PM SYM Scheme : देशातील असंघटित क्षेत्रातील लाखो कामगारांसाठी सरकारने महत्त्वपूर्ण योजना आणली आहे. या योजनेचे नाव आहे, प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना (PM-SYM). ज्या अंतर्गत पात्र कामगारांना वयाच्या ६० व्या वर्षी पोहोचल्यानंतर मासिक ३ हजार रुपयांची पेन्शन मिळणार आहे. काय आहे ही योजना, सविस्तर माहिती पाहुयात...
ही योजना लहान शेतकरी, गाडा चालक, रिक्षाचालक, रोजंदारीवर काम करणारे कामगार आणि घरगुती कामगारांसाठी आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांना वृद्धापकाळानंतरही आर्थिक असुरक्षिततेचा सामना करावा लागू नये हे सरकारचे उद्दिष्ट आहे.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये
- पेन्शन रक्कम : वयाच्या ६० व्या वर्षानंतर, दरमहा ३ रुपये निश्चित पेन्शन मिळेल.
- योगदान रक्कम: वयानुसार दरमहा ५५ ते २०० रुपयापर्यंत योगदान दिले जाते.
- कुटुंब पेन्शन : सदस्याच्या मृत्यूनंतर, पती/पत्नीला कुटुंब पेन्शन म्हणून पेन्शनच्या ५० टक्के रक्कम मिळेल.
- लवचिकता : योजनेतून स्वेच्छेने बाहेर पडण्याचा पर्याय देखील आहे.
- प्रशासन : ही योजना भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) द्वारे प्रशासित केली जाते.
कोण लाभ घेऊ शकेल?
- वय मर्यादा : १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
- उत्पन्न मर्यादा : मासिक उत्पन्न ₹१५,००० किंवा त्यापेक्षा कमी.
- रोजगार क्षेत्र : रस्त्यावरील विक्रेते, कचरा वेचणारे, रिक्षाचालक, बांधकाम कामगार, रोजंदारी कामगार, घरकामगार, शेतमजूर, बीडी कामगार, विणकर, मच्छीमार, चामडे कामगार इ.
- निर्बंध : EPF, ESIC किंवा NPS सारख्या योजनांमध्ये समाविष्ट नसावे.
- कर वर्ग : आयकर भरणारा अजिबात नसावा.
- इतर पेन्शन : इतर कोणत्याही सरकारी पेन्शन योजनेचा लाभ घेऊ नये.
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड आवश्यक आहे.
- मोबाईल नंबर आधारशी लिंक केलेला असणे आवश्यक आहे.
- बचत बँक खाते किंवा जन धन खाते (IFSC कोडसह)
नोंदणी प्रक्रिया
- तुमच्या आधार कार्ड आणि बँक खात्याच्या तपशीलांसह जवळच्या CSC वर जा.
- बायोमेट्रिक प्रमाणीकरण करा.
- CSC ऑपरेटर तुमच्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरेल.
- पहिले सबस्क्रिप्शन पेमेंट तेथे रोख स्वरूपात करावे लागेल.
- तुमच्या बँक खात्यातून ऑटो-डेबिट सेट अप केले जाईल.
- नोंदणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला PM-SYM कार्ड मिळेल.
Post Office Scheme : पोस्टाची अशी योजना जी तुमची गुंतवणूक दुप्पट करते, जाणून घ्या या योजनेबद्दल