Navin Amba Lagvad : नवीन आंबा बागेत सुरुवातीच्या वर्षांत उत्पन्न मिळवण्यासाठी आणि जमीन सुपीक ठेवण्यासाठी आंतरपिके घेऊ शकता, ज्यामुळे सुरुवातीच्या वर्षांतील खर्च भागवून जमिनीचा कस वाढवता येतो आणि तापमान नियंत्रित राहते.
यामध्ये भाजीपाला (उदा. भोपळा, टरबूज), शेंगवर्गीय पिके (उदा. ताग), औषधी वनस्पती (उदा. तुळस, कोथिंबीर) आणि कमी उंचीची फळझाडे (उदा. ड्रॅगन फ्रूट, अननस) यांसारखी पिके घेता येतात.
नवीन बागेमध्ये आंतरपीक
- बागेमध्ये कमी उंचीचे आंतरपीक घ्यावे.
- खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात आंतरपीक पद्धती ठरवताना जमिनीची सुपीकता देखील जपली जाईल, हे विचारात घ्यावे.
- पावसाळा किंवा हिवाळ्याच्या हंगामात आंतरपीक घेतले नाही तरी चालेल.
- परंतु, उन्हाळ्यात आपल्या शेतामध्ये कमी उंचीचे आंतरपीक घेण्याचा प्रयत्न करावा.
- आंतरपिकामुळे बागेत कलमांच्या मुळांभोवती सावली, गारवा राहून एकंदरीत तापमान कमी राहण्यास मदत होते.
- तसेच हवेतील आर्द्रता वाढून झाडांच्या जोमदार वाढीस याचा निश्चितच फायदा होतो.
- बागेमध्ये आंतरपीक घेतले असल्यास, आंब्याच्या कलमांना आंतरमशागत करताना इजा होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
आंतरपिकांची निवड कशी करावी:
कमी उंचीची पिके : आंब्याच्या झाडांच्या वाढीमध्ये अडथळा आणणार नाहीत अशी, कमी उंचीची पिके निवडा.
शेतजमिनीचा प्रकार : तुमच्या मातीच्या सुपीकतेनुसार पिकांची निवड करा, जेणेकरून मातीचा कस टिकून राहील.
पिकांची पद्धत : खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामांसाठी योग्य पिकांची निवड करा.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी
