Agriculture News : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, देवळा, सटाणा, येवला व नांदगाव भागातील परिसरामध्ये वाढत्या थंडी, धुके व ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातीलकांदा, गहू व हरभरा या पिकांवर विविध कीड व रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता दिसून येत आहे. सोबत अति थंडीमुळे वाढ सुद्धा खुंटलेली दिसत आहे. यासाठी शेतकरी बांधवानी पुढील उपाय योजना कराव्यात.
कांदा पिकासाठी -
- थंडीत पडणाऱ्या दवामळे करपा रोग (Purple Blotch) मोठ्या प्रमाणावर वाढतो.
- नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी / हारझियानम जैविक बुरशीनाशक १० ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी.
- मातीमध्ये २.५ किलो/एकर ट्रायकोडर्मा शेणखतात मिसळून द्यावे.
- करपा रोगाचा अधिक प्रादुर्भाव दिसताच डायफेनोकोनाझोल २५% EC १ मि.ली. लिटर किंवा अॅझोक्सीस्ट्रोबीन टेबुकोनाझोल १ ग्रॅम/लिटर प्रमाण घेऊन ८ ते १० दिवसाच्या अंतराने आलटून पालटून फवारणी करावी.
- फुल किडीच्या नियंत्रणासाठी नीम तेल १०००० पीपीएम १ मि.ली. लिटर किंवा फिप्रोनील ५% SC १ मि.ली. / लिटर प्रमाण घेऊन फवारणी करावी.
गहू पिकासाठी -
मावा किडीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८% SL ०.३ मि.ली./लिटर किंवा थायमेथॉक्साम २५% WG ०.२५ ग्रॅम/लिटर पाणी घेऊन फवारणी करावी.
हरभरा पिकासाठी -
फुले येण्याची अवस्था असताना ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडीरेक्टीन ३०० पीपीएम ५० मिली / लिटर व घाटे लागताना इमामेक्टिन बेंझोएट ५ % SG ०.४ ग्रॅम /लिटर पाणी किंवा इंडॉक्साकार्ब १४.५% SC १ मि.ली. / लिटर किंवा क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल १८.५% SC ०.३ मि.ली. / लिटर किंवा स्पायनोसॅड ४५% SC ०.३ मि.ली. / लिटर प्रमाण घेऊन एका कीड नाशकाची फवारणी करावी
थंडीमध्ये सर्वसाधारण विशेष काळजी (सर्व पिकांसाठी) -
दव असताना फवारणी टाळा; दुपारी ११ ते ४ या वेळेत करा.
हलके पण वारंवार पाणी टाळा यामुळे बुरशीजन्य रोगाचे प्रमाण वाढते वाफसा आल्यावरच पाणी द्यावे.
अतिरिक्त नत्राचा वापर टाळावा यामुळे मावा/फुलकिड व बुरशीजन्य रोग वाढतात व सोबत पालाश पुरेसा द्यावा.
- विशाल जी चौधरी विषय, विशेषज्ञ (पिक संरक्षण) कृषी विज्ञान केंद्र, मालेगाव (नाशिक)
Read More : सेंद्रिय भाजीचे अनेक फायदे, खरा सेंद्रिय भाजीपाला ओळखायचा कसा, वाचा सविस्तर
