Lokmat Agro >स्मार्ट शेती > Pik Vima Application : तुमचा पीक विमा अर्ज मंजूर झाला आहे का नाही? दोन मिनिटांत जाणून घ्या 

Pik Vima Application : तुमचा पीक विमा अर्ज मंजूर झाला आहे का नाही? दोन मिनिटांत जाणून घ्या 

Latest News Pik Vima Application Has your crop insurance application been approved Find out in two minutes | Pik Vima Application : तुमचा पीक विमा अर्ज मंजूर झाला आहे का नाही? दोन मिनिटांत जाणून घ्या 

Pik Vima Application : तुमचा पीक विमा अर्ज मंजूर झाला आहे का नाही? दोन मिनिटांत जाणून घ्या 

Pik Vima Application : पिक विमा (Pik Vima Policy) संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. अगदी दोन मिनिटात मोबाईलवर मिळवता येणार आहे. 

Pik Vima Application : पिक विमा (Pik Vima Policy) संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. अगदी दोन मिनिटात मोबाईलवर मिळवता येणार आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

Pik Vima Application :  अनेक शेतकऱ्यांनी खरीप आणि रब्बी हंगामातील (Kharip pik Vima) पीक विमा योजनेत सहभाग नोंदवला आहे. त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी पिक विमा काढलेला आहे. यानंतर अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडले आहेत की, माझा पिक विमा मंजूर झाला आहे की नाही? पिक विम्याची पॉलिसी (Pik Vima Policy) मंजूर झाली आहे का नाही? पिक विम्याच्या क्लेमचं कॅल्क्युलेशन झाले आहे का? सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला घरबसल्या मिळवता येणार आहेत, ती कशी जाणून घेऊया या सविस्तर लेखातून...

  • तर पिक विमा संदर्भात वरील प्रश्नांसह इतर माहिती जाणून घेण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. 
  • अगदी दोन मिनिटात आपल्या मोबाईलवर ही माहिती मिळवता येणार आहे. 
  • सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये पीएम एफ बी वाय या योजनेचा चॅटबॉट क्रमांक 70 65 51 44 47 म्हणजेच मोबाईल नंबर सेव्ह करायचा आहे. 
  • हा नंबर सेव्ह केल्यानंतर व्हाट्सअपमध्ये येऊन PMFBY यावर यायचा आहे. 
  • जसे की आपण इतर वेळी व्हाट्सअप उघडल्यानंतर एखाद्या व्यक्तीला मेसेज करायचा असल्यास मेसेज बॉस उघडत असतो. 
  • त्याचप्रमाणे हा सेव केलेला नंबर व्हाट्सअप मध्ये उघडायचा आहे. 
  • त्यानंतर या नंबर वर Hi करून मेसेज पाठवायचा आहे. 
  • Hi करून मेसेज पाठवल्यानंतर आपल्याला मेनूचा रिप्लाय येईल.
  • यात पॉलिसी स्टेटस इन्शुरन्स ,पॉलिसी क्रॉप, लॉस इंटीमेशन, क्लेम स्टेटस, तिकीट स्टेटस, प्रीमियम कॅल्क्युलेटर असे पर्याय दिसतील.
  • या पर्यायातील पॉलिसी स्टेटस या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर रब्बी 2024 आणि खरीप 2024 असे पर्याय दिसू लागतील.  
  • आपल्याला जर खरीप हंगामातील पीक विमा पॉलिसी पाहायचे असेल तर खरीप 2024 निवडल्यानंतर आपण भरलेल्या पॉलिसीचा नंबर, अर्जाचा नंबर, त्या पॉलिसीच्या गावाचं नाव, आपल्या भरलेल्या पिकाच नाव, सर्व्हे नंबर, भरलेली रक्कम, पिक विमा कंपनीचे नाव, भरलेला हप्ता, शासनाचा हप्ता, पॉलिसीची स्टेटस हि सर्व दिसू लागेल. 
  • आता यापुढे आपणास इतर माहिती पाहायची असल्यास चालू ठेवण्यासाठी विचारले जाईल, त्यासाठी Yes या पर्यायावर क्लिक करा. 
  • जर आपल्याला यानंतर क्लेम स्टेटस पाहिजे असेल तर त्या पर्यायावर क्लिक करा. त्यात रब्बी 2024 ची खरीप 2024 यातील योग्य पर्याय निवडायचा आहे.
  • यानंतर आपल्यासमोर अर्जाची स्थिती दाखवली जाईल, यात अर्जाचा क्रमांक असेल क्लेम स्टेटस असेल ही सर्व माहिती दिसून येईल. 
  • अशा पद्धतीने आपण इतरही पिक विमा संदर्भातील बाबी संबंधित पर्यायावर क्लिक करून माहिती मिळवू शकता. 

Web Title: Latest News Pik Vima Application Has your crop insurance application been approved Find out in two minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.