Lokmat Agro >स्मार्ट शेती > Pik Vima Bank : पीक विम्याचे पैसे कुठल्या बँकेत आले, हे कसे समजेल? इथं वाचा सविस्तर 

Pik Vima Bank : पीक विम्याचे पैसे कुठल्या बँकेत आले, हे कसे समजेल? इथं वाचा सविस्तर 

Latest News Pik Vima bank which bank account crop insurance money went to Read more here | Pik Vima Bank : पीक विम्याचे पैसे कुठल्या बँकेत आले, हे कसे समजेल? इथं वाचा सविस्तर 

Pik Vima Bank : पीक विम्याचे पैसे कुठल्या बँकेत आले, हे कसे समजेल? इथं वाचा सविस्तर 

Pik Vima Bank : शासकीय योजनांचे अनुदान (Government Scheme Subsidy) आधार संलग्न असलेल्या बँक खात्यांमध्ये डीबीटीद्वारे ट्रान्सफर करण्यात येतात.

Pik Vima Bank : शासकीय योजनांचे अनुदान (Government Scheme Subsidy) आधार संलग्न असलेल्या बँक खात्यांमध्ये डीबीटीद्वारे ट्रान्सफर करण्यात येतात.

शेअर :

Join us
Join usNext

Pik Vima Bank : शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचे अनुदान (Government Scheme Subsidy) ज्यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजना, पीएम किसान, पिक विमा योजना (Pik Vima Yojana) किंवा इतर शासकीय योजनांचे अनुदान आधार संलग्न असलेल्या बँक खात्यांमध्ये डीबीटीद्वारे ट्रान्सफर करण्यात येतात.

अनेकदा शेतकरी कोणत्याही योजनांचा लाभ घेत असताना नेमक्या कोणत्या बँकेचे अकाउंट (Bank Account)  सदर अर्जासोबत दिलेला होतं किंवा पीक विम्याचा अनुदान किंवा अतिवृष्टी अनुदान नेमकं कुठल्या बँकेत येईल, असे प्रश्न शेतकरी विचारत असतात.

सद्यस्थितीत शेतकऱ्यांचे पीकविमा अनुदान खात्यावर येत आहेत. मात्र नेमक्या कुठल्या बँकेत येतात हे लक्षात येत नाही. म्हणूनच आपण या एनपीसीआय या संकेतस्थळावरून साध्या सोप्या शब्दात समजून घेऊयात.... 

  • सर्वप्रथम एनपीसीआय च्या वेबसाईटवर यायचं आहे. या ठिकाणी निळ्या रंगात काही पर्याय दाखवण्यात आले आहेत. 
  • यापैकी दुसरा पर्याय Consumer नावाच्या पर्यायावर क्लिक करायच आहे. 
  • या यानंतर भारत आधार सीडिंग इनेबल नावाचा पर्यावर क्लिक करायचे आहे. 
  • पुढील विंडोवर एंटर युअर आधार असा पर्याय दिसेल. 
  • यामध्ये आपला आधार क्रमांक प्रविष्ट करायचा आहे. 
  • त्याखाली कॅपच्या कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड टाकून सबमिट या पर्यायावर क्लिक करायचा आहे. 
  • आता आधार संलग्न असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल हा ओटीपी प्रविष्ट करायचा आहे. 
  • ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर कन्फर्म या पर्यायावर क्लिक करायचा आहे. 
  • यानंतर आपल्यासमोर आपल्या बँकेची माहिती दिसून येईल. 
  • जसे की आधार नंबर, बँकेचे नाव, अकाउंट नंबर, अकाउंट होल्डर नेम आणि बँक खात्याचा प्रकार ही सगळी माहिती दिसून येईल. 
  • आणि याच खात्यामध्ये आपल्या शासकीय योजनांचा अनुदान हे वितरित होत असते, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

Web Title: Latest News Pik Vima bank which bank account crop insurance money went to Read more here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.