Sub Soiler : शेतीमध्ये अनेक आधुनिक अवजारांचा उपयोग होऊ लागला आहे. शेतजमीन नांगरण्यासाठी किंवा जमिनीत अनेकदा ट्रॅक्टर, हार्वेस्टर किंवा इतर अवजारांचा वापर होतो. त्यामुळे जमीन रखरख होऊन जाते, अशावेळी खरीप हंगामासाठी जमीन तयार करण्यासाठी सब सॉइलरचा उपयोग महत्वाचा ठरतो.
आता लवकरच खरीप हंगामाला सुरवात होईल. तत्पूर्वी नांगरणीची कामे शेतात करावी लागतात. यासाठी ट्रॅक्टरच्या साहाय्याने बहुतांश वेळा नांगरणी केली जाते. मात्र सुरवातीच्या वेळी सब सॉइलरचा वापर केल्यास अनेक फायदे मिळतात. कृषी विज्ञान केंद्र सगरोळी यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सब सॉइलरचा प्रयोग केला आहे.
सगरोळी कृषी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या शेतात सब सॉइलरचा वापर करण्यात आला. यावेळी शेतकरी म्हणाले की, वारंवार ट्रॅक्टर वापरून जमिनीचे थर चिकट झालेले असतात किंवा दबले गेलेले असतात. त्याचे टाळू फोडण्यासाठी सब सॉइलर फायद्याचा ठरतो. सब सॉइलर थेट अडीच फुटपर्यंत आत जातो. यामुळे पिकांची सुधारणा होते, मुळ्या खोलवर जाण्यास मदत होते. अन्नद्रव्ये शोषून घेत असतात. पिकाला बळकटी येते. जमिनीची धूप थांबते.
- सबसॉइलरचे प्रमुख फायदे:
- जमिनीतील ढेकळे फोडणे : हे जमिनीत १२-३६ इंच खोलवर शिरते, खालच्या कठीण थराला (हार्डपॅन) फोडते, ज्यामुळे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते.
- सुधारित निचरा : यामुळे पाणी साचणे टाळले जाते आणि जमिनीची पाणी शोषण्याची क्षमता वाढते.
- मुळांची खोलवर वाढ : जमीन मऊ झाल्यामुळे पिकांची मुळे अधिक खोलवर जातात, ज्यामुळे त्यांना अधिक पोषक तत्वे मिळतात.
- उत्पन्न वाढ : मुळांचा सुधारित विकास आणि पाणी व्यवस्थापनामुळे पिकांच्या उत्पन्नात १०-२५ टक्के वाढ होते.
- पाण्याची बचत : जमिनीतील ओलावा जास्त काळ टिकून राहतो, ज्यामुळे सिंचनाच्या पाण्याची २५-४० टक्के बचत होते.
- जमिनीच्या आरोग्यात सुधारणा : यामुळे जमिनीतील हवेचा संचार वाढतो.
- कीड नियंत्रण : उन्हाळ्यात सब-सॉइलर वापरल्यामुळे जमिनीची खोल मशागत होते, ज्यामुळे कीटकांची अंडी आणि हानिकारक जीवाणू नष्ट होतात.
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी यंदा 1126 कोटींचे अनुदान, 'या' शेतकऱ्यांना लाभाचे वितरण होणार
Web Summary : Use sub-soiler for Kharif season to break hard soil layers, improve water absorption and root growth. This boosts yields by 10-25%, saves water, and improves soil health by aerating it and controlling pests. Agricultural scientists recommend it for better harvests.
Web Summary : खरीफ मौसम के लिए सब-सॉइलर का उपयोग कड़ी मिट्टी की परतों को तोड़ने, पानी के अवशोषण और जड़ विकास को बेहतर बनाने के लिए करें। इससे उपज 10-25% तक बढ़ जाती है, पानी की बचत होती है, और मिट्टी में हवा का संचार होता है और कीट नियंत्रण होता है। कृषि वैज्ञानिक बेहतर फसल के लिए इसकी सलाह देते हैं।