Lokmat Agro >स्मार्ट शेती > Agriculture News : सततच्या पावसाने कोबीवर करपा, केवडाचा प्रादुर्भाव, 'या' फवारण्या करा 

Agriculture News : सततच्या पावसाने कोबीवर करपा, केवडाचा प्रादुर्भाव, 'या' फवारण्या करा 

Latest News Management of scab and scab diseases on cabbage crop see details | Agriculture News : सततच्या पावसाने कोबीवर करपा, केवडाचा प्रादुर्भाव, 'या' फवारण्या करा 

Agriculture News : सततच्या पावसाने कोबीवर करपा, केवडाचा प्रादुर्भाव, 'या' फवारण्या करा 

Agriculture News : सद्यस्थितीत कोबी पिकावर करपा आणि केवडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याबाबतचा आजचा कृषी सल्ला.... 

Agriculture News : सद्यस्थितीत कोबी पिकावर करपा आणि केवडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याबाबतचा आजचा कृषी सल्ला.... 

शेअर :

Join us
Join usNext

Agriculture News :  राज्यातील अनेक भागात पाऊस सुरु असल्याने पेरण्यांना वेग आला आहे. मात्र काही ठिकाणी सततच्या पावसाने पिकांना फटका देखील बसत आहे. सद्यस्थितीत कोबी पिकावर (Cabbage Farming) करपा आणि केवडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याबाबतचा आजचा कृषी सल्ला.... 

कोबी पिकावरील करपा व केवडा रोग व्यवस्थापन

कळवण परिसरात पडत असलेल्या सतत त्या पावसामुळे करपा व केवडा (डाऊनी मिल्ड्यू) रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. 
करपा रोगात्त्या नियंत्रणासाठी खालील उपाय योजना कराव्यात. 

  • मँकोझेब २.५ ग्रॅम / लिटर पाणी किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड २.५ ग्रॅम/लिटर किंवा क्लोरथैलोनील २.५ ग्रॅम/लिटर अधिक सर्फेक्टंट १ मि.लि/लिटर पाण्यात प्रमाण घेऊन या बुरशीनाशकांची फवारणी करावी.
  • डाऊनी रोगाच्या नियंत्रणासाठी- मेटॅलॅक्झिल अधिक मँकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम/लिटर किंवा क्लोरथैलोनील २.५ ग्रॅम/लिटर अधिक सर्फेक्टंट 1 मि.लि/लिटर पाण्यात प्रमाण घेऊन आलटून पालटून फवारण्या कराव्यात. 

 

- विशाल जी चौधरी, पिक संरक्षण शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, मालेगाव
 

Web Title: Latest News Management of scab and scab diseases on cabbage crop see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.