाळिंब फळपिकावर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असतो. या किडींचे नियंत्रण कसे करावे? 

शेअर :

Join us
Join usNext

Agriculture News :  डाळिंब (Pomegranate) या फळपिकावर येणाऱ्या विविध किडी आणि रोगांच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन (Integrated Pest Management) पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. यात प्रामुख्याने रसशोषक किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असतो. या किडींचे नियंत्रण कसे करावे? 

एकरी २४ नीळे व पिवळे चिकट सापळे बागेत नागमोडी पद्धतीने झाडाच्या उंचीच्या १५ सें. मी खाली लावावेत. पहिली फवारणी - रसशोषक किडींसाठी, अॅझाडिरेक्टिन (१०,००० पीपीएम) ३ मिली किंवा करंज तेल ३ मि.ली किंवा वरील दोन्ही एकत्रितपणे प्रत्येकी ३ मि.ली. अधिक स्टीकर स्प्रेडर ०.२५ मि.ली प्रतिलिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी. (पावसाची उघडीप असताना फवारणी करावी)

दुसरी फवारणी - ७ ते १० दिवसांनी रसशोषक किडींसाठी, सायअँट्रानीलीप्रोल (१०.२६ ओडी) १.८ मि.ली. किवा थायमिथोक्साम (२५ डब्ल्यूजी) ०.५ ग्रॅम अधिक स्टीकर स्प्रेडर ०.२५ मि.ली. प्रतिलिटर पाणी प्रमाणे करावी.

फुलधारणा अवस्था
रसशोषक किडींसाठी, स्पिनेटोरम (११.७ एससी) ०.४ मि.ली. किवा स्पिनोसॅड (४५ एससी) ०.३ मि.ली. अधिक स्टीकर स्प्रेडर ०.२५ २५ मिली मिली प्रतिलिटर प्रतिलिटर पाणी प्रमाणे फवारावे. (पावसाची उघडीप असताना फवारणी रणी करावी)

फळधारणा अवस्था
रसशोषक कीड व फळ पोखरणाऱ्या अळीसाठी, साय अँट्रानीलीप्रोल (१०.२६ ओडी) १.८ मि.ली. किंवा क्लोर अँटानीलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मि.ली. किंवा टोल्फेनपायरेंड (१५ ईसी) २ मि.ली. किंवा फ्लोनिकामीड (५० डब्ल्यूर्जी) ०.४ ग्रॅम अधिक स्टीकर स्प्रेडर ०.२५ मिली प्रतिलिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.


- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

Web Title: Latest news Pomegranate orchard is infested with sap-sucking insects, how to control them?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.